Shravan Somwar 2023  esakal
लाइफस्टाइल

Shravan Somwar 2023 : भगवान शंकरांना पंचामृत का अर्पण करावं? त्याचे आयुर्वेदीक महत्त्व काय आहे?

Pooja Karande-Kadam

Shravan 2023 : आपल्या पुराणात सुरूवातीपासूनच देवाला काय अर्पण करावं, कशाचा अभिषेक घालावा याचे उल्लेख आढळतात. आज पहिलाच श्रावण सोमवार आहे. आज भक्त महादेवांच्या मंदिरात गर्दी करतात. महादेवांना आवडणाऱ्या पांढऱ्या रंगाची वस्त्र परिधान करतात. देवांच्या पिंडीवर पांढरी फुलं, पांढरेच पंचामृत नैवेद्याला देतात. या पंचामृताचे महत्व काय आहे, तुम्हाला माहितीय का?

पंचामृत म्हणजे पाच अमृत म्हणजेच पाच पवित्र वस्तू. हे मिश्रण दूध, दही, तूप, साखर आणि मध मिसळून बनविलेले पेय आहे. जे महादेवांना अत्यंत प्रिय आहे. या पंचामृताने देवांना अभिषेकही केला जातो.

काही ग्रंथांमध्ये पंचामृताचे महत्त्व सांगितले आहे की, जो मनुष्य श्रद्धेने पंचामृताचे सेवन करतो त्याला जीवनात सर्व प्रकारचे सुख-समृद्धी प्राप्त होते. देवाला अर्पण केलेले पंचामृत प्यायल्याने मनुष्य जन्म-मृत्यूच्या बंधनातून मुक्त होऊन मोक्ष प्राप्त करतो. (Shravan 2023)

आयुर्वेदातील पंचामृत

आयुर्वेदात दूध, दही, तूप, मध आणि साखर यांच्या मिश्रणाला पंचामृत म्हणतात. वाराणसीच्या एएस आयुर्वेद मेडिकल कॉलेजचे वैद्यकीय अधिकारी वैद्य प्रशांत मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे मिश्रण प्यायल्याने शरीरातील 7 धातू वाढतात.

म्हणजेच रस, रक्त, मांस, चरबी, अस्थि, मज्जा आणि शुक्र वाढवून शरीर बळकट होते. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि संसर्गजन्य आजारही टाळता येतात.

आयुर्वेदाचार्य मिश्रा यांच्या नुसार पंचामृतात सर्व गोष्टींचे विशेष प्रमाण घेतले जाते. ते बनवताना तूप आणि मधाच्या प्रमाणात विशेष काळजी घेतली जाते. कारण त्यातील तेवढेच प्रमाण विष बनते.

आयुर्वेदिक महत्त्व

पंचामृत प्यायल्याने शरीरात कॅल्शियमची कमतरता भासत नाही. पंचामृतात असलेल्या या पाच गोष्टी शरीराला कमी वेळेत अधिक ऊर्जा देतात. पंचामृताचे सेवन शरीरासाठी खूप आरोग्यदायी असते.

त्यात तुळशीचे पान घालून नियमित सेवन केल्यास कोणत्याही प्रकारचा आजार होत नाही. पंचामृताच्या सेवनाने संसर्गजन्य आजार दूर राहतात आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. यामुळे चेहऱ्याचा रंग सुधारतो आणि लालसरपणा राहतो. (Aayurveda)

पंचामृताशी संबंधित गोष्टी लक्षात ठेवा

ज्या दिवशी पंचामृत कराल त्या दिवशी ते संपवावं. दुसऱ्या दिवसासाठी ठेवू नका. पंचामृत कमी प्रमाणात घ्यावे. जसे की १ किंवा ३ चमचे प्रसाद म्हणून.

नेहमी उजव्या हाताने पंचामृत घ्या. पंचामृताचे सेवन करण्यापूर्वी ते डोक्याला लावा, नंतर घ्या. यानंतर डोक्यावर हात ठेवू नका.

पंचामृत नेहमी चांदीच्या भांड्यात करावे. चांदीच्या भांड्यात ठेवलेले पंचामृत इतके पवित्र होते की ते अनेक रोगांना पराभूत करू शकते. त्यात असणारी तुळशीची पाने त्याची गुणवत्ता आणखी वाढवतात. असे पंचामृत घेतल्याने बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्ती वाढते. (Lord Shiva)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT