Secret Facebook Group esakal
लाइफस्टाइल

Secret Facebook Group : इथे स्त्रिया सांगतात त्यांचं डर्टी सीक्रेट, पुरुषांना केलं जातं रिव्ह्यू

या सीक्रेट ग्रुपमध्ये महिला पुरुषांबद्दलचे रिव्ह्यू शेअर करतात

सकाळ ऑनलाईन टीम

Secret Facebook Group : तसं पाहायला गेलं तर यूके आणि यूएसमधील बरेच लोक ऑनलाइन डेटिंगमध्ये ॲक्टीव्ह असतात. अशाच डेटिंग करणाऱ्या महिलांनी फेसबुकवर 'आर वी डेटिंग द सेम गाय' नावाचा एक ग्रुप तयार केलाय. या सीक्रेट ग्रुपमध्ये महिला पुरुषांबद्दलचे रिव्ह्यू शेअर करतात.

एखाद्या पुरुषाने ग्रुप मधल्या स्त्रीला जर धोका दिला असेल तर ती महिला तिच्या सोबत घडलेला प्रसंग ग्रूपवर सांगत असते. बऱ्याच महिलांसाठी हे केवळ एंटरटेनमेंट आहे. Dazed रिपोर्टनुसार, अशा प्रकारचा पहिला ग्रुप गेल्या वर्षी मार्चमध्ये न्यूयॉर्कमध्ये सुरू करण्यात आला होता. दोन महिन्यांनंतर लंडनमध्ये असाच एक ग्रूप सुरू झाला.

अलीकडच्या काळात लंडनमध्ये अशा ग्रुपची संख्या झपाट्याने वाढली आहे. या ग्रुपचे आता 16 हजारांहून अधिक सदस्य आहेत. तसेच, गेल्या काही महिन्यांत यूकेच्या मँचेस्टर, नॉटिंगहॅम आणि एडिनबर्गसारख्या भागात बरेच हायपरलोकल ग्रूप तयार झाले आहेत.

या ग्रुपमध्ये सर्व प्रकारच्या महिला आहेत. या ग्रुप मध्ये ॲक्टीव्ह असणाऱ्या महिला निनावी नावाने पोस्ट करत असतात. बऱ्याचदा महिला पुरुषांचं नाव टाकून info in comments किंवा any ☕? अशा कमेंट पोस्ट करत असतात. आणि ग्रूप मध्ये असणाऱ्या एखाद्या महिलेने त्या पुरुषाला आधी डेट केलं असेल तर ती तिथं एक नोट टाकते.

या ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी काही नियमही करण्यात आले आहेत. नियमांनुसार, या ग्रुपमध्ये कोणतेही अश्लील फोटो कमेंट टाकता येत नाही. शिवाय धमक्या देणे किंवा संवेदनशील माहिती शेअर करता येत नाही, कोणत्याही पर्सनल चॅटचे स्क्रीन शॉट्स ग्रूपवर टाकता येत नाहीत.

ग्रुपशी संबंधित अनेक महिलांसाठी हे फक्त मनोरंजनाचे साधन आहे, तर अनेक महिलांसाठी हा ग्रुप खूप उपयुक्त आहे. ग्रुपशी संबंधित अनेक महिलांसाठी हे गॉसिपपेक्षा जास्त आहे. इथे स्त्रिया पुरुषाने केलेल्या फसवणुकीबद्दल सांगतात.

मात्र, ग्रूप मधल्या काही महिलांना वाटतं की अशा प्रकारे कोणाचेही फोटो शेअर करणे किंवा त्याबद्दल बोलणे चुकीचे आहे. तर दुसरीकडे, अशा ग्रुपमुळे एखाद्या चुकीच्या व्यक्तीची माहिती समोर आल्यास इतर काही महिला त्याच्यापासून लांब राहू शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Nagpur AIIMS Recruitment: नागपूर एम्समध्ये विविध विभागांसाठी ‘ग्रुप-ए’ पदांची थेट भरती, पगार २ लाख रुपये; असा करा अर्ज

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

Latest Marathi News Updates live : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु

SCROLL FOR NEXT