लाइफस्टाइल

Skin Care : वॅक्सिंग आणि शेव्हिंगला कंटाळलाय? मग या घरगुती उपायांनी अनावश्यक केसांपासून मिळवा सुटका

या घरगुती उपायांनी अनावश्यक केसांपासून मिळवा सुटका. जाणून घ्या

Aishwarya Musale

हात आणि पायांवरचे केस काढण्यासाठी आपण अनेकदा पार्लरमध्ये जातो, जेणेकरून आपण ते वॅक्सिंग करून काढू शकतो. अनेक वेळा असे घडते की आपण रेझर किंवा हेअर रिमूव्हल क्रीम वापरतो. पण यामुळे त्वचेवर पुरळ आणि लालसरपणा येतो. अशा स्थितीत तुम्ही घरगुती उटणे  लावणे महत्त्वाचे आहे. त्याच्या वापरामुळे त्वचेवर कोणतीही रिअ‍ॅक्शन होणार नाही. यासोबतच त्वचाही मुलायम दिसेल. चला तर आम्ही तुम्हाला सांगतो उटणे कसे बनवायचे.

बेसन आणि कच्चे दूध घालून उटणे बनवा

बेसन त्वचेसाठी चांगले असते. यामुळे त्वचेवरील टॅनिंग दूर होते आणि त्वचा उजळ होते. त्याचे उटणे बनवून तुम्ही ट्राय करू शकता. हे करण्यासाठी तुम्ही घरात ठेवलेल्या वस्तू वापरा.

यासाठी सर्व प्रथम एका भांड्यात 2 चमचे बेसन घ्या.

आता त्यात १ चमचा कच्चे दूध मिक्स करून पेस्ट बनवा.

नंतर ते हात आणि पायांवर लावा.

अशा प्रकारे उटणे वापरल्यास, तुम्हाला वॅक्सिंग करण्यासाठी पार्लरमध्ये जाण्याची आवश्यकता नाही.

हळदी आणि कच्च्या पपईचे उटणे बनवा

कच्ची पपई आणि हळदीचे उटणे यावर उत्तम उपाय आहे. पपईमध्ये पपेन एंजाइम असते, जे केसांची वाढ कमी करण्यास मदत करते. याशिवाय हळदीमध्ये बॅक्टेरियाशी लढण्यासाठी अँटिऑक्सिडंट्स असतात, त्यामुळे ते संवेदनशील त्वचेसाठी चांगले कार्य करते.

यासाठी थोडी कच्ची पपई बारीक करून घ्या, आता त्यात एक ते दोन चमचे हळद घाला.

आता दोन्ही मिक्स करून पेस्ट तयार करून चेहरा आणि शरीरावर लावा.

15-20 मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवा.

आठवड्यातून एक किंवा दोनदा हे नियमितपणे करून पहा.

शरीरावरील केसांची वाढ मंदावते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम मतदारसंघात चोख सुरक्षा व्यवस्था

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT