Shardiya Navratri 2024:  Sakal
लाइफस्टाइल

Shardiya Navratri 2024: शारदीय नवरात्रीत नऊ दिवस काय करावे अन् काय करू नये? वाचा एका क्लिकवर

पुजा बोनकिले

Shardiya Navratri 2024: हिंदू धर्मात नवरात्री मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी केली जाते. यंदा 3 सप्टेंबरला शारदीय नवरात्री साजरी केली जाणार आहे. नवरात्रीत नऊ दिवस माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीत देवीची मनोभावे पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. नवरात्रीत अनेक लोक उपवास करतात. हे नऊ दिवस सर्वात पवित्र मानले जाते. नवरात्रीत देवीला प्रसन्न करण्यासाठी विविध नैवेद्य अर्पण केले जातात. तसेच मातेला लाल रंग प्रिय आहे. यामुळे लाल फुल, लाल ओढणी यासारख्या गोष्टी अर्पण करणे शुभ मानले जाते. नवरात्रीत नकळतपणे कोणत्याही चुका करू नका. कारण माता नाराज होऊ शकते. नवरात्रीत कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या नाही हे जाणून घेऊया.

नवरात्रीत कोणत्या गोष्टी कराव्या

माता दुर्गेला लाल रंग खूप प्रिय आहे. लाल रंग समृद्धी, नशीब, शक्ती आणि प्रेमाचे प्रतीक मानले जाते. नवरात्री दरम्यान माता दुर्गाला लाल फुले अर्पण करावी आणि लाल रंगाची चुनरी किंवा कपडे देखील अर्पण करावे.

नवरात्रीमध्ये माता दुर्गाच्या विविध रूपांची मनोभावे पूजा करावी. माता दुर्गाला दररोज नवीन ताजी फुले, फळे आणि मिठाई अर्पण करावी.

नवरात्रीत दररोज दुर्गा मातेच्या मंत्रांचा जप करावा आणि ध्यान करावे. यामुळे मनःशांती आणि एकाग्रता वाढते. तसेच कुटुंबात आनंद कायम राहतो.

नवरात्रीच्या दिवसांमध्ये गरजूंना दान करणे शुभ मानले जाते. हे अत्यंत पुण्यपूर्ण काम मानले जाते आणि जर ते केले तर त्याचे शुभ फळ मिळते.

पुढील काम करू नका

नवरात्रीत 9 दिवस अखंड दिवा लावावा. पण दिवा लावतांना काही नियमांचे पालन करावे. दिवा लावतांना विझू देऊ नका. तसेच दिव्यात मोठी वात ठेवावी, जी नऊ दिवस राहील.

नवरात्रीत संध्याकाळी घर बंद ठेऊ नका. कारण त्या वेळी माता घरात येते

नवरात्रीच्या ९ दिवसांत चुकूनही मांसाहार आमि मद्यपान करू नका.

नवरात्रीच्या काळात कोणाशीही वाद किंवा अपशब्द बोलू नका.

पूजा करताना निमांचे पालन करावे. नवरात्रीच्या काळात सकाळी उठणे आणि दुर्गा देवीची मनोभावे पूजा करावी.

नवरात्रीत पूजा करताना काळे कपडे घालू नका.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amruta Fadnavis: ''एकाला कुटुंब सांभाळायचंय तर दुसऱ्याला मुलीला मुख्यमंत्री करायचंय'' अमृता फडणवीसांचा नागपुरातून घणाघात

IPL Retention, मेगा ऑक्शन अन् अन् राईट टू मॅच कार्ड... बैठकीनंतर BCCI करणार मोठी घोषणा?

Nirmala Sitharaman आणि JP Nadda यांना न्यायालयाचा दणका; एफआयआर दाखल, जाणून घ्या नेमकं प्रकरण...

Mohan Bhagwat: ''महात्मा फुलेंनीच शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली, हे मी मनाचं बोलत नाही..'', फडणवीसांसमोर अजित पवारांचं विधान

Voting Registration: विधानसभा निवडणुकीसाठी मतदार नोंदणी अद्यापही सुरु; मुख्य निवडणूक आयुक्तांनी केलं 'हे' महत्वाचं आवाहन

SCROLL FOR NEXT