shopping store esakal
लाइफस्टाइल

खाण्यापासून शॉपिंगपर्यंत कोरोनामुळे बदलल्या लोकांच्या सवयी!

भारतीय ग्राहकांना त्यांच्या घरात बंदिस्त करून आणि निर्बंधांसह जगून अनेक दिवस उलटून गेले.

सकाळ वृत्तसेवा

भारतीय ग्राहकांना त्यांच्या घरात बंदिस्त करून आणि निर्बंधांसह जगून अनेक दिवस उलटून गेले.

कोरोना (Corona) महामारीमुळे अनेकांची जगण्याची पद्धतच बदलली आहे. त्यामुळे अद्याप जगण्याच्या नवीन पद्धतीची काहींना पूर्णपणे सवयही झालेली नाही. भारतीय ग्राहकांना त्यांच्या घरात बंदिस्त करून आणि निर्बंधांसह जगून अनेक दिवस उलटून गेले. या कालावधीत ग्राहकांनी काही जुन्या सवयी पूर्णपणे बदलल्या आहेत तर काहीजण आणखीन कसं जगायचे हे विचार करत आहेत. कॅंटर (Cantor) ने 2022 साठी 10 प्रमुख व्यवहारांसाठी वार्षिक ट्रेंड 2022 जारी केले आहेत.

मोठ्या आयुष्यासाठी छोटे प्रयत्न:

पूर्वी मोठी शहरे तरुणांच्या स्वप्नांना, आकांक्षांना बोलवत असत. त्यामुळे घर- घरं, बाहेरची गर्दी, बिझी टाइमटेबल यांनी त्याचं आयुष्य वेढलं होतं. आता या शहरांमध्ये गुंतलेले मिलेनियल्स (1981 नंतर जन्मलेले) आहेत ते बिझी कॉर्पोरेट लाइफस्टाइलमधून (Lifestyle) सुटका शोधत आहेत.

घरचे अन्न मिळाले:

कोरोना साथीच्या रोगामुळे ग्राहकांना आरोग्य (Health) आणि प्रतिकारशक्तीचे महत्त्व समजले आहे. ग्राहक अन्नाबाबत अधिक सावध झाले आहेत. 72 टक्के ग्राहक पॅकबंद अन्नापेक्षा घरी शिजवलेले अन्न खाण्यास पसंत करतात. जर अन्न स्वतःच्या स्वयंपाकघरात तयार केले जात नसेल तर अशा ठिकाणी प्राधान्य दिले जाते. जे स्वच्छता आणि गुणवत्तापूर्ण अन्न खायला मिळेल. 44 टक्के लोक म्हणतात की, आजकाल ऑनलाइन अन्न सुरक्षित मिळत नाहीत.

कौशल्य वाढीसाठी अधिक सक्रियता:

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या मते, 2022 पर्यंत मशीन्स 75 कोटी नोकऱ्या काढून टाकतील. त्याच वेळी, मशीन चालविण्यासाठी 13.3 कोटी नवीन रोजगार निर्माण होतील. कोरोना साथीच्या आजारामुळे कंपन्यांनी डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनवरही लक्ष केंद्रित केले आहे. या कारणास्तव, ग्राहक कौशल्य वाढीसाठी यावर्षी अधिक सक्रिय असतील. 65 टक्के शिकणाऱ्यांचे म्हणणे आहे की ते त्यांचे करिअर (Career) मजबूत करण्यासाठी कौशल्ये विकसित करत आहेत. यामध्ये 33 टक्के शिकणारे वरिष्ठ अधिकारी आहेत.

गिग जॉबचे आकर्षण:

कोरोना महामारीमुळे भारतातील फ्रीलान्स जॉब मार्केटमध्ये तेजी आली आहे. कामाच्या वेळेतील लवचिकतेमुळे ग्राहक गिग जॉब्सकडे आकर्षित होत आहेत. दुसरीकडे, पाश्चात्य देशांच्या राजीनाम्याचा ट्रेंड भारतातही दिसू लागला आहे. भारतातील 62 टक्के कामगार यावर्षी नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत. बहुतेक गिग कामगार जास्त कमाईच्या संधी आणि कामाच्या तासांमध्ये लवचिकतेला महत्त्व देत आहेत. 1.5 कोटी फ्रीलांसरसह भारत हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे गिग मार्केट आहे.

खाजगी जागेचा अभाव:

या दिवसात अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम (Work from home) करायला सुरवात केली. कामगार कधीही कामासाठी उपलब्ध होणे अपेक्षित होते. परंतु या दिवसात काहींंचे काम आणि वैयक्तिक जीवन प्रभावित होऊ लागले. भारतातील 3 पैकी 1 कामगाराला असे वाटते की ते कामाचा ओव्हरलोड आणि अनियंत्रित तणाव अनुभवत आहेत. कर्मचारी त्यांची वैयक्तिक जागा (Personal space) शोधत आहेत जी घर आणि कामाच्या जबाबदाऱ्यांमध्ये कमी झाली आहे.

घरातून बाहेर जाण्याची इच्छा:

लोक आता सामाजिक अंतर आणि प्रवास निर्बंधांच्या नियमांमुळे घरात राहून राहून कंटाळलेले आहे. त्यामुळे लोकांना घराबाहेर पडावेसे वाटत आहे. प्रवासी निर्बंध शिथिल केल्याने रेस्टॉरंट्समध्ये गर्दी होत आहे. रेस्टॉरंटमधील सरासरी ऑर्डर मूल्य 20 टक्क्यांनी वाढले आहे. घरातून काम करताना लाइफस्टाइलवर परिणाम होत असल्याने ग्राहकही बाहेर खर्च करण्यास उत्सुक आहेत. डाइनआउट (Dineout)च्या मते, लक्झरी डायनिंगमध्ये 120 टक्के वाढ झाली आहे.

सोशल मीडिया बनले नवे शॉपिंग स्टोअर :

कोरोना महामारीच्या काळात ई-कॉमर्सच्या वाढीसह, सोशल कॉमर्स देखील ऑनलाइन खरेदीसाठी एक पसंतीचे ठिकाण म्हणून उदयास आले आहे. सोशल मीडियाद्वारे खरेदी केल्याने ग्राहकांना असा अनुभव मिळतो जो ऑनलाइन स्टोअरच्या वातावरणात उपलब्ध नव्हता. लोक चर्चा, डायरेक्ट मेसेजिंग आणि व्हिडिओ शेअरिंग यांसारख्या वैशिष्ट्यांसह सामाजिक व्यापाराकडे वळत आहेत. वाटकंसल्ट (Wattconsult) नुसार, देशातील एकूण ऑनलाइन खरेदीदारांपैकी 53 टक्के खरेदीदार सोशल कॉमर्सद्वारे खरेदी करत आहेत.

स्वत:ची काळजी घेणे :

मर्यादित सामाजिक संवादाच्या युगात चांगले दिसण्याकडे अनेकांचा कल आहे. आता लोक निसर्ग, आरोग्य आणि निरोगी जगण्यासाठी स्वत:ची काळजी घेत आहेत. ग्राहक आता आपल्या आरोग्याची काळजी घेण्याबाबत अधिक जागरूक झाले आहेत. यामुळेच स्वत: च्या आरोग्यासाठी उत्पादने निवडताना अधिक काळजी घेतली जात आहे आणि पूर्ण तपासणी केल्यानंतरच खरेदी करत आहेत.

ब्रँडचे मूल्यांकन:

सामाजिक समानतेचे समर्थन करणार्‍या ब्रँडकडे ग्राहक वाढत्या प्रमाणात आकर्षित होत आहेत. चळवळीत आघाडीवर असलेली झेड पिढी आता प्रामाणिक दिसणार्‍या ब्रँडचे स्व-मूल्यांकन करत आहे. आजुबाजूला बदल घडवून आणण्यासाठी ही पिढी कृतिशील (Creative) पावले उचलत आहे. डेलॉयट (Deloitte)च्या 2021 मिलेनियल अॅंड जेन जेड स्टडी च्या ( Millennial and Gen Z) अभ्यासानुसार, भारतातील Z पिढीपैकी 36 टक्के लोक मूल्यांकनाबाबत स्वयं-शिक्षित आहेत. त्याच वेळी, 37 टक्के लोकांनी त्यांच्या सभोवतालच्या लोकांना शिक्षित करण्याचा आणि त्यांचे विचार बदलण्याचा प्रयत्न केला.

वातावरणाला घेऊन जागरुक:

कोरोना साथीमुळे माणसांच्या निष्काळजीपणामुळे पर्यावरणाचे होणारे नुकसान कमी झाले आहे आणि ते अधिक चांगले करण्यासाठी सगळेजण काळजी घेताहेत. केंटर सस्टेनेबिलिटी फंडामेंटल्स रिपोर्ट 2021 नुसार, 76 टक्के लोक बातम्यांमध्ये दिसणार्‍या पर्यावरणीय आणि सामाजिक समस्यांकडे लक्ष देत आहेत. तर 77 टक्के ग्राहक चांगले काम करणाऱ्या कंपन्यांमध्ये वेळ आणि पैसा गुंतवण्यास इच्छुक आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Constituency: मनसेनं २००९ मध्ये कोणते मतदारसंघ जिंकले होते? ते आमदार आता कुठे आहेत? राज ठाकरेंना पुन्हा यश येणार?

Latest Marathi News Updates live : shivsena live: शरद पवार उद्यापासून विदर्भ दौऱ्यावर, राज्यात ५५ पेक्षा जास्त सभा घेणार

Tax Evasion: देशात 18,000 बनावट कंपन्या; सरकारची 25,000 कोटी रुपयांची फसवणूक, काय आहे प्रकरण?

शेवटी आईच ती! दिवाळीच्या सुट्ट्या संपवून शूटिंगला परतणाऱ्या सिम्बाला निरोप देताना हमसून रडली माउली, नेटकरी म्हणाले-

Sawantwadi Election : सावंतवाडीत राजकीय 'संशयकल्लोळ'; बंडखोरीमुळे मतदारसंघात पेच, कोण कोणाची मते पळवणार?

SCROLL FOR NEXT