समाजभान आणि ‘स्वभान’ही  sakal
लाइफस्टाइल

समाजभान आणि ‘स्वभान’ही

‘संवादिनी’ हे नाव वाचल्यावर सुरेल स्वरांची संवादिनी डोळ्यांपुढे येते ना? पण ही आहे ज्ञानप्रबोधिनीची सुरेल संवाद साधणारी संवादिनी. ज्ञानप्रबोधिनीच्या ‘स्त्री शक्ती प्रबोधन’ या कार्यदिशेअंतर्गत संवादिनीचे कार्य चालते.

सकाळ वृत्तसेवा

मधुरांगण

विनया लुकतुके , सदस्या, संवादिनी संस्था

‘संवादिनी’ हे नाव वाचल्यावर सुरेल स्वरांची संवादिनी डोळ्यांपुढे येते ना? पण ही आहे ज्ञानप्रबोधिनीची सुरेल संवाद साधणारी संवादिनी. ज्ञानप्रबोधिनीच्या ‘स्त्री शक्ती प्रबोधन’ या कार्यदिशेअंतर्गत संवादिनीचे कार्य चालते. विद्याताई करंबेळकर आणि डॉ. अनघा लवळेकर या ज्ञानप्रबोधिनी कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून २००० मध्ये बीज पेरले गेले. पदवीधर, द्विपदवीधर असूनही कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे काही काळ गृहिणीपद स्वीकारलेल्या किंवा लवचिक व्यावसायिक स्वरूप असलेल्या संवादिनी मैत्रिणी गेली पंचवीस वर्षे विविध वयोगटातील मुलामुलींसाठी योजलेल्या विकास-उपक्रमांमध्ये संघटितपणे कार्यरत आहेत. स्त्रियांना समाजाभिमुख करणाऱ्या या संकल्पनेचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. सन २००० पासून अत्यंत नियमितपणे प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या शुक्रवारी दुपारी अडीच ते साडेचार या वेळेत चालणारा मासिक बैठक हा हिचा पायाभूत उपक्रम. व्यक्तिमत्त्वविकास, आरोग्य, व्यवहार कौशल्ये, सामाजिक बांधिलकी या मुख्य विषयांच्या स्तंभावर ही बैठक असते.

१९९७ मध्ये स्त्री शक्ती प्रबोधन गटाने सुरू केलेले ‘समतोल’ हे नियतकालिक २००२ नंतर संवादिनी सदस्यांनी जबाबदारी घेऊन जोपासले, वाढवले. पौगंडावस्थेतील मुलांसाठी ‘लैंगिकता प्रशिक्षण’ व ‘लिंगसमभावशिक्षण’ हा गाभ्याचा विषय ‘उमलत्या वयाशी जुळवून घेताना’ या कार्यशाळांमधून हसत खेळत, कृतीसत्रांतून, विचारांना चालना देत उलगडला जातो. यासाठी गटाने दहा विषयांवरील हस्तपुस्तिका संचही तयार केला आहे. गटातर्फे तरुणाईची आव्हाने, सहजीवनाच्या उंबरठ्यावर, बहर जोपासताना, प्रशिक्षक प्रशिक्षण असे उपक्रम आणि कार्यशाळाही घेतल्या जातात. १३ ते १५ वयोगटातील मुलामुलींना व्यक्तिमत्त्व विकासनासाठी, आयुष्याचे ध्येय ठरवण्यासाठी संस्काराच्या माध्यमातून मार्गदर्शन करणे हा ‘विद्याव्रत संस्कार’ गटाचा हेतू. पूर्णपणे शैक्षणिक असणारा हा संस्कार सर्व सामाजिक गटांसाठी योजला जातो.

वंचित गटातील विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण व्हावी या हेतूने ‘पालवी’ गट तिसरी ते सातवीच्या मुलांसाठी अभ्यासपूरक कृतीसत्रे घेतो.

लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन मुले, पालक, संस्थाचालक यांच्यात चांगल्या व वाईट स्पर्शाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठीचा ‘ओळख स्पर्शाची’ हा उपक्रम. ज्ञानप्रबोधिनी प्रज्ञा मानस संशोधिकेच्या साह्याने बालसंवाद कट्टा ही मोफत दूरध्वनी सेवाही उपलब्ध झाली आहे.

दहा ते बारा वयोगटातील विद्यार्थ्यांचे स्वभान व सामाजिक भान वाढविणे हा ‘विकासिका’ गटाचा उद्देश आहे. १२ ते १६ वयोगटातील मुलामुलींमध्ये जीवन कौशल्ये रुजविण्याचे काम ‘कौशल्य’ हा गट विविध शाळा संस्था यातील विद्यार्थ्यांसोबत करतो.

मागील वर्षीच्या कामाचा आढावा; तसेच पुढील वर्षीचे नियोजन, एकत्र गटाने अभ्यास यासाठी वर्षातून एकदा संवादिनीची प्रदीर्घ बैठक होते. नेहमीच्या मासिक बैठकीपेक्षा वेगळा, अनेक नवीन मैत्रिणींना सामावून घेत, संवादिनीची कल्पना आणि स्वरूप समजावे यासाठी स्नेहमेळावा होतो. दर मंगळवारी संवादिनी कक्षात दुपारी साडेतीन वाजता गटश: साप्ताहिक उपासनाही होते. संवादिनीत कोणतीही पारंपरिक औपचारिक पदे नाहीत. सुसूत्रतेसाठी गटप्रमुख सदस्या असते; पण तीही सर्वांसोबतच्या सहविचारानेच निर्णय घेते. ज्ञानप्रबोधिनीमध्ये सहविचारात्मक नेतृत्वपद्धतीला महत्व आहे. सर्व गटांच्या कामातील सुसूत्रतेसाठी एक समन्वयक मैत्रिण असते. डॉ. वीणा लिमये या सध्या संवादिनी समन्वयक आहेत. सध्या २५०-३०० मैत्रिणी संवादिनी सदस्या आहेत. त्यापैकी ७०-८० जणी वरील सर्व गटात मिळून कार्यरत आहेत.

संवादिनी वृक्षाच्या फांद्या आता हळूहळू पसरत आहेत. पुण्यासह डोंबिवली, बोरिवली, भाईंदर, सोलापूर, शिरूर या ठिकाणी संवादिनी विस्तारत आहे. सर्वच मैत्रिणी स्वयंसेवी वृत्तीने काम करतात. स्त्रियांचे स्वभान जागवून, त्यांच्या स्वप्रतिमेत बदल घडवत, नेतृत्वगुण विकसित करुन समाजोपयोगी कामांत त्यांची सुप्त शक्ती वापरण्यासाठी संवादिनी हे एक व्यासपीठ आहे.

तुमचाही असा ग्रुप आहे? महिलांच्या सक्षमीकरणासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी त्यातून काम होते? तर मग आम्हाला नक्की त्याच्याविषयी लिहून पाठवा. शब्दमर्यादा पाचशे शब्द. लेखाबरोबर ग्रुपच्या कामाबाबतची काही छायाचित्रेही पाठवा.

मजकूर पाठवण्याचा पत्ता : maitrin@esakal.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narayan Rane: त्यांनी आता महाराष्ट्रात तोंड दाखवू नये; नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

IPL 2025 Auction Live: अश्विनची १० वर्षांनंतर CSK संघात घरवापसी! तब्बल इतके कोटी मोजत घेतलं संघात

Latest Maharashtra News Updates : देवेंद्र फडणवीस घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

Prajakta Mali: प्राजक्ता माळीच्या डोक्यात येतायत आश्रमवासी होण्याचे विचार? म्हणते, "महाराष्ट्रावर प्रेम नसतं तर..."

IPL 2025 Mega Auction LIVE Streaming: ऋषभ, श्रेयस आणि व्यंकटेश अय्यर या लिलावातील महागडे खेळाडू! कॉनवेची चेन्नईत घरवापसी, तर वॉर्नर-पडिक्कल अनसोल्ड

SCROLL FOR NEXT