Effective Tips to Keep Your Walls Dry This Monsoon Season esakal
लाइफस्टाइल

Monsoon Wall Care : पावसाळ्यात ओल्या भिंतींचं टेन्शन येतय? अगदी सोप्या पद्धतीने घ्या घरातल्या भिंतींची काळजी

Monsoon Wall Waterproofing : पावसाळा आल्हाददायक ऋतु असला तरी अनेक समस्या घेऊन येतो आणि त्यापैकीच एक म्हणजे घराच्या भिंतींमध्ये येणारा ओलसरपणा.अश्यात घरातल्या भिंती कोरड्या कश्या ठेवायच्या यासाठी काही सोप्या पद्धती सांगितल्या आहेत.

Saisimran Ghashi

Monsoon Home Care : पावसाळा आल्हाददायक ऋतु असला तरी अनेक समस्या घेऊन येतो आणि त्यापैकीच एक म्हणजे घराच्या भिंतींमध्ये येणारा ओलसरपणा.ओलसर भिंती केवळ वाईट दिसत नाहीत तर कालांतराने त्यामुळे मोठे नुकसानही होऊ शकते.भिंत पडू शकते,त्याला बुरशी लागणे किंवा शेवाळ पडकणे यांच्यासारख्या समस्या येऊ शकतात.त्यामुळे वेळीस अश्या भिंतींची दुरुस्ती करून घेणे गरजेचे आहे. तर आम्ही तुम्हाला याच्यासाठी काही महत्वाच्या उपाययोजना सांगणार आहोत.

वॉटरप्रूफिंगचे दोन प्रकार

इंटिग्रल वॉटरप्रूफिंग यामध्ये वॉटरप्रूफिंग कंपाऊंड सिमेंटमध्ये मिसळून प्लास्टरिंग आणि क्रॅक भरण्यासाठी वापरले जाते. बॅरियर वॉटरप्रूफिंग यामध्ये वॉटरप्रूफिंग कंपाऊंडचा वापर थेट भिंतींवर रंगविण्यासाठी केला जातो.

वॉटरप्रूफिंग इंजेक्शन

छत किंवा भिंतीतील तडे भरण्यासाठी इंजेक्शन ग्रॉउटिंगचा वापर केला जातो. यामध्ये वॉटरप्रूफ केमिकल उच्च दाबाने भितींवरील भेगांमध्ये भरले जाते. दाबामुळे केमिकल आत खोलवर जाते आणि तडा पूर्णपणे भरली जाते.

घर बांधल्यानंतरही वॉटरप्रूफिंग

घर बांधत असतानाच वॉटरप्रूफिंग केले पाहिजे, असा विचार करण्याची गरज नाही. ओलसरपणा टाळण्यासाठी वॉटरप्रूफिंग नंतर केले जाऊ शकते. भिंतीवरून जुना पेंट काढून टाकला जातो आणि वॉटरप्रूफिंग कंपाऊंड वापरला जातो.

भिंतींवरील भेगा भरणे

भिंतींवरील भेगा भरण्यासाठी सिमेंटचा वापर करू नये.वॉटरप्रूफिंग कंपाऊंडचा वापर करावा.बाहेरील भिंतींवर वॉटरप्रूफ पेंट लावू शकता.

वॉटरप्रूफ पेंट खरेदी करताना लक्षात ठेवा.

  • पेंटचा फैलाव २०० ते ६०० टक्क्यांच्या दरम्यान असावा.

  • भिंतीतील भेगा भरण्याची क्षमता किमान २ मिमी असावी.

  • पेंट सुकल्यानंतर भिंतीवरील पेंटची जाडी १८० मायक्रॉन ते २४० मायक्रॉन दरम्यान असणे आवश्यक आहे.

वॉटरप्रूफिंगची योग्य पद्धत निवडण्यासाठी आणि काम करण्यासाठी तुम्ही नेहमीच अनुभवी व्यावसायिकाचा सल्ला घ्या.वॉटरप्रूफिंग केल्यानंतरही, नियमितपणे भिंती तपासत राहा आणि कोणत्याही नवीन भेगा किंवा ओलसरपणाची लक्षणे दिसल्यास त्वरित दुरुस्ती करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Latest Marathi News Updates live : पुण्यातील नवले पुलावर 2 वाहनांचा अपघात, 3 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT