Shravan Somwar 2023 : आपल्या आसपास दैवी शक्ती उपस्थित आहे याची प्रचिती आपल्याला वेळोवेळी येते. भारताला मंदिरांचा देश म्हटलं जातं. इथे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मंदिरे दिसतीस. त्या प्रत्येक मंदिराची एक कथा आहे. सध्या श्रावण महिना सुरू आहे. त्यामुळे महादेवांच्या मंदिराबद्दल माहिती घेऊयात.
भारतात भगवान शंकरांची अनेक मंदिरे आहेत. पण, असेही एक मंदिर आहे जे दिवसातून दोनवेळा अदृश्य होते. गुजरातमधील वडोदरा येथे भगवान शंकराचे एक मंदिर आहे. जे अदृश्य होते आणि नंतर अचानक पुन्हा दिसू लागते. या मंदिराच्या या चमत्कारामुळे ते जगभर प्रसिद्ध असून शंकरांचे भाविक हा चमत्कार डोळ्यांनी पाहण्यासाठी गर्दी करतात. चला जाणून घेऊया या मंदिराविषयी सविस्तर
स्तंभेश्वर महादेव मंदिर समुद्रात आहे. हे मंदिर भगवान शंकराचा पुत्र कार्तिकेय याने आपल्या तपोबलातून बांधले होते. हे मंदिर गायब होणे हा चमत्कार नसून एका नैसर्गिक घटनेचा परिणाम आहे. किंबहुना दिवसातून किमान दोनदा समुद्राची पाण्याची पातळी इतकी वाढते की मंदिर पूर्णपणे समुद्रात बुडालेले असते.
मग काही क्षणात समुद्राची पाण्याची पातळी कमी होते आणि मंदिर पुन्हा दिसू लागते. हे रोज सकाळ-संध्याकाळ घडते. भाविक या घटनेला समुद्रकिनारी भगवान शंकरांचाच चमत्कार म्हणतात. भाविकांना हे दृश्य दूरवरून पाहता येते.
मंदिराच्या बांधकामाशी संबंधित कथा
स्कंद पुराणात या मंदिराच्या बांधकामाशी संबंधित कथा आढळते. आख्यायिकेनुसार तारकासुर राक्षसाला कठोर तपश्चर्येच्या जोरावर शिवाकडून आशीर्वाद मिळाला की, त्याचा मृत्यू तेव्हाच शक्य आहे जेव्हा शिवपुत्र त्याचा वध करतो. भगवान शंकराने त्याला वरदान दिले. आशीर्वाद मिळताच तारकासुराने संपूर्ण विश्वात हाहाकार माजवण्यास सुरुवात केली.
तर दुसरीकडे शिवाच्या तेजातून जन्मलेल्या कार्तिकेयाचे संगोपन कृत्तिका करत होती. आपल्या क्रोधातून लोकांची सुटका करण्यासाठी बलरूप कार्तिकेयाने तारकासुराचा वध केला. पण तारकासुर हा शिवभक्त आहे हे कळताच तो व्यथित झाला.
त्यानंतर देवांच्या मार्गदर्शनाने त्यांनी महिसागर संगम तीर्थावर विश्वानंद स्तंभाची स्थापना केली. हे स्तंभ मंदिर आज स्तंभेश्वर मंदिर म्हणून ओळखले जाते. (Shravan 2023)
या तीर्थक्षेत्राचा उल्लेख ‘श्री महाशिवपुराणातील रुद्र संहिता भाग-2, अध्याय 11, पान क्रमांक 358 वर आढळून येतो. या मंदिरांचा शोध 150 वर्षांपूर्वी लागला असून मंदिरात स्थित शिवलिंगाचा आकार 4 फुट उंच आणि दोन फुट व्यास असा आहे. या प्राचीन मंदिरामागे अरबी समुद्रांचे विहंगम दृश्य दिसते.
इथे कसे पोहोचाल?
गुजरातमधील वडोदरा पासून ४० किमी अंतरावर जांबुसर तालुक्यात स्तंभेश्वर महादेव मंदिर आहे. हे एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. आपण रस्ते, रेल्वे आणि हवाई मार्गाने येथे पोहोचू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.