लाइफस्टाइल

Republic Day Look : प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी असं व्हा तयार, मेकअपमधून दाखवा देशभक्तीची झलक

प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी असं व्हा तयार...

Aishwarya Musale

26 जानेवारी हा प्रत्येक भारतीयासाठी खूप खास दिवस आहे. या दिवशी भारतात प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. दरवर्षी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन भारताच्या कानाकोपऱ्यात साजरा केला जातो. या दिवशी शाळा, महाविद्यालये, कार्यालये तसेच परिसर आणि सोसायटीमध्ये उत्सव साजरा केला जातो.

या खास दिवसाला आणखी खास बनवण्यासाठी प्रत्येकजण तिरंग्याच्या रंगात सजलेला दिसत असतो. विशेषतः जर आपण महिलांबद्दल बोललो तर प्रजासत्ताक दिनी त्या खूप वेगळ्या पद्धतीने तयार होतात. तुम्हालाही यावर्षी तुमच्या पोशाखातून देशभक्तीची झलक दाखवायची असेल तर या टिप्स नक्की फॉलो करा.

ट्राय कलर दुपट्टा घाला

या प्रकारचा ट्राय कलर दुपट्टा तुम्ही तुमच्या सिंपल पांढऱ्या सूटसोबत कॅरी करू शकता. यासोबतच कपाळावर टिकली नक्की लावा. त्यासोबत तुमचा लुक सुंदर दिसेल.

ट्राय कलर सूट

या प्रकारचा ट्राय कलर सूट तुम्ही ट्राय करू शकता. भगवा दुपट्टा, हिरवा सलवार आणि पांढरा कुर्ता प्रजासत्ताक दिनी तुमचा लूक पूर्ण करण्यात मदत करेल.

मेकअप

प्रजासत्ताक दिनी तुमचा मेकअप खास पद्धतीने करा. यासाठी डोळ्यांवर ट्राय कलर आयशॅडो लावू शकता. यासाठी डोळ्यांच्या डाव्या बाजूला ऑरेंज आय शॅडो, उजव्या बाजूला हिरवा आय शॅडो आणि त्यांच्यामध्ये व्हाईट आय शॅडो लावा.

नेल आर्ट

तुम्हाला काही खास करायचं असेल तर तुम्ही तुमच्या नखांवर अशा प्रकारची डिझाइन करू शकता. यामुळे तुमचा लूक आणखी सुंदर होईल.

खादीचे कपडे घाला

देशभक्तीची झलक दाखवण्यासाठी तुम्ही आत्मनिर्भर भारत मोहिमेला पाठिंबा देऊ शकता. यासाठी तुम्ही खादीचे कपडे घातले तरी तुमचा लूक खूपच क्यूट दिसेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाविकास आघाडी सरकार स्थापन करेल; शिवसेनेच्या (UBT) नेत्याचा दावा

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT