हेल्मेटची स्वच्छता Esakal
लाइफस्टाइल

घामाने आणि धुळीने घाण झालेलं Helmet असं करा स्वच्छ

जर एकच हेल्मेट अनेक लोक वापरत असतील तर काही गंभीर समस्या निर्माण होवू शकता. रोज अस्वच्छ हेल्मेट वापरल्याने त्वचेला खाज येणं किंवा एलर्जी होवू शकते. तसचं केसांमध्ये कोंडा होवून केस Hair डॅमेजदेखील होवू शकतात

Kirti Wadkar

बाईक असो किंवा स्कुटर कोणतही दुचाकी वाहन चालवताना सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेट घालणं हे अत्यंत गरजेचं आहे. हेल्मेट Helmet न घातल्याने तुम्हाला दंड देखील लागू शकतो. Smart Tips Know How to Keep your Helmet Clean

यासाठीच काहीजण स्वत:च्या सुरक्षेचा Security विचार करून तर काही दंडाच्या भितीने हेल्मेटचा Helmet वापर करत असतात. कोणत्याही अपघातात डोक्याला इजा होवू नये यासाठीच खास हेल्मेट डिझाइन करण्यात आलेलं असतं.

तुमच्या सेफ्टीसाठी तयार करण्यात आलेलं हे सुरक्षा कवच म्हणजेच हेल्मेट तुम्ही दुचाकी चालवताना न विसरता घालता. मात्र ते स्वच्छ करण्याकडे अनेकजण साफ दुर्लक्ष करतात. अनेक महिने सतत हेल्मेटचा वापर केल्याने घाम आणि धूळीमध्ये ते प्रचंड घाण तर होतचं शिवाय त्यात बॅक्टेरिया Bacteria देखील निर्माण होतात आणि त्यात दुर्गंधी निर्माण होते.

जर एकच हेल्मेट अनेक लोक वापरत असतील तर काही गंभीर समस्या निर्माण होवू शकता. रोज अस्वच्छ हेल्मेट वापरल्याने त्वचेला खाज येणं किंवा एलर्जी होवू शकते. तसचं केसांमध्ये कोंडा होवून केस Hair डॅमेजदेखील होवू शकतात. यासाठीच वेळोवेळी हेल्मेट स्वच्छ कर

हे देखिल वाचा-

१. सेफ्टी पॅड्सची डीप क्लिनिंग- सर्वच हेल्मेटला आतून सुरक्षेसाठी मऊ स्पंजसारखे पॅड्स लावण्यात आलेले असतात. काही हेल्मेट्सला रिमूव्हेबल पॅड्स असतात तर काहींमध्ये ही सुविधा नसते.

या पॅड्समध्ये घाम, केसांचं तेल किंवा केसांना लावण्यात येणारे इतर प्राॅडक्ट आणि धूळ जमा होत असते. यामुळे बॅक्टेरिया वाढू लागतात आणि दुर्गंधी देखील निर्माण होते.

हे पॅड्स स्वच्छ करण्यासाठी एका बादलीमध्ये माइल्ड किंवा बेबी शॅम्पू टाका. त्यानंतर हेल्मेटचे पॅड्स किंवा संपूर्ण हेल्मेट या पाण्यामध्ये अर्धा तासासाठी भिजत ठेवा. त्यानंतर २-३ वेळा स्वच्छ पाण्याने हेल्मेट धुवा आणि उन्हामध्ये संपर्णपणे वाळू द्या.

२. बेकिंग सोडा- काहीवेळा हेल्मेट धुतल्यानंतरही त्यातून येणारी दुर्गंधी कमी होत नाही. अशावेळी तुम्ही बेकिंग सोड्याचा वापर करू शकता. यासाठी हेल्मेट धुतल्यानंतर ते पूर्ण वाळू द्या. त्यानंतर त्यामध्ये बेकिंग सोडा टाकून ठेवा. २ तासांनी बेकिंग सोडा काढून टाका. स्वच्छ कापडाने हेल्मेट पुसून घ्या.

३ . डिसइंफेक्टेंट- अनेकदा हेल्मेट काढल्यावर ते कुठेही ठेवलं जातं. तसचं अनेकजण ते गाडीच्या हॅन्डलला अडकवून ठेवतात. यामुळे त्यात मोठ्या प्रमाणात धूळ आणि किटाणू जमा होत असतात. असं हेल्मेट घातल्याने आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. यासाठी वेळोवेळी हल्मेटवर डिसइंफेक्टेंट स्प्रेचा वापर करा. यामुळे रोज त्यावर साचणारे किटाणू दूर होतील.

४. माइल्ड साबण- हेल्मेट किंवा हेल्मेटमधील पॅड्स स्वच्छ करण्यासाठी जर तुमच्याकडे बाजारामध्ये मिळणारे क्लिनिंग प्रोडक्ट किंवा बेबी शॅम्पू नसेल तरी काळजी करू नका. घरातील माइल्ड साबणाचा वापर करून तुम्ही हेल्मेट स्वच्छ करू शकता.

यासाठी बादलीत कोमट पाणी घेऊन साबणाचा हलका फेस तयार करा. त्यानंतर त्यात हेल्मेट पॅडस् किंवा हेल्मेट बुडवून ठेवा. १५ मिनिसांठी हलक्या हातांनी स्पंज आणि पॅड्स रब करा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने हेल्मेट धुवा. हेल्मेट वाळण्यासाठी ड्रायरचा वापर करू नका. उन्हामध्ये ते वाळू द्या. अशा प्रकारे हेल्मेट स्वच्छ होईल.

५. हेल्मेटचं वायजर करा स्वच्छ- हेल्मेटमधील वायजरमुळे डोळ्यात धूळ जाण्यापासून तसंच चेहऱ्याचं उन्हापासून आणि वाऱ्यापासून संरक्षण होतं. मात्र या वायजरवर जास्त प्रमाणात ओरखडे झाले असतील तर पुढील रस्ता स्पष्ट दिसण्यास अडचण निर्माण होऊन ते धोकादायक ठरू शकतं.

यासाठीच वेळोवेळी हे वायजर बदलणं गरजेचं आहे. तसचं वायजरवर तुम्ही ग्लासगार्ड बसवू शकता आणि ते वेळोवेळी बदलू शकता. वायजर पुसण्यासाठी मायक्रोफायबरचा वापर करा जेणे करून त्यावर ओरखडे पडणार नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Ease of Doing Business: जागतिक बँकेच्या 'ईझ ऑफ डुईंग बिझनेस' अहवालात भारताची मोठी झेप; जाणून घ्या काय आहेत कारण?

Kalyan Fire News: कल्याणमध्ये गगनचुंबी इमारतीला भीषण आग; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ९ गाड्या दाखल

Latest Marathi News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Jalgaon Jamod Assembly Election 2024 Result : जलंब मतदार संघाचा विक्रम मोडत जळगावने रचला नवा इतिहास

SCROLL FOR NEXT