Kojagiri Purnima 2024  Sakal
लाइफस्टाइल

Kojagiri Purnima 2024: कोजागिरी पौर्णिमा 16 की 17 ऑक्टोबरला? वाचा शुभ मुहूर्त

पुजा बोनकिले

Kojagiri Purnima 2024: दसऱ्यानंतर आता सगळ्यांना वेध लागले ते कोजागिरी पौर्णिमेचे. अवघ्या दोन दिवसांनी कोजागिरी पौर्णिमा येऊन ठेपली आहे. यंदा कोजागिरी पौर्णिमा 16 ऑक्टोबर 2024 ला साजरी केली जाणार आहे. हिंदू धर्मात कोजागिरी पौर्णिमेला खुप महत्वाचे स्थान आहे. अश्विन महिन्याच्या शुल्क पक्षातील पौर्णिमेला शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागरी पौर्णिमा साजरी केली जाते. कोजागिरी पौर्णिमा सर्वात मोठी पौर्णिमा असते. या दिवशी अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम साजरे केले जातात. शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या खुप जवळ येतो, त्यामुळे आपल्याला चंद्र आकाराने खुप मोठा दिसतो.

16 की 17 कधी साजरी केली जाणार कोजागिरी पौर्णिमा?

हिंदू पंचांगानुसार , यंदा अश्विन महिन्यात 16 ऑक्टोबरला बुधवारी 8:40 वाजता सुरू होणार आहे तर ही पौर्णिमा तिथी दुसऱ्या दिवशी 17 ऑक्टोबरला संध्याकाळी 4:56 मिनिटांपर्यंत असणार आहे. त्यानुसार 16 ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे.

पुढीलप्रमाणे करावी पूजा

सकाळी लवकर उठून स्नान करावे. त्यानंतर स्वच्छकपडे परिधान करावे. या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण करावे. मंदिराची स्वच्छता करून लाल कपडा पसरावा आणि त्यावर लक्ष्मीचा फोटो ठेवावा. त्यानंतर देवीची पूजा करावी. चंद्रदयानंतर तुपाचा दिवा लावावा. त्यानंतर दूध किंवा खीरचा नैवेद्य दाखवावा.

पूजेसाठी लागणारे साहित्य

कलश

तेल

5 प्रकराची फळ

फुले

तूप

११ दिवे

पानं

धूप

सुपारी

चंदन

अक्षता

या दिवशी बांसुदी पिणे मानले जाते शुभं

मान्यतेनुसार शरद पौर्णिमेला रात्री चंद्रतून निघणारा प्रकाश अमृतासारखा असतो. यादिवशी दूधाची बांसुदी किंवा खीर तयार करून चंद्रप्रकाशात ठेवतात. यामुळे चंद्रचा प्रकाश त्यात पडतो आणि अमृताचा प्रभाव पडतो असे मानले जाते. तसेच खीरचा किंपा बासुंदीचा नैवेद्य दाखवला जातो.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Atul Parchure Passed Away: मराठी रंगभूमीवरचा हरहुन्नरी तारा निखळला! अभिनेते अतुल परचुरे यांचे ५७ व्या वर्षी निधन

Bopdev Ghat Case Update: बोपदेव घाट अत्याचार प्रकरणातील दुसरा आरोपी ताब्यात; पुणे पोलिसांनी उत्तर प्रदेशातून केली अटक

India summons Canadian diplomat : निज्जर हत्येप्रकरणी आरोप खपवून घेतले जाणार नाहीत! कॅनडाच्या राजनैतिक अधिकाऱ्यास भारताचे समन्स

Gunaratn Sadavarte: बिगबॉसमध्ये गेलेल्या सदावर्तेंवर हायकोर्टाची नाराजी! त्यांना गांभीर्यच नसल्याचा ठेवला ठपका

Munawar Farooqui: दिल्लीत पाठलाग अन्... फक्त सलमानच नाही तर मुनावर फारुकीही बिश्नोईच्या निशाण्यावर? पोलीस सुरक्षा पुरवणार

SCROLL FOR NEXT