Shardiya Navratri Decoration Idea 2024 Sakal
लाइफस्टाइल

Shardiya Navratri Decoration Idea 2024: अंबाबाईचा उदो उदो..! नवरात्रीत पूजास्थळ सजवण्यासाठी 'या' वस्तूंचा करा वापर, लाभेल सुख-समृद्धी

पुजा बोनकिले

Shardiya Navratri Decoration Idea 2024: अंबााईचा उदो उदो...! देशभरात शारदीय नवरात्रीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा ३ ऑक्टोबरला नवरात्रीचा सण साजरा केला जातो. हिंदू धर्मात या सणाला खास महत्व आहे. मान्यतेनुसार या दिवसात मातेच्या नऊ रूपांची मनोभावे पूजा केली जाते. देवीच्या स्वागतासाठी पूजास्थळ आणि घराची सजावट करण्यासाठी मातेच्या आवडीच्या गोष्टींचा वापर करू शकता. तुम्ही घरी देवीची मूर्ती आणत असाल किंवा घटस्थापना करत असाल तर सुंदर पद्धतीने सजावट करू शकता. यासाठी पुढील गोष्टींचा वापर करू शकता.

केळीची सजावट

नवरात्रीत देवघराजवळ सजावटीसाठी केळींचा वापर करू शकता. केळीची पाने गोळा करा आणि देवीच्या मूर्तीच्या मागे ठेऊ शकता. तसेच काठावर देखील बांधू शकता. यानंतर प्रत्येक दिवशी फुलांच्या लांब माळा लटकवून सजावट करू शकता.

झेंडूची फुले

नवरात्रीत देवीच्या पूजेसाठी झेंडूच्या फुलांचा वापर करू शकता. यासाठी जागा निश्चित करावी. तुम्ही लाल साडीचा वापर करून देवीच्या मागे किंवा घटस्थापनेच्या मागची बाजू सजवू शकता. तुम्ही पिनच्या मदतीने फुलांच्या लांब माळा बनवून त्यांना साडीवर खाली लटकवू शकता. तुम्ही बाजारात मिळणाऱ्या कृत्रिम फुलांचा देखील वापर करू शकता.

आंब्याचे पानं

हिंदू धर्मात कोणताही सण असला की दारावर आंब्याचे तोरण बांधले जाते. असे करणे शुभ मानले जाते. नवरात्रीच्या दिवशी आंब्याच्या पानांचा वापर करून तोरण बांधून पूजास्थळाची सजावट करू शकता. तसेच झेंडूच्या फुलांचा देखील वापर करू शकता. घरातील प्रवेशद्वाराजवळ रंगीत फुलांच्या माळांनी सजावट करू शकता. यामुळे घरात सकारात्मक आणि प्रसन्न वातावरण राहते. तसेच माता दुर्गा देखील प्रसन्न होईल.

लाइटिंग

नवरात्रीत आकर्षक सजावट हवी असेल तर तुम्ही पुजास्थळी किंवा घटस्थापनेच्या जागी लाइटिंग लावू शकता. बाजारा फुलांच्या, विविध आकारात आणि रंगीत अशा प्रकारच्या लाइटिंग मिळतात. रात्रीच्या वेळी लाइटिंगमुळे घराची शोभा अधिक वाढेल.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shinde vs Bjp: शिंदे गटाने दिला भाजपलाच धक्का; बड्या नेत्याला बनवले शिवसैनिक

IND vs BAN, 2nd Test: मैदान खेळण्यास तयार नाही! तिसऱ्या दिवसाचा खेळही झाला रद्द; BCCI ने दिले अपडेट्स

Flipkart Big Billion Days Sale : लॅपटॉप घेण्याचा फक्त विचार करू नका, लगेचच घेऊन टाका! फ्लिपकार्ट सेलमध्ये लॅपटॉपवर आहे बंपर सूट

Latest Maharashtra News Live Updates: '"उच्च मतदानाचा आम्हाला फायदा होईल, लोकांना बदल हवा आहे आणि ते भाजपला कंटाळले आहेत" सचिन पायलट

World Heart Care 2024: पूर्ण झोप अन् ध्यानाने टाळा हृदयविकार, वाचा तज्ज्ञ काय सांगतात

SCROLL FOR NEXT