Navratri Colour 2024:  Sakal
लाइफस्टाइल

Navratri Colour 2024: नवरात्रीच्या पाचव्या दिवशी 'या' रंगाचे परिधान करा कपडे, देवी स्कंदमाता होईल प्रसन्न

Navratri Colour 2024: आज नवरात्रीचा पाचवा दिवस असून आजचा रंग पांढरा आहे. आजच्या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे घालून देवी स्कंदमाताची पूजा केल्यास सुख-समृद्धी लाभेल. हा रंग सकारात्मक आणि शांतेतेचे प्रतिक मानला जातो.

पुजा बोनकिले

Navratri Colour 2024: शारदीय नवरात्री उत्सवात नऊ दिवस जगदंबेच्या वेगळ्या रूपांची पूजाही केली जाते. देशभरात नऊरात्रीचा सण आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. आज नवरात्रीचा पाचवा दिवस आहे. आज देवी स्कंदमाताची पूजा केली जाते. देवीचे हे रूप तिच्या मातृत्वाची जाणिव करून देणारं आहे. म्हणजेच, माता स्कंदमाता एकटी नाही तर तिच्या मांडीवर भगवान कार्तिकेय आहेत.

स्कंदमातेला चार हात आहेत. देवीच्या वरच्या दोन्ही हातात कमळाचे फूल आहे. तर भगवान कार्तिकेय स्कंद त्यांच्या मांडीवर आहेत. असे मानले जाते की स्कंदमातेच्या पूजेच्या वेळी भक्ताने व्रत आणि कथा न केल्यास भक्ताला शुभ फळ मिळत नाही.

या दिवशी देवीला प्रसन्न करण्यासाठी तिची पूजा केली जाते. नवरात्रीच्या प्रत्येक दिवसासाठी खास रंग निवडण्यात आला आहे. नवरात्रीच्या पाचव्या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करणे शुभ मानले जाते. तुम्हाला आज क्लासी आणि हटके दिसायाचे असेल तर बॉलिवूड अभिनेत्रींकडून ड्रेसची कल्पना घेऊ शकता.

Deepika

दिपिका पांढऱ्या साडीत खुप सुंदर दिसत आहे. तुम्ही नवरात्रीच्या पाचव्या दिवशी दिपिका सारखा लूक कॅरी करू शकता. यामुळे सर्वाच्या नजरा तुमच्यावर खिळतील. नवरात्रीत देवीच्या दर्शनाला जाताना पांढऱ्या रंगाची साडी नेसू शकता. त्यावर पांढऱ्या रंगाचे किंवा मोत्यांचे कानातले परिधान करू शकता. तसेच या साडी सोबत बंद गळ्याचा ब्लाऊज घालू शकता.

Aila

नवरात्रीच्या पाचव्या दिवशी पांढऱ्या रंगाची साडी नसायची असेल तर आलियाकडून आऊटफिटची आयडिया घेऊ शकता. तुम्हाला पांढऱ्या साडीत स्टायलिश आणि सुंदर दिसायचे असेल तर गुलाबी फुलांची डिझाइन असलेली साडी परिधान करू शकता. त्यावर कानात लांब झुमके परिधान करू शकता.

Priti

आज नवरात्रीचा पाचवा रंग पांढरा आहे. बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटाकडून आउटफिटची आयडीया घेऊ शकता. पांढऱ्या साडीवर डिझानर ब्लाउज परिधान करू शकता. तसेच लूक पूर्ण करण्यासाठी कानात झुमके घालू शकता. तसेच लाइट मेकअप केल्यास अदिक सुंदर दिसाल.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: सोनं झालं 5,000 रुपयांनी स्वस्त; अवघ्या 15 दिवसांत सोन्याच्या भावात मोठी घसरण, आज काय आहे भाव?

वर्तुळ पूर्ण! Tim Southee ची कसोटी मधून निवृत्ती; ज्या संघाविरुद्ध पदार्पण, त्यांच्याविरुद्धच शेवटचा सामना

Latest Maharashtra News Updates : पवारांसोबत जाण्याची वेळ येणार नाही, महायुतीला बहुमत मिळेल-एकनाथ शिंदे

Dehradun Accident: देहराडूनमध्ये भीषण अपघात, सहा तरुणांचा मृत्यू; काय आहे इनसाईड स्टोरी? पोलिसांकडे अद्याप तक्रार नाही

IND vs AUS: विराट कोहली जखमी? काल अचानक स्टार फलंदाज ऑस्ट्रेलियातील हॉस्पिटलमध्ये गेला अन्...

SCROLL FOR NEXT