skin sakal
लाइफस्टाइल

Skin Care: फेसवॉश करताना चुकूनही करू नका या चुका, चेहरा होऊ शकतो खराब

चेहरा धुताना कोणती काळजी घ्यावी, तसेच कोणत्या चुका करणे टाळावे हे जाणून घेऊया.

Aishwarya Musale

फेस वॉश हा रोजच्या दिनचर्येचा एक भाग आहे. काही लोक सामान्य पद्धतीने फेस वॉश करतात, तर काही लोक स्किन केअरमुळे विशेष पद्धतींचा अवलंब करतात. पण अनेक वेळा चेहरा व्यवस्थित धुतल्यानंतरही त्वचा खडबडीत आणि कोरडी दिसू लागते.

त्यामुळे कधी-कधी पिंपल्सची समस्याही सामान्य होते. चेहरा धुणे हे सोपे काम आहे असे दिसते, परंतु यादरम्यान केलेल्या काही चुका त्वचेच्या समस्यांचे कारण बनतात. चला तर मग जाणून घेऊया चेहरा धुण्याची योग्य पद्धत.

फेस वॉशची निवड - बहुतेक लोक चेहरा धुताना कोणताही फेस वॉश वापरतात. त्यामुळे कोरडी त्वचा आणि पिंपल्स सारख्या सामान्य त्वचेच्या समस्या दिसून येतात. म्हणूनच तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार योग्य फेसवॉश वापरणे फार महत्वाचे आहे.

गरम पाण्याचा वापर - उन्हाळ्यात टाकीतील पाणी खूप गरम होते. अशा परिस्थितीत लोक या पाण्याने तोंड धुतात. चेहरा धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर टाळावा.

त्यामुळे त्वचेचे नैसर्गिक तेल कमी होऊ लागते आणि त्वचा कोरडी आणि निर्जीव होऊ शकते. म्हणूनच चेहरा धुण्यासाठी गरम पाण्याऐवजी नॉर्मल पाण्याचा वापर करा.

वेट वाइप्सचा वापर – चेहरा स्वच्छ करण्यासाठी अनेकजण वेट वाइप्सचा वापर करतात. परंतु अनेक वेळा ते त्वचा पूर्णपणे स्वच्छ करू शकत नाहीत, तसेच ते केमिकलवर आधारित असतात.

ज्यामुळे पोर्स क्लॉग होऊ शकतात, ज्यामुळे तुम्हाला ब्रेकआउटची समस्या होऊ शकते. म्हणूनच वेट वाइप्सचा वापर कमीत कमी करण्याचा प्रयत्न करा.

घाणेरड्या टॉवेलचा वापर - स्किन केअरमध्ये केवळ चेहरा धुणेच नाही तर ते पुसणे देखील महत्त्वाचे आहे. कारण तुमचा टॉवेल देखील त्वचेच्या समस्येचे कारण बनू शकतो.

खरे तर लोक तोच टॉवेल अनेक दिवस सतत वापरत असतात. ज्यामुळे बॅक्टेरिया त्वचेत जातात आणि तुम्हाला त्वचेशी संबंधित अनेक समस्या असू शकतात. म्हणूनच नेहमी स्वच्छ टॉवेल वापरा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explained: डोनाल्ड ट्रम्प जिंकले तर शेअर बाजार कोसळणार; कमला हॅरिस अध्यक्ष झाल्यास काय होईल?

Pandharpur Vidhansabha: पंढरपूरात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण ?

Latest Marathi News Updates live : अजित पवार गटातील कार्याध्यक्ष, जनरल सेक्रेटरींची शरद पवारांच्या पक्षात घरवापसी

Mobile Addiction : दिवाळीच्या सुट्टीत पालकांना ब्लॉक करून मुले रिल्स, गेम्सच्या आहारी....सोशल मीडियावर नको ते उद्योग

US Election : अमेरिकेला मिळणार पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष? कमला हॅरिस यांच्या गावी विजयाची उत्कंठा

SCROLL FOR NEXT