Shravan Rangoli Designs: Sakal
लाइफस्टाइल

Shravan Rangoli Designs: श्रावणी सोमवारी घराच्या अंगणात काढा सुंदर रांगोळ्या, पाहा एकापेक्षा एक डिझाईन्स

पुजा बोनकिले

Shravan Somavar Special Rangoli Designs: यंदा श्रावण महिना ५ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. श्रावणात महादेवाची मनोभावे पूजा केल्यास सर्व मनोकामना पुर्ण होतात. श्रावणात महादेवाला प्रिय असलेले धोतऱ्याचे पांढरे फुल, बेलाचे पान, विभूती अर्पण करावे. तसेच श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी अंगणात किंवा मंदिरासमोर सुंदर रांगोळी काढून महादेवाला प्रसन्न करू शकता.

श्रावणात सुंदर रांगोळी काढायची असेल तर पुढील डिझाईन पाहून काढू शकता. यामुळे घरातील अंगणाची शोभा तर वाढेलच शिवाय भोलनाथ देखील प्रसन्न होतील. गोलाकारमध्ये शिवलिंग काढून त्यावर महादेव लिहू शकता. तसेच त्याखाली गुलाबी रांगोलीचा वापर करून फुले काढू शकात.

भोलनाथाला प्रिय असलेले बेलाच्या पानाची रांगोळी काढू शकता.यामध्ये हिरव्या आणि पोपटी रंगाचा वापर करू शकता. ही रांगोळी काढण्यासाठी बेलपानाची रचना करून त्याभोवती फुलांची सजावट करू शकता. ही रांगोळ मंदिरासमोर किंवा घरातसमोर काढल्यास भगवान शंकर प्रसन्न होतील.

श्रावण सोमवारी फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे शिवलिंगाची सुंदर रांगोळी काढू शकता. त्याभोवती पिवळ्या रंगाचा वापर करून फुलाच्या पाकळ्या काढू शकता. पांढऱ्या फरशीवर ही रांगोळी अधिक सुंदर दिसते.

श्रावणात कमी वेळेत सुंदर रांगोळी काढायची असेल तर फोटोमद्ये दाखवल्याप्रमाणे काढू शकता. यासाठी काळ्या रंगाची रांगोळी वापरून शिवलिंग काढावे. दोन्ही बाजूला मुग डाळीचा वापर करून बेल पान काढावे. रांगोळीच्या खाली हर हर शंभो लिहावे.

श्रावणात फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे पांढऱ्या रांगोळीचा वापर करून शिवलिंग काढू शकता. त्यावर बेलाचे पान काढू शकता. शिवलिंगाच्या बाजूला त्रिशुळ काढावे. रांगोळीखाली ऊँ नम: शिवाय लिहावे. यामुले रांगोळीची शोभा अधिक वाढेल.

Rangoli

वरील सर्व रांगोळी डिझाईन्स दिसायला सोप्या, सुंदर आणि अनोख्या आहेत. तुम्ही कमी वेळेत देखील काढू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : राहुल गांधी यांच्यात दैवी शक्ती! महाराष्ट्रातील काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा

Latest Maharashtra News Updates : इंदापुरातून हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी! जयंत पाटलांनी केली घोषणा

Stock Market Crash: पंतप्रधान मोदींनी ज्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा दिला होता सल्ला तेच शेअर्स कोसळले

मारुती सुझुकी आणि टोयोटा एकसारख्याच गाड्या वेगळ्या नावाने का विकतात? या सणासुदीला नवीन कार घेण्याआधी ही बातमी नक्की वाचा..

Senior Citizens Care Tips: साठ वर्षानंतर 'या' टेस्ट करूनच घ्या, वाढत्या वयात आजारांपासून होईल बचाव

SCROLL FOR NEXT