shravan special follow these tips can boost your energy levels  
लाइफस्टाइल

Shravan 2024 : श्रावणात उपवास करताना घ्या काळजी; 'हे' पदार्थ खाल तर जाणवणार नाही थकवा

जुलै महिना संपताच सणवाराला सुरुवात होते. विशेष म्हणजे श्रावण महिना महत्त्वाचा मानला जातो. सगळेचजण श्रावणाची अगदी आतुरतेने वाट पाहतात.

सकाळ डिजिटल टीम

जुलै महिना संपताच सणवाराला सुरुवात होते. विशेष म्हणजे श्रावण महिना महत्त्वाचा मानला जातो. सगळेचजण श्रावणाची अगदी आतुरतेने वाट पाहतात.

उत्तर भारतीयांच्या श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. तर, महाराष्ट्रात दक्षिण भारतीय पंचांगानुसार 05 ऑगस्ट 2024 पासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून श्रावण महिना सुरु होणार आहे. यावेळी 5 श्रावणी सोमवार येणार आहेत.

श्रावणात अनेक देवी-दैवतांची पूजा केली जाते. अनेक व्रत-वैकल्ये, उपवास केले जातात. यामध्ये श्रावणी सोमवार बहुसंख्य महिला आणि तरूणी करत असतात. पण हा उपवास करताना आरोग्याची काळजी घेणं तितकचं महत्त्वाचं असतं.

अनेकदा उपवास करताना आचरट पदार्थाचे सेवन केलं जात अन् थकवा येण यांसारख्या समस्या उद्भवायला सुरुवात होते. त्यामुळे आज आम्ही उपवासादरम्यान अशा पदार्थांचं सेवन करण्यास सांगत आहोत ज्यामुळं तुम्हाला थकवा जाणवणार नाही.

उपवासाच्या दिवशी भगर, राजगिरा, लाडू, शिंगाड्याचे पदार्थ, मोसंबी, संत्री, पेरू, अननस, अक्रोड, काजू, बदाम, खारीक अशी टणक कवच असलेली फळे सेवन करावीत. हे पदार्थ शरीराला भरपूर जीवनसत्वे देतात. त्यामुळे उर्जा मिळते आणि थकवा जाणवत नाही.

उकडलेले बटाटे

तळलेले बटाटे खाल्ल्याने चव चांगली लागते पण त्यात भरपूर कॅलरीज असतात ज्यामुळे तुम्ही अस्वस्थ आणि सुस्त होऊ शकता. म्हणून, बटाटे तळण्याऐवजी, उकडून खाल्ले तर अनेक फायदे होतात.

फळ

भरपूर फळे खा कारण ते केवळ तुम्हाला भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबरच देत नाहीत तर तुम्हाला दिवसभर उत्साही ठेवतात.

रूट भाज्या खा

बटाटा, जिमीकंद, रताळे, भोपळा, तारो या मूळ भाज्यांचा आहारात समावेश करा. त्यामध्ये व्हिटॅमिन बी, मिनरल्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात.

दूध आणि दुग्धजन्य पदार्थ

प्रथिने आणि कॅल्शियमची गरज पूर्ण करण्यासाठी तुम्ही दूध आणि दुग्धजन्य पदार्थ खाऊ शकता. यासाठी दूध आणि दुग्धजन्य पदार्थ जसे दही, ताक आणि चीज, तूप यांचा आहारात समावेश करता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT