Skin Care Tips  esakal
लाइफस्टाइल

Skin Care Tips : त्वचेची काळजी घेताना या पाच चूका करणं महागात पडेल; वेळीच बदल करा

कानाच्या मागे किंवा मानेवर पॅच टेस्ट करायला विसरू नका

Pooja Karande-Kadam

Skin Care Tips : अनेक वेळा लोक त्वचेच्या काळजीपोटी कोणी सांगेल त्यांच ऐकत बसतात. आणि तशी कृतीही करतात. पण, आपल्याकडून झालेल्या कुठल्यातरी छोट्या-छोट्या चुकांमुळे आपल्या चेहऱ्यावर निस्तेजपणा दिसू लागतो.

या गोष्टी अगदी किरकोळ आहेत. पण, आपल्या चेहऱ्यासाठी अतिशय घातकच ठरतात. निरोगी त्वचेसाठी, तुमच्यासाठी हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे की तुम्ही दररोज कोणत्या चुका करत आहात. ज्यामुळे तुमची त्वचा खराब होत आहे. (Skin Care Tips : 5 big mistakes that take away the complexion of the face)

एक्सफोलिएशन

तुमच्या त्वचेला एक्सफोलिएशनची विशेष गरज असते. पण ते जास्त होणार नाही याची काळजी घ्या. जास्त प्रमाणात एक्सफोलिएशन केल्याने तुमच्या त्वचेची नॅचरल ब्युटी खराब होऊ शकते.

दोन व्यक्तींची त्वचा ही सारखी नसते. तुमच्या मित्र किंवा मैत्रिणीच्या त्वचेसाठी जे फायदेशीर असेल, ते तुमच्या त्वचेसाठीसुद्धा फायदेशीर असेलच असं नाही. त्यामुळे घरगुती उपाय करताना खबरदारी घेणं गरजेचं आहे. ज्या व्यक्तींच्या त्वचेवर पुरळ किंवा इतर अ‍ॅलर्जीची लक्षणं आहेत, अशा व्यक्तींनी घरगुती उपाय करणं टाळावं.

खाण्याकडे लक्ष द्या

जे लोक अस्वास्थ्यकर अन्न जास्त प्रमाणात खातात, त्यांच्या त्वचेवर प्रेमाचा स्पष्ट प्रभाव दिसून येतो. जास्त साखर, प्रक्रिया केलेले अन्न आणि अस्वास्थ्यकर पदार्थांच्या सेवनामुळे त्वचेवर जळजळ आणि पिंपल्स दिसतात.

ज्या व्यक्तींची त्वचा कोरडी आहे आणि ज्यांच्या त्वचेवर पुरळ आहे अशा व्यक्तींनी फळांचे रस, लिंबाचा रस, बटाटा-टोमॅटो हे पदार्थ त्वचेवर लावण्यासाठी वापरू नयेत. तसंच क्रीम आणि दुधाचादेखील अतिरेक टाळावा. व्हिनेगरचा वापर केल्यास त्वचेचं नुकसान होऊ शकतं.

पुरेशी झोप घ्या

नेहमी पुरेशी झोप घेण्याचा प्रयत्न करा. अपुऱ्या झोपेमुळे तुमच्या त्वचेचा रंग कमी होऊ लागतो. वास्तविक, जेव्हा तुम्ही खूप झोपतो तेव्हा त्वचेच्या दुरुस्तीची प्रक्रिया योग्य प्रकारे होते. त्यामुळे चेहऱ्यावर बारीक रेषा दिसत नाहीत.

सनस्क्रीन लावा

जेव्हा तुम्ही मेक-अप करून कडक उन्हात बाहेर जाता तेव्हा धुळीमुळे तुमची त्वचा खराब होऊ लागते. अशा परिस्थितीत सनस्क्रीन लावल्याशिवाय घराबाहेर पडू नका. सनस्क्रीन लावल्याने तुमच्या त्वचेचे हानिकारक अतिनील किरणांपासून संरक्षण होईल.

मेकअप न उतरवता झोपू नका

जर तुम्ही मेकअप न काढता झोपायला गेलात तर ते तुमच्या त्वचेला हानी पोहोचवू शकते. मेक-अप न काढता झोपल्याने त्वचेची छिद्रे बंद होतात आणि पिंपल्स होतात. त्यामुळे त्वचेला ऑक्सिजन आणि हायड्रेशन मिळत नाही.

हे लक्षात घ्या

केवळ महागडे प्रोडक्ट वापरले म्हणजे त्वचेची काळजी घेतली असं नसतं,त्यासाठी तुमच्या त्वचेचा समतोल राखणं गरजेचं असतं. त्वचेवर सौंदर्यप्रसाधनांचं थर चढवणं किंवा त्वचेची अजिबात काळजी न घेणं या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत.

जर तुमच्या त्वचेला अ‍ॅलर्जी होत असेल, तर ते सौंदर्यप्रसाधनांच्या अतिवापरामुळे किंवा त्वचेची काळजी घेण्यासाठी केलेल्या उपयांच्या मिश्रणामुळे होऊ शकतं. जर तुम्ही एकाच वेळी वेगवेगळे उपाय चुकीच्या पद्धतीने करत असाल, तर त्यामुळे तुमच्या त्वचेचं नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे. (Beauty Tips)

नेहमी या गोष्टी लक्षात ठेवा

जर तुम्ही त्वचेची काळजी घेण्यासाठी नवीन प्रॉडक्ट वापरायला सुरुवात करणार असाल, तर आधी ते कमी प्रमाणात वापरा. तुमच्या त्वचेला त्याची सवय होऊ द्या.

कानाच्या मागे किंवा मानेवर पॅच टेस्ट करायला विसरू नका. घरगुती उपचारांनासुद्धा ही कृती लागू पडते.

त्वचेवरील छिद्रं बंद करणाऱ्या उत्पादनांपासून लांब राहा.

सल्फेट्स, पॅराबेन्स आणि कृत्रिम सुगंध असलेली उत्पादनं वापरणं टाळा. (Skin Care)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT