Skin Tightening Facepack esakal
लाइफस्टाइल

Skin Tightening Facepack : चेहऱ्याची सैल झालेली त्वचा अशी करा घट्ट.! 'या' घरगुती फेसपॅकच्या मदतीने दिसाल अधिकच तरूण

Skin Tightening Facepack : त्वचेचा हा सैलपणा दूर करून, घट्टपणा टिकवून ठेवण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय केले जातात.

Monika Lonkar –Kumbhar

Skin Tightening Facepack : आपले वय जसे वाढते, तसे आपल्या शरीरात अनेक बदल दिसून येतात. शरीराच्या इतर भागांसोबतच त्वचेवर देखील बदल दिसतात. त्वचेवर सुरकुत्या येणे, त्वचा सैल होणे इत्यादी गोष्टी दिसू लागतात. परंतु, अनेक जण शरीराची योग्य प्रकारे काळजी घेतात परंतु, चेहऱ्याकडे दुर्लक्ष करतात.

महिलांना तर या सैल त्वचेचा अधिक त्रास होतो. त्वचेचा हा सैलपणा दूर करून घट्टपणा टिकवून ठेवण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय केले जातात. परंतु, हे उपाय फार काळ टिकत नाहीत. जर तुम्ही देखील अशा सैल त्वचेच्या समस्येमुळे त्रस्त झाला असाल तर, हा लेख खास तुमच्यासाठी आहे.

कारण, आज आम्ही तुम्हाला काही अशा घरगुती फेसपॅकबद्दल सांगणार आहोत. ज्यांचा वापर केल्याने तुमच्या त्वचेचा घट्टपणा टिकून राहण्यास मदत होते. यामुळे, वाढत्या वयानुसार, तुमची त्वचा तरूण राहते.

दही आणि बेसनाचा फेसपॅक

दही आणि बेसनाचा फेसपॅक तयार करण्यासाठी एका बाऊलमध्ये २ चमचे दही आणि १ चमचा बेसन घ्या. आता हे दोन्ही घटक चांगल्या प्रकारे मिसळून घ्या. ही पेस्ट आता चेहऱ्यावर लावा. त्यानंतर, २०-२५ मिनिटांनी तुमचा चेहरा कोमट पाण्याने धुवा.

कोरफड आणि काकडीचा फेसपॅक

कोरफड आपल्या त्वचेसाठी अतिशय फायदेशीर मानली जाते. काकडीमुळे त्वचा हायड्रेट राहण्यास आणि चकचकीत दिसण्यास मदत होतो. कोरफड आणि काकडीचा फेसपॅक बनवण्यासाठी सर्वात आधी एका बाऊलमध्ये २ चमचे कोरफडीचा गर घ्या.

आता त्यामध्ये २ चमचे काकडीचा रस घाला. हे दोन्ही घटक चांगल्या प्रकारे मिसळून याची छान पेस्ट बनवा. त्यानंतर, हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा. १५-२० मिनिटांनी चेहरा धुवा.

अंड्याचा फेसपॅक

अंड्याचा वापर हा त्वचेसाठी आणि केसांसाठी आवर्जून केला जातो. अंड्याचा हा फेसपॅक बनवायला अतिशय सोपा आहे. हा फेसपॅक बनवण्यासाठी सर्वात आधी अंड्यांचा पांढरा भाग घेऊन तो चांगल्या प्रकारे फेटून घ्या. त्यानंतर, हे मिश्रण चेहऱ्याला लावा आणि १५-२० मिनिटांनंतर तुमचा चेहरा थंड पाण्याने धुवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli MIDC Fire : सांगली एमआयडीसीतील केमिकल कंपनीत वायू गळती; दोघांचा मृत्यू, 10 जणांची अवस्था गंभीर

IPL Schedule: क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! पुढील 3 हंगामाच्या तारखा BCCI ने केल्या जाहीर

Latest Maharashtra News Updates : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांची झाली ऑनलाइन बैठक

Pre Wedding Photoshoot: 'या' लोकेशनवर फोटोग्राफरशिवायही करू शकता जोडीदारासोबत परफेक्ट फोटोशुट

Google Gemini : गुगल जेमीनीची मेमरी झाली शार्प! काय आहे या नव्या फीचरमध्ये खास?

SCROLL FOR NEXT