लाइफस्टाइल

Cracked Heels : भेगा पडलेल्या टाचांपासून मिळवा सुटका, करून पाहा 'हे' घरगुती उपाय

भेगा पडलेल्या टाचांपासून मिळवा सुटका, करा 'हे' घरगुती उपाय

Aishwarya Musale

त्वचा निरोगी ठेवण्यासाठी तिची योग्य काळजी घेणे खूप गरजेचे आहे. केवळ चेहऱ्याच्या त्वचेचीच नव्हे तर पायाच्या टाचांचीही विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. अनेकांना वाटत असेल की फार वेळ पाण्यात राहिल्याने पायाला भेगा पडतात पण त्यामागे एक गंभीर कारण आहे हे समजून घ्या. जेव्हा शरीरात व्हिटॅमिन्सची कमतरता असते तेव्हा शरीर आपल्याला संकेत देत असतं, यातीलच एक प्रकार म्हणजे पायाला भेगा पडणे.

शरीरातील हार्मोन्समुळे सुद्धा याचे प्रमाण वाढते. हार्मोन्स व व्हिटॅमिन्समुळे त्वचेची आर्द्रता कमी होते त्यामुळे त्वचा रुक्ष होते. पायाला भेगा पडल्याने टाचेतुन रक्त येऊ लागते. चला तर मग जाणून घेऊया पायांची योग्य काळजी कशी घ्यावी.

टाचांना भेगा पडल्यास करा हे घरगुती उपाय

सर्वप्रथम एका भांड्यात ३ ते ४ चमचे मध टाका.

त्यात २ ते ३ चमचे कच्चे दूध घाला.

हे दोन्ही चांगले मिसळा आणि पायाच्या टाचांवर लावा.

ते पायांच्या टाचांवर किमान 30 मिनिटे राहू द्या.

पाणी आणि कापसाच्या मदतीने पायाच्या टाचा स्वच्छ करा.

तुम्ही आठवड्यातून किमान 3 ते 4 वेळा करू शकता.

रात्री हा घरगुती उपाय करून पहा.

या घरगुती उपायाचा परिणाम तुम्हाला काही दिवसात दिसेल.

हील क्रॅक क्रीम

टाचांना भेगा पडण्याची समस्या असल्यास सर्वप्रथम अँटी हील क्रॅक क्रीम किंवा बाम वापरायला सुरुवात करावी. ही क्रीम तुमच्या टाचांना सुंदर आणि मुलायम बनवेल. या क्रीमने तुम्हाला खूप फायदा होईल. तसेच, रोज रात्री आधी पाय स्वच्छ धुवून कोरडे करावेत आणि मग त्यावर हलक्या हातांनी क्रीम लावा.

खोबरेल तेल

खोबरेल तेल मॉइश्चरायझिंग गुणवत्तेसाठी ओळखले जाते. कोमट पाण्याने पाय धुतल्यानंतर ते चांगले कोरडे होऊ द्या. यानंतर तळव्यावर कोमट खोबरेल तेल लावून मसाज करा. सुती मोजे घाला आणि झोपा. सकाळी त्यांना स्वच्छ पाण्याने धुवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT