Sabudana ladoo recipe esakal
लाइफस्टाइल

Shravan 2024 :  पुर्वतयारी श्रावणाची! साबुदाण्याच्या पिठापासून बनतात चविष्ट लाडू, पण साबुदाण्याचे पिठ कसे बनवायचे जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

Shravan 2024 :

श्रावण महिना हिंदू धर्मात पवित्र मानला जातो. या महिन्यात अनेक व्रत वैकल्य केली जातात. श्रावणात संपूर्ण महिना उपवास करणारे अनेक लोक आहेत. तर, काही लोक श्रावणातील सोमवार,मंगळवार, गुरूवार,शनिवारीच उपवास करतात. त्यामुळे उपवासाच्या पदार्थांची रेलचेल श्रावणात असते.

साबुदाण्याची खिचडी, वडे, राजगीरा लाडू आणि बरेच गोड,तिखट, चटपटीत पदार्थ तुमच्या उपवासाची चव वाढवतात. लवकरच श्रावण महिन्याला सुरूवात होणार आहे. त्यामुळ महिलांची लगबग सुरू असेल. अनेक घरात डिंकाचे लाडू, शिंगाड्याच्या वड्या,  खोबऱ्याच्या वड्या बनवल्या जातात.

आज आम्ही तुम्हाला साबुदाण्याचे लाडू कसे बनवायचे हे सांगणार आहोत. ते तुम्ही उपवासादिवशी खाऊ शकता आणि ते पौष्टीकही असतात. साबुदाण्याचे लाडू बनवण्यासाठी लागणारे साहीत्य पाहुयात.  

साबुदाण्याचे लाडू कसे बनवायचे

साहीत्य –

  • साबुदाणा पीठ १ वाटी

  • पाऊन वाटी पिठीसाखर

  • वेलदोड्यांची पूड

  • अर्धी वाटी तूर

कृती

साबुदाण्याचे पीठ, वेलदोडे पूड आणि बारीक साखर मोठ्या परातीत एकजीव करावी. यावर पातळ तूप घालावे आणि लाडू वळावेत. साबुदाण्याचे लाडू पांढरेशुभ्र दिसतात.

एका वाटीच्या प्रमाणात ६-७ लाडू होतात. ताजे ताजे लाडू चविष्ट लागतात. आणि उपवासादिवशी खाण्यासाठी पौष्टीकही असतात.  

साबुदाण्याचे पीठ कसे बनवायचे?

एक किलो साबुदाणा घेऊन त्याला पाण्याचा हात लावून घ्या. यानंतर चमचाभर तुपात साबुदाणा गुलाबी रंगावर परतून घ्या. साबुदाणा भाजत असताना तो सतत हलवावा लागतो. नाहीतर तळाला चिटकून करपतो. साबुदाणा भाजून झाल्यावर त्याचे पीठ दळून आणावे.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra weather update: शेतकऱ्यांनो पिकांची काळजी घ्या! राज्यात पुन्हा सक्रिय पावसाची शक्यता, पुणे-मुंबईत काय असेल परिस्थिती?

आजचे राशिभविष्य - 20 सप्टेंबर 2024

अग्रलेख : एकदाच काय ते...

Sakal Podcast : तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! ते राज्यात तिसरी आघाडी जाहीर

RG Kar Doctors Strike Down : कोलकात्यातील डॉक्टरांचा संप अखेर मागे! तरीही आरजी कर कॉलेजच्या डॉक्टरांनी सरकारला दिला इशारा

SCROLL FOR NEXT