मुंबई : आज स्मार्टफोन, लॅपटॉप यासारखी गॅजेट्स प्रत्येकाच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनली आहेत. स्मार्टफोनपासून काही क्षण दूर राहिल्यानंतरही लोक अस्वस्थ होतात. बरेच लोक रात्री उशिरापर्यंत सोशल मीडियावर सक्रिय असतात, गेम खेळत असतात, यूट्यूबवर चित्रपट किंवा व्हिडिओ पाहत असतात.
या गॅजेट्समुळे आपले सर्व काम सोपे झाले असेल, परंतु तंत्रज्ञानाचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होताना दिसून येत आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, स्मार्टफोनच्या जास्त आणि चुकीच्या वापरामुळे दृष्टी, डोकेदुखी, सांधेदुखी, थकवा यासारख्या समस्या उद्भवतात, प्रजनन क्षमतेवरही परिणाम होतो.
तंत्रज्ञानाच्या जास्त वापरामुळे सेक्स हार्मोन्स (इस्ट्रोजेन, महिलांमध्ये प्रोजेस्टेरॉन आणि टेस्टोस्टेरॉन, पुरुषांमधील ल्युटेनिझिंग) आणि डीएनएवर विपरीत परिणाम होतो, ज्यामुळे प्रजनन क्षमता 30 ते 40 टक्क्यांनी कमी होऊ शकते.
स्मार्टफोन रेडिएशनचा आरोग्यावर परिणाम-
मोबाईल फोन कमी पातळीवर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन उत्सर्जित करतात, ज्याला रेडिओ फ्रिक्वेन्सी एनर्जी किंवा रेडिओ लहरी म्हणतात. त्यामुळे मोबाइलच्या रेडिएशनचा आपल्या शरीरावर किती परिणाम होतो ते त्याच्या वारंवारतेवर अवलंबून असते.
सामान्यतः 2G, 3G आणि 4G ची रेडिएशन वारंवारता 0.7 ते 2.7 GHz असते. तर 5G फोनची वारंवारता 80 GHz आहे. एवढेच नाही तर वायफाय आणि ब्लूटूथ 2.4 GHz रेडिएशन देखील उत्सर्जित करतात. हेही वाचा - भारतीय उत्पादनांच्या खरेदीतली वाढ बनवेल देशाला आर्थिक महासत्ता...
काही शास्त्रज्ञ मोबाईलमधून निघणाऱ्या रेडिएशनला नॉन-आयनीकरण रेडिएशन मानतात. म्हणजेच, कमी वारंवारता आणि कमी उर्जा रेडिएशन शुक्राणूंच्या डीएनएला नुकसान करत नाही. परंतु 2018 मध्ये, शास्त्रज्ञांनी मानव आणि प्राण्यांवर केलेल्या 27 संशोधनांच्या आधारे, हे सिद्ध झाले आहे की मोबाइल फोनमधून उत्सर्जित होणारे निम्न-स्तरीय इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन प्रजनन क्षमतेच्या मापदंडांवर परिणाम करते.
या ठिकाणी मोबाईल ठेवणे ठरेल घातक
१. जीन्स किंवा पँटच्या खिशात ठेवणे-
तज्ज्ञांच्या मते, मोबाईल फोन बॅगऐवजी पँट किंवा जीन्सच्या पुढच्या खिशात ठेवल्याने रेडिएशनचा धोका दोन ते सात पटीने वाढतो. कारण फोन वापरला असो वा नसो तो थोड्या प्रमाणात रेडिएशन प्रसारित करत राहतो.
2015 मध्ये इंटरनॅशनल जर्नल ऑफ फर्टिलिटी अँड स्टेरिलिटीच्या संशोधनानुसार, मोबाईल फोन खिशात ठेवण्याचा परिणाम शारीरिक रचनेमुळे महिलांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त होतो.
साहजिकच, पुरुषांच्या वृषणाचे तापमान शरीराच्या तापमानापेक्षा कमी असते ज्यामध्ये शुक्राणू तयार होतात. खिशातील मोबाईल वृषणाचे तापमान वाढवतो, ज्यामुळे शुक्राणू तयार होण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होतो आणि शुक्राणूंची संख्या कमी होऊ शकते.
एवढेच नाही तर जीन्स किंवा पँटच्या मागच्या खिशात स्मार्टफोन ठेवल्यानेही अनेक समस्या उद्भवू शकतात. उठता-बसता फोन तुटण्याची किंवा खिशातून पडण्याची भीती कायम असते. फोनमधून निघणाऱ्या रेडिएशनमुळे पोट आणि पाय दुखू शकतात. त्यामुळे तुम्ही त्याबाबत सावधगिरी बाळगली पाहिजे.
२. फोन ब्रामध्ये ठेवणे-
शास्त्रज्ञांनी संशोधनानंतर असे समजून आले आहे की, फोनमधून बाहेर पडणाऱ्या रेडिएशनमुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो आहे. हे खरे असले तरी सध्या स्मार्टफोन्स महिलांना त्यांच्या ब्रामध्ये नेण्याइतके लहान नाहीत. पण कोणत्याही बळजबरीने किंवा गर्दीच्या ठिकाणी जाताना फोन ब्रामध्ये ठेवला तर ते आरोग्यासाठी हानिकारक आहे.
३. बॅगमध्ये स्लिंग किंवा मोबाईल फोन घेऊन जाणे –
कामावर जाताना किंवा पार्टीला जाताना सोयीसाठी स्त्रिया बर्याचदा स्लिंग बॅगमध्ये स्मार्टफोन घेऊन जातात, जे त्यांच्या नितंबांवर किंवा मांडीला टांगलेले असतात. संशोधनात असे दिसून आले आहे की, फोनच्या रेडिएशनमुळे त्यांच्या नितंब किंवा मांड्यांभोवतीची हाडे कमकुवत होण्याची शक्यता असते. हे पाहता महिलांनी शक्य तितक्या मोठ्या पिशव्या वापरणे गरजेचे आहे.
४. फोन चेहऱ्याजवळ ठेवणे -
शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, स्वच्छता राखूनही, आपल्या सेल फोनची स्क्रीन असंख्य अदृश्य जीवाणूंचे घर आहे. तरीही कळत-नकळत फोन करताना आपण कानाला चिकटवून आणि चेहऱ्याजवळ बोलत असतो. अशा परिस्थितीत आपल्या त्वचेत बॅक्टेरियाचा संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे अनेक प्रकारच्या त्वचेच्या आजारांसोबतच आरोग्याशी संबंधित इतर समस्याही उद्भवू शकतात.
५. झोपताना उशीखाली ठेवणे –
रात्री उशिरापर्यंत स्मार्टफोन पाहणे आणि झोपताना उशीखाली किंवा त्याच्या आजूबाजूला ठेवणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. मोबाईलचा निळा प्रकाश झोपेच्या सर्केडियम लयमध्ये व्यत्यय आणतात.
जर झोप किंवा सर्केडियमची लय दीर्घकाळ चांगली नसेल तर इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन यांसारख्या सेक्स हार्मोन्सचा त्रास होतो.अंडाशयात असलेल्या अंड्यांचा दर्जा प्रभावित होतो आणि प्रजननक्षमतेवर परिणाम होतो. फोनच्या इलेक्ट्रोमॅग्नेट वेव्हजमुळे महिलांना डोकेदुखी, चक्कर येणे अशा समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.