Navratri 2024 7th Colour: Sakal
लाइफस्टाइल

Navratri 2024 7th Colour: आज नवरात्रीचा शुभ रंग निळा, स्टायलिश लूक हवा असेल तर या अभिनेत्रींकडून घ्या आउटफिटची आयडिया

Navratri 2024 Colour: आज नवरात्रीचा सातवा दिवस आहे. आजचा शुभ रंग निळा आहे. तुम्हाला आज स्टायलिश आणि सुंदर दिसायचे असेल तर मराठी अभिनेत्रींच्या लूकवरून आउटफिटची आयडिया घेऊ शकता.

पुजा बोनकिले

Navratri 2024 7th Colour: देशभरात शारदीय नवरात्री उत्सव आनंदात साजरा केला जात आहे. सर्वत्र भक्तीमय आणि मंगलमय वातावरण आहे. नवरात्रीत नऊ दिवस माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार नऊ दिवस माता दुर्गेच्या नऊ रूपांची मनोभावे पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात.

नवरात्रीच्या प्रत्येक दिवसासाठी खास रंग निवडण्यात आला आहे. नवरात्रीच्या सातव्या दिवशी निळ्या रंगाचे कपडे परिधान करणे शुभ मानले जाते. निळा रंग हा शांतात. आत्मविश्वास,जबाबदारीचे प्रतिक आहे.

तुम्हाला आज निळा साडीत क्लासी, सुंदर आणि मराठमोळा लूक हवा असेल तर मराठी अभिनेत्रींच्या लूकवरून कल्पना घेऊ शकता. तुम्हा हा लूक कॅरी करून ऑफिस किंवा कोणत्याही कार्यक्रमांमध्ये जाऊ शकता. तुमचा लूक पाहून सर्वजण तुमचे खुप कौतुक करतील.

नवरात्रीच्या सातव्या दिवशी तुम्हाला निळ्या रंगाची साडी नेसायची असेल तर जानव्ही किल्लेकरकडून आउटफिटची आयडीया घेऊ शकता. तुम्हाला मराठमोळा लूक कॅरी करण्यासाठी मदत मिळेल. मल्टीकलरचे ब्लाउजसह हा लूक पूर्ण करू शकता. नाकात नथ घातल्यास तुम्ही अधिक सुंदर दिसाल.

नवरात्रीचा आजचा रंग निळा आहे. मुक्ता बर्वेसारखा सुंदर आणि साधा लूक कॅरी करून ऑफिसला जाऊ शकता. यामुळे तुमचे सर्वजण कौतुक करतील. तुम्ही कानात झुमके घालू शकता. गोल्डन कलरचे ब्लाऊज अधिक सुंदर दिसते.

मराठी अभिनेत्री वर्षाताईंकडून आउटफिटची आयडीया घेऊ शकता. गळ्यात चोकर किंवा लांब गळ्यातले घातल्यास अधिक सुंदर दिसाल. तुम्ही केस देखील मोकळे ठेऊ शकता. हाता मोत्याच्या बांगड्या घालू शकता. देवीच्या दर्शनाला जाताना अशा पद्धतीने तयारी करू शकता.

नवरात्रीत निळ्या साडीत स्टायलिश आणि सुंदर दिसायचे असेल तर तुम्ही सोनाली कुलकर्णीकडून प्रेरणा घेऊ शकता. निळ्या साडीसोबत हिरव्या रंगाचे ब्लाऊज घालू शकता. कानात गोल्डन रंगाचे कानातले घालू शकता. तसेच साधा मेकअप देखील तुमच्या सौंदर्यात भर टाकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Trending News : काॅंग्रेसचे दोन गट भररस्त्यात भिडले, तितक्यात अॅम्बुलन्स आली अन् पुढे जे घडलं...

SCROLL FOR NEXT