Shabana Azmi  esakal
लाइफस्टाइल

शबाना आजमींकडून घ्या स्टाइलिंग टिप्स,‘वय तुमच्यापासून फॅशनेबल राहण्याचा हक्क हिरावू शकत नाही’

शबाना यांनी नेहमीच रिअल आणि रिल लाईफमध्ये परखड भुमिका बजावली

सकाळ डिजिटल टीम

पुणे : बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्रींपैकी एक असलेल्या शबाना आझमी यांचा आज वाढदिवस आहे. त्या आपला 72 वा वाढदिवस साजरा करत आहेत. 'अंकुर' चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या शबाना यांनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये एकापेक्षा एक सिनेमे दिले आहेत. शबाना यांनी नेहमीच रिअल आणि रिल लाईफमध्ये परखड भुमिका केल्या आहेत. 70, 80 आणि 90 ची दशकं अक्षरश: त्यांनी गाजवली आहेत. त्यांच्या फॅशन सेन्समुळेही त्या नेहमी चर्चेत राहील्या आहेत.

वय वाढले असले तरी फॅशनेबल राहण्याचा हक्क आपल्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही, अशा मताच्या शबाना आहेत. वयाची 70 ओलांडली तरी शबाना आझमी आजही क्लासी दिसतात. शबाना यांच्या लुक्सवरून तूम्हालाही फॅशन टिप्सही मिळू शकतात.

क्लासी आणि स्टायलिश लुकसाठी तूम्ही गुलाबी आणि लाल रंगाची साडी निवडू शकता. त्यावर बोट नेक ब्लाउज घालू शकता. तसेच, केसांचा बन घालून त्यामध्ये फुले किंवा साडीवर मॅचिंग हेअर ऍक्सेसरीज ट्राय करू शकता.

साडीवर लांब कानातले किंवा मोठे झुमके घाला. त्यावर डार्क रेड किंवा पिंक लिपस्टिक लावा. अशा लुकमध्ये तूम्ही एकदम क्लासी दिसाल. महिला पांढऱ्या रंगात अगदीच खुलून दिसतात. शबाना यांना सुद्धा हा रंग आवडतो. शबाना यांनी या फोटोत पांढरा कुर्ता घातला असून त्यावर मल्टी कलर प्लाझो घातली आहे. यावर त्यांनी घेतलेला कलरफुल दुपट्टा शबाना यांच्या सौंदर्यात अधिकच भर घालत आहे.

या ट्रेंडी लुकसाठी केस मोकळे सोडा. डोळ्यावर हलका मेकअप आणि कानात मोठे झुमके ट्राय करा.सध्या लग्न, समारंभात सिंपल साडी अथवा सूटवर डिझायनर दागिने घातले जातात. शबाना यांचा हा लुकही असाच आहे. अशा ड्रेसवर केसाचा बन आणि फुले घालू शकता.

सुंदर दिसण्यासाठी फॅशन, क्लासी मेकअप, ट्रेंडी ऍक्सेसरीज घालणे तर महत्त्वाचे आहेच. पण, त्याचसोबत मनमोकळा स्वभाव आणि दिलखुलास स्माईलची जोड हवी. शबाना यांनी आजवर १२० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यामध्ये हिंदी आणि बंगाली चित्रपटांचा समावेश आहे. त्यांना आजवर ५ राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT