Shravan Special:  Sakal
लाइफस्टाइल

Shravan Special: श्रावणात व्हिटॅमिन बी १२ ची जाणवणार नाही कमतरता, आहारात करा 'या' शाकाहारी पदार्थांचा समावेश

पुजा बोनकिले

Shravan Special: श्रावण ५ ऑगस्टपासून सुरू झाला आहे. श्रावणात महादेवाची मनोभावे पूजा केल्यास मनोकामना पुर्ण होतात. तसेच अनेक लोक श्रावणात उपवास करतात. निरोगी राहण्यासाठी प्रथिनांसह व्हिटॅमिन बी 12 शरीरासाठी खूप गरजेचा आहे. शरीरात या व्हिटॅमिनची कमतरता असेल तर अनेक आजार निर्माण होऊ शकते. यामुळे श्रावणात पुढील पदार्थांचा समावेश करू शकता.

ब्रोकोली

ब्रोकोली आरोग्यदायी असते. ब्रोकोली खाल्याने व्हिटॅमिन बी 12 कमतरता भरून निघते. याशिवाय अनेक आजार दूर राहतात. श्रावणात ब्रोकोली खाऊन तुम्ही व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता पूर्ण करू शकता.

सोयाबीन

सोयाबीन अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. तसेच त्यात व्हिटॅमिन बी12 मुबलक प्रमाणात असते. यापासून बनवलेले पदार्थ श्रावणात खाऊ शखता.

पालक

पालक देखील व्हिटॅमिन बी 12 चा समृद्ध स्रोत आहे. पालकामध्ये व्हिटॅमिन बी12 मुबलक प्रमाणात आढळते. तुम्ही भाजी किंवा सूप यासारखे पदार्थ बनवून सेवन करू शकता.

दुग्धजन्य पदार्थ


दूधात व्हिटॅमिन बी 12 मुबलक प्रमाणात असते. तुम्हा दुधापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन करू शकता. दूध, दगी,पनीर यासारख्या पदार्थांचा समावेश करू शकता

ओट्स


ओट्स आरोग्यासाठीही फायदेशीर आहेत. ओट्समध्ये अनेक पोषक घटक असतात जे शरीरातील व्हिटॅमिन बी 12 ची गरज पूर्ण करू शकतात. तुम्ही श्रावण महिन्यात ओट्सपासून बनवलेले पदार्थ खाऊ शकता.

बीट

बीटरूटमध्ये व्हिटॅमिन बी 12 मुबलक प्रमाणात असते. लोहाची कमतरता बीटरूट खाल्ल्याने भरून काढता येते. आरोग्य चांगले राहण्यासाठी दररोज सकाळी बीटचा रस पिऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dasara Melava Rally: प्रचार तोफांची आज पहिली सलामी; जाणून घ्या कोणत्या नेत्याचा कुठं होणार दसरा मेळावा

Bagmati Express Accident: मोठा रेल्वे अपघात! वेग 75 किमी, बागमती एक्स्प्रेस मुख्य मार्गाऐवजी लूप लाइनमध्ये घुसली; 19 प्रवासी जखमी

Dussehra Melava 2024 Live Updates: विजयादशमीनिमित्त माँ कामाख्या देवी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

अग्रलेख : अपने अपने रावण!

Dussehra 2024 Wishes: 'वाईटावर चांगल्याचा आणि अधर्मावर धर्माचा विजय..' दसऱ्याच्या प्रियजनांना द्या मराठमोळ्या शुभेच्छा

SCROLL FOR NEXT