how to remove blackheads on nose sakal
लाइफस्टाइल

Blackheads: चेहऱ्याचं सौंदर्य घालवतात ब्लॅकहेड्स, या घरगुती उपायांनी लगेच होईल सुटका

how to remove blackheads: चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्समुळे त्वचेवर पिंपल्स येऊ लागतात.

Aishwarya Musale

How to remove blackheads : चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्समुळे त्वचेवर पिंपल्स येऊ लागतात. ब्लॅकहेड्स मुख्यतः नाक किंवा हनुवटीभोवती जमा होतात. नाकाजवळील ब्लॅकहेड्स काढणे फार कठीण असते कारण ते त्वचेच्या आत चिकटलेले असतात.

जेव्हा त्वचेवर डेड सेल्सच्या खाली तेल जमा होऊ लागते, तेव्हा त्वचेवर लहान पिंपल्स येऊ लागतात. हे दाणे हवेच्या संपर्कात आल्यावर काळे होतात. हेच ब्लॅकहेड्स म्हणून दिसून येते. ब्लॅकहेड्स काढणे एखाद्या कामापेक्षा कमी नाही. मात्र, काही घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही यापासून सुटका मिळवू शकता.

अंडे- ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी अंडे खूप फायदेशीर आहे. यासाठी अंड्याचा पांढरा भाग घ्या आणि त्यात १ चमचा मध मिसळा. ब्लॅकहेड्सवर लावा आणि सुमारे 15-20 मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा. आपण आठवड्यातून किमान दोनदा ते वापरणे आवश्यक आहे.

बेकिंग सोडा- ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी 1 चमचा बेकिंग सोडामध्ये 2 चमचे पाणी मिसळून पेस्ट बनवा. 10-15 मिनिटे ब्लॅकहेड्सवर ठेवा. नंतर पाण्याने धुवा. बेकिंग सोडा एक्सफोलिएटर म्हणून काम करतो, जो त्वचेवर साठलेले तेल साफ करतो.

ग्रीन टी- ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी आणखी एक प्रभावी कृती म्हणजे 1 चमचे ग्रीन टीची पाने पाण्यात मिक्स करणे. चेहऱ्यावर जिथे ब्लॅकहेड्स असतील तिथे लावा. ते लावल्यानंतर सुमारे 20 मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने धुवा.

केळीची साल - ब्लॅकहेड्स कमी करण्यासाठी हा सर्वात सोपा घरगुती उपाय आहे. केळी खाल्ल्यास साल फेकण्याऐवजी त्वचेला लावा. केळीची साल त्वचेवर आतून मसाज केल्याने ब्लॅकहेड्स कमी होतात.

हळद- हळद त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. हळदीमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी हळदीमध्ये खोबरेल तेल मिसळून चेहऱ्याला लावा. ही पेस्ट 10-15 मिनिटे राहू द्या. आठवड्यातून सुमारे 2-3 वेळा वापरा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Holiday on Poll Day: मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर; नागरिकांना कर्तव्य निभावण्याचं आवाहन

Ambegaon Assembly Election : राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज केला दाखल

Hingoli Assembly Election 2024 : हिंगोली विधानसभा जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी एकच अर्ज दाखल

Ajit Pawar : घड्याळाची टिकटिक कायम! अजित पवारांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; पक्षचिन्हाची दिली परवानगी पण...

IND vs NZ 2nd Test : What a Ball... रोहित शर्मा गांगरला, टीम साऊदीनं स्टम्प उडवला; तरीही दिवस भारताच्या नावावर राहिला

SCROLL FOR NEXT