Navratri 2024: Sakal
लाइफस्टाइल

Navratri 2024: नवरात्रीत अष्टमी अन् नवमीला 'या' 5 वस्तू करा खरेदी, घरात कायम राहील सुख-समृद्धी

पुजा बोनकिले

Navratri 2024: देशभरात शारदीय नवरात्रीचा उत्सव आनंदात साजरा केला जात आहे. यंदा 3 ऑक्टोबरला नवरात्रीला सुरूवात झाली आहे. नवरात्रीत नऊ दिवस माता दुर्गाची मनोभावे पूजा केली जाते. नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमीला कन्यापूजन केले जाते. हिंदू धर्मात कन्यापूजनाला खास महत्व आहे. या दिवसांमध्ये काही खास गोष्टी करणे आवश्यक आहे. तुम्ही नवरात्रीत अष्टमी आणि नवमीला पुढील वस्तूंची खरेदी करू शकता.

चांदीचे नाणे

नवरात्रीमध्ये चांदीचे नाणे खरेी करणे शुभ मानले जाते. अष्टमी आणि नवमीच्या दिवशी घरी आणल्यास माता दुर्गेचा खास आशीर्वाद मिळतो. एक चांदीचे नाणे असे खरेदी करा ज्यावर माता लक्ष्मीचा फोटो असेल. घरी आणून माता दुर्गेला अर्पण करा. यानंतर तुम्ही ते तुमच्या तिजोरीतही ठेवू शकता. मान्यतेनुसार असे केल्याने घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही.

श्रृगांराचे साहित्य

नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमीला माता राणीसाठी श्रृगांराचे साहित्य खरेदी करावे. माता दुर्गेला या वस्तू अर्पण केल्यास अखंड सौभाग्य लाभते. यामध्ये लाल कुंकू, बांगड्या, काजळ यासारख्या वस्तू अर्पण कराव्या.

रक्षासुत्र

माऊली या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रक्षासूत्राला हिंदू धर्मात खास महत्त्व आहे. नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमी तिथीला तुम्ही माऊलीची खरेदी केली किंवा बांधली तर तुम्हाला माता दुर्गेचा विशेष आशीर्वाद मिळतो. धार्मिक मान्यतेनुसार जो कोणी भक्त या दिवशी माऊलीला विकत घेऊन माता दुर्गाला अर्पण करतो आणि नंतर आपल्या हातात बांधतो, तेव्हा माता दुर्गा स्वत: त्याच्या सोबत संरक्षक कवच म्हणून राहते.

पितळाचे तांबे

नवरात्रीत अष्टमी आणि नवमीला पितळाचे तांबे खरेदी करणे शुभ मानले जाते. तसेच तांब्याचे कलश शुभ कार्यात वापरले जातात. धार्मिक मान्यतेनुसार अष्टमी आणि नवमीला तांब्याचे कलश आणल्यास घरातील दोष कमी होतात.

मोपपिस

धार्मिक मान्यतेनुसार अष्टमी आणि नवमीला घरी मोराची पिसे आणणे खूप शुभ मानले जाते. या दिवसात तुम्ही मोराचे पंख विकत घेऊन तुमच्या मंदिरात ठेवू शकता. असे मानले जाते की ज्या घरात अष्टमी आणि नवमीला मोराची पिसे विकत घेतली जातात त्या घरात धन आणि धान्याची कमतरता नसते. यासोबतच माता लक्ष्मी आणि माता दुर्गा प्रसन्न होते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND Vs New Zealand Test: भारतीय संघाची घोषणा; बुमराहची मोठी झेप! उप कर्णधारपदाची माळ पडली गळ्यात

Video: सत्तेला धरा, हीच विचारधारा!; सयाजी शिंदेंचं जुनं रिल अन् मिम्स व्हायरल

Latest Marathi News Updates: दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या सविस्तर

Sayaji Shinde NCP: "मी अनेक नेत्यांच्या भूमिका केल्या पण..."; राष्ट्रवादीत प्रवेशानंतर सयाजी शिंदेंनी मांडली भूमिका

IND vs NZ: भारताविरूद्ध घेणार आक्रमक पवित्रा; न्यूझीलंडच्या कर्णधाराने सांगितली रणनीती

SCROLL FOR NEXT