Lord Ganesha Vastu Tips esakal
लाइफस्टाइल

Lord Ganesha Vastu Tips : गणपती बाप्पांचा वर्षभर हवाय आशीर्वाद, या यंत्राची घरात करा स्थापना, संकटाच्या फेऱ्यातून होईल सुटका

Shri Ganesh Yantra : गणपती बाप्पा नेहमी तुमच्या घरात राहून तुमचे विघ्न दूर करावेत असे वाटत असेल तर तुम्ही एक उपाय करू शकता.

सकाळ डिजिटल टीम

Shri Ganesh Yantra :

हिंदू धर्मात सुखकर्ता गणेशाला अनन्यसाधारण महत्व आहे. गणपती बाप्पाची पूजा करून एखादे काम केले तर ते सुखरूप पार पडते अशी भावना आहे. त्यामुळेच गणपती बाप्पाचे नाव घेऊन एखादे काम सुरू केले जाते. किंवा लांबचा प्रवास सुखरूप व्हावा म्हणूनही गणेशाचा जयघोष केला जातो.

कुंडलीत असलेले दोष, घरात असलेले वास्तुदोष यांचा प्रभाव कमी करण्यासाठी सुद्धा गणपती बाप्पा आपल्या मदतीला धावून येतात.गणपती आपल्याकडे पाच दिवसांसाठी येतात. आणि ते आनंदाचा, सौभाग्याचा आणि धनसंपत्तीचा आशीर्वाद देऊन जातात.

गणपती बाप्पा गेल्यानंतर आपल्याला घर खायला उठतं. नुकतेच घरगुती गणपतीचे विसर्जन झाले आहे. गणपती बाप्पा नेहमी तुमच्या घरात राहून तुमचे विघ्न दूर करावेत असे वाटत असेल तर तुम्ही एक उपाय करू शकता.

ज्योतिष तज्ञ डॉ. राधाकांत वत्स त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, ज्योतिष शास्त्रात जितके शुभ गणेशाची पूजा करणे आहे तितकेच किंवा त्याहून अधिक जास्त शुभ श्री गणेश यंत्राची पूजा करणे मानले जाते.

असे दिसते गणेश यंत्र

ज्योतिषी डॉ. राधाकांत यांनी श्री गणेश यंत्राची माहिती दिली आहे. हे यंत्र स्थापन कसे करावे, त्याची पूजा कशी करावी, तसेच त्यापासून आपल्याला काय लाभ होतात याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

कधी स्थापन करावे?

गणेश यंत्र हे गणेश चतुर्थी दिवशी स्थापित करायचे असते. पण दर महिन्यात एकदा येणाऱ्या संकष्टी चतुर्थी दिवशी सुद्धा तुम्ही याची स्थापना घरी करू शकता. तुम्ही हे यंत्र घरी आणून त्याला कच्च्या दुधाने अभिषेक खालून त्याची पूजा करावी.

अभिषेक केल्यानंतर गणेश यंत्र आपल्या देवघरात स्थापन करावे आणि त्यावर अक्षता वाहव्यात. त्यानंतर गणेश यंत्रावरती फुले घालून चंदनाचा टिळा लावावा.

श्री गणेश यंत्रावर लिहिलेल्या मंत्रांचा 108 वेळा जप करावा. तसेच श्रीगणेशाचे नमन करून रोजच या यंत्राची पूजा करावी.

गणेश यंत्राने आपल्याला कोणते लाभ होतात?

श्री गणेश यंत्राचे स्वामी शुक्र आहेत. त्यामुळे घरात गणेश यंत्र स्थापित केल्याने शुक्र ग्रह फलदायी ठरतो. गणेश यंत्रांच्या प्रभावाने आपल्याला यश, प्रगती, आपले मनोबल वाढते आपली ख्याती जगभर पसरते. तसेच आर्थिक स्थितीमध्ये अफाट असा फरक पडतो. आर्थिक अडचणी दूर झाल्याने आपल्या घरातील आर्थिक संकट पळून जातात.

श्री गणेशाची पूजा करताना संकटनाशक गणेश स्तोत्राचे वाचन नक्की करावे. या यंत्राचा प्रभाव तुमच्या जीवनावरती सकारात्मक पडतो. घरातील वाद, भांडण संपून जातात, कुटुंबांमध्ये एकोपा वाढतो, घरात कशाचीही कमी पडत नाही.

घरात हे यंत्र स्थापन केल्याने आपल्या मुलांची बुद्धी वाढते. ते अभ्यासात हुशार होतील. तसेच मुलांच्या यशात तसेच तुमच्या कामात अडथळा ठरणाऱ्या गोष्टीही दूर होतील. एकूणच घरातील सर्व समस्या निघून जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: पुणे-बंगळूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

Mumbai Voting: मतदानाच्या पार्श्वभूमीवर मेट्रो आज मध्यरात्रीपर्यंत धावणार

Supriya Sule: ऑडिओ क्लिप प्रकरण; ते सांगतील त्या ठिकाणी येऊन उत्तर देण्याची माझी तयारी, सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं

Beed News : ‘शिक्षण फुकट असतं, तर माझं लेकरू गेलं नसतं’

Gold Price: अचानक सोनं झालं स्वस्त... पण लवकरच भाव 1 लाखांच्या पुढे जाणार; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT