Monsoon Skin Care : आजकालच्या धावपळीच्या जीवनात आणि प्रदूषणामुळे आपल्या त्वचेची चमक कमी होत जाते. त्वचेवर डाग आणि मुरूम येण्यास सुरुवात होते. या समस्येवर उपाय म्हणून अनेक महागडे कॉस्मेटिक आणि ट्रीटमेंट उपलब्ध आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की तुम्ही घरीच अगदी सहज आणि स्वस्त डिटॉक्स वॉटर बनवून तुमची त्वचा चमकदार आणि डागमुक्त बनवू शकता.
डिटॉक्स वॉटर हे पाणी आहे ज्यामध्ये फळे, भाज्या, मसाले आणि औषधी वनस्पतींचे तुकडे घालून बनवले जाते. हे पाणी आपल्या शरीराला हायड्रेटेड ठेवते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते. यामुळे त्वचेची चमक वाढते, डाग आणि मुरूम कमी होतात आणि त्वचा निरोगी,ताजीतवानी दिसते.
डिटॉक्स वॉटर बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
२ लिटर पाणी
आल्याचे ७-८ तुकडे
पुदिन्याची काही पाने
१ चमचे गुलाबी मीठ
एका मोठ्या भांड्यात २ लिटर पाणी घ्या.
त्यात आल्याचे ७-८ छोटे तुकडे घाला.
पुदिन्याची काही पाने आणि १ चमचे गुलाबी मीठ घाला.
सर्व साहित्य चांगले मिक्स करा आणि २-३ तास फ्रीजमध्ये थंड होऊ द्या.
त्यानंतर हे पाणी दिवसभर प्या.
डिटॉक्स वॉटरचे फायदे:
त्वचेची चमक वाढवते आणि डाग कमी करते. त्वचेला हायड्रेटेड ठेवते आणि मुलायम बनवते. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते. वजन कमी करण्यास मदत करते. पचन सुधारते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवते.
तुम्ही तुमच्या आवडीनुसार डिटॉक्स वॉटरमध्ये इतर फळे, भाज्या आणि मसाले घालू शकता.सकाळी रिकाम्या पोटी डिटॉक्स वॉटर पिणे चांगले.दिवसभर पुरेसे पाणी प्या.डिटॉक्स वॉटरसोबतच तुम्ही संतुलित आहार आणि नियमित व्यायाम केल्यास त्वचेला अधिक फायदा होईल.
आता आम्ही तुम्हाला डिटॉक्स वॉटर बनवण्याची सोपी पद्धत आणि त्याचे अनेक फायदे सांगितले आहेत. तर मग आजच घरी डिटॉक्स वॉटर बनवा आणि तुमची त्वचा चमकदार आणि निरोगी बनवा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.