Skin Care  esakal
लाइफस्टाइल

Skin Care : काळवंडलेल्या काखेची लाज वाटते? या उपायांनी काख उजळा अन् हवी ती फॅशन करा

सकाळ डिजिटल टीम

Skin Care :

अनेक मुलींना स्लीवलेस टॉप घालायला आवडतात. पण काळवंडलेली काख त्यांच्या या इच्छेच्या आडवी येते. संपूर्ण अंग पाढरशुभ्र असतं अन् काख काळी कुळकुळीत असते. काही क्रिम्स लावले तरी त्याचा रंग सुधारत नाही, त्यामुळे फॅशनेबल कपडे घालायला नकोसे वाटते.

काळी काख अनेकदा लोकांसाठी लाजीरवाणी असते. विशेषत: उन्हाळ्यात ही समस्या तुम्हाला खूप त्रास देते. काखेतले केस काढणे किंवा हेअर रिमूव्हल क्रीम किंवा साबण वापरणे, अल्कोहोल बेस्ड डिओडोरंट वापरणे, स्वच्छतेची काळजी न घेतल्याने डेड स्किन जमा होणे इत्यादी अनेक कारणांमुळे काखेची त्वचा काळी दिसू लागते.

काखेच्या काळ्या त्वचेपासून मुक्त होण्यासाठी, तुम्हाला महागड्या गोष्टींचा वापर करण्याची गरज नाही. कारण तुमच्या स्वयंपाकघरात अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचा वापर करून तुम्ही काखेच्या काळेपणापासून मुक्त होऊ शकता.

खोबरेल तेल

काळ्या काखेपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही खोबरेल तेलात व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिसळून त्वचेवर लावू शकता. व्हिटॅमिन ई त्वचा उजळ करण्यास मदत करते आणि खोबरेल तेल त्वचेचे पोषण करते. हे मिश्रण दररोज आंघोळीच्या 1 तास आधी लावा आणि नंतर कोमट पाण्याने स्वच्छ करा. (Skin Care Tips )

लिंबाचा रस तुमची त्वचा उजळ करेल

लिंबू काखेची त्वचा स्वच्छ करण्यासाठी खूप प्रभावी आहे, कारण त्यात नैसर्गिक ब्लीचिंग घटक असतात. यासाठी तुम्हाला फक्त लिंबू मधूनच कापून काखेवर काही मिनिटे मसाज करावे लागेल आणि नंतर आंघोळ करा. लिंबू लावल्यानंतर मॉइश्चरायझर लावायला विसरू नका, कारण त्यामुळे त्वचा कोरडी होऊ शकते.

बेकिंग सोडा वापरा

बहुतेक घरांच्या स्वयंपाकघरात बेकिंग सोडा सहज उपलब्ध असतो. बगलेचा काळेपणा दूर करण्यासाठी बेकिंग सोड्यात पाणी घालून पेस्ट तयार करा आणि त्वचेवर लावा आणि हलक्या हातांनी स्क्रब करा. यामुळे त्वचेच्या मृत पेशी निघून जातील आणि हळूहळू त्वचेचा काळोख कमी होऊ लागेल.

चंदन, गुलाबपाणी आणि हळद

काखेच्या त्वचेचा काळेपणा कमी करण्यासाठी एक चमचा चंदन पावडरमध्ये दोन चिमूटभर हळद टाका. आता गुलाबजल घालून पेस्ट बनवा आणि लावा आणि 15 मिनिटे ठेवा आणि नंतर स्वच्छ करा. याने काख गोरीपान होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT