skin sakal
लाइफस्टाइल

Skin Care: मानेवरील काळेपणामुळे वाटतेय लाज? मग हे घरगुती उपाय करून पहा

आपला चेहराच नव्हे तर मानेवरही टॅनिंग असेल तर ते चांगले दिसत नाही.

Aishwarya Musale

आपला चेहरा, मान आणि हात यांचा रोज सूर्य प्रकाशाशी सामना होता. त्यामुळे हे भाग काळवंडतात. तसेच धूळ, प्रदूषण यामुळे या भागांवर मळ साठतो, तसेच टॅनिंग होते. त्वचेवर एकदा टॅनिंग किंवा काळेपणा आला की ते हटवणे मुश्किल होते.

उष्णता आणि सूर्यप्रकाशाव्यतिरिक्त, अतिनील किरणांमुळे देखील त्वचा काळी होते. आयुर्वेदात असेही म्हटले आहे की जर आपले अन्न आणि जीवनशैली योग्य नसेल तर त्याचा आरोग्य आणि त्वचा या दोन्हींवर परिणाम होतो. शरीरात मेलॅनिन वाढले तरी त्वचा काळी पडू लागते.

केवळ चेहऱ्यावरच नाही तर मानेवरही टॅनिंग होत असेल तर संपूर्ण लुकच खराब होऊ शकतो. मानेचे टॅनिंग दूर करण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी या घरगुती उपायांची मदत घेतली जाऊ शकते.

बटाट्याचा रस

जर तुम्हाला टॅनिंगच्या समस्येपासून मुक्ती मिळवायची असेल, तर तुम्ही यासाठी घरगुती उपाय करून बटाट्याचा रस वापरून पाहू शकता. स्टार्च व्यतिरिक्त बटाट्याच्या रसात असे घटक असतील तर ते त्वचेला दुरुस्त करण्याचे काम करते.

बटाट्याचा रस दिवसातून एकदा तरी कापसाच्या मदतीने मानेवर लावा. अंघोळ करण्यापूर्वी या घरगुती उपायाचा अवलंब करणे चांगले.

काकडीचा रस

त्वचेत ओलावा नसणे हे देखील टॅनिंग होण्यामागचे एक कारण मानले जाते. उन्हाळ्यात कोरडेपणाची समस्या वाढू शकते. तसे, काकडीच्या मदतीने त्वचेला हायड्रेट ठेवता येते. किसलेल्या काकडीचा रस एका भांड्यात काढा आणि नंतर कापूस किंवा हाताने मानेवर लावा. ही रेसिपी रोज वापरली जाऊ शकते. काही दिवसात तुम्हाला फरक दिसून येईल.

कोरफड देखील काम करते

कोरफड हा त्वचेच्या जवळजवळ प्रत्येक समस्येवर इलाज मानला जातो. टॅनिंग, पिंपल्स किंवा त्वचेच्या इतर समस्या दूर करण्यासाठी दररोज कोरफडीचा वापर करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kamala Harris vs Donald Trump election : डोनाल्ड ट्र्म्प आघाडीवर... पण कमला हॅरिस यांचा कमबॅक शक्य; अंतिम निकाल कधी लागणार?

Latest Marathi News Updates live : shivsena live: शरद पवार उद्यापासून विदर्भ दौऱ्यावर, राज्यात ५५ पेक्षा जास्त सभा घेणार

Captain David Warner: बंदी हटली अन् डेव्हिड वॉर्नरकडे कर्णधारपदाची जबाबदारी आली; ऑस्ट्रेलिया क्रिकेटमधून मोठी बातमी

Mumbai Weather Update: येत्या काही दिवसात कसं असेल मुंबईचं तापमान? जाणून घ्या एका क्लिकवर..

Andhari Vidhansabha: ऋतुजा लटके पुन्हा मारणार बाजी की मुरजी पटेल देणार धोबीपछाड? अंधेरी पूर्वेत दोन्ही शिवसेनांमध्ये चुरशीची लढत

SCROLL FOR NEXT