How to create poll on whatsapp: इंस्टंट मेसेजिंग अॅपमध्ये लोकप्रिय असलेलं व्हाॅटस्अॅप गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळे फिचर्स युजर्ससाठी घेऊन येत आहेत. यातच व्हाॅटस्अॅप WhatsApp पोल हे नवं फिरचही लॉन्च केलं आहे. Social Media Tips Know This New Feature WhatApp Poll
अर्थात पोलच्या मदतीने तुम्ही तुमच्या व्हाॅटसअॅप WhatsAPP ग्रुपवर तुमच्या मित्रांना एखाद्या विषयावर प्रश्न विचारून त्यावर पोल घेऊ शकता. तुम्ही तुमच्या कॉन्टेक्टसना काही पर्याय देऊन त्यावर पोल घेऊ शकता.
यापूर्वी फेसबुक Facebook आणि ट्विटरवर Twitter पोल घेण्याचं फिचर उपलब्ध होतं. मात्र आता व्हाॅटसअॅपनं देखील त्यांच्या युजर्ससाठी हे खास फिचर आणलं आहे. हे फिचर ग्रुप चॅट आणि सिंगल चॅट दोन्हीसाठी उपलब्ध आहे.
WhatsApp Polls वर युजर्सना १२ पर्याय देऊन पोल क्रिएट करण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळेच ग्रुप किंवा चॅटवर पाठवण्यात आलेल्या पोलला उत्तर देण्यासाठी इतर युजर्सकडे अनेक पर्याय मिळतील.
काही सोप्या स्टेप्सच्या मदतीने व्हाॅटसअॅपवर तुम्ही सहज पोल क्रिएट करू शकता.
अँड्राॅइडवर पोल क्रिएट करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा
सर्वप्रथम व्हाॅटस्अॅप ओपन करा.
त्यानंतर ग्रुप किंवा ठराविक व्यक्तीला मेसेज करायचा असल्यास त्यावर क्लिक करा. आत्यानंतर अटॅच फाईलच्या आयकनवर क्लिक करा.
यानंतर तुमच्या समोर अनेक पर्याय असतील यात Poll हा पर्याय देखील उपलब्ध असेल.
इथे तुम्हाला तुमचा प्रश्न टाईप करायचा आहे. ज्यावर तुम्हाला पोल घ्यायचा आहे.
पुढे तुम्ही वेगवेगळे उत्तराचे पर्याय देऊ शकता. यासाठी तुम्ही १२ पर्याय देऊ शकता.
त्यानंतर खाली असलेल्या Send या बटणावर क्लिक करा.
अँड्रॉइड स्मार्टफोनसाठी तुम्ही या स्टेप्सच्या मदतीने पोल क्रिएट करू शकता.
हे देखिल वाचा-
iOs युजर्सनी Poll घेण्यासाठी या स्टेप्स फॉलो कराव्या
• iPhone मध्ये पोल घेण्यासाठी तुम्हाला अटॅच या आयनएवजी प्लस + या आयकनवर क्लिक करावं लागेल.
त्यानंतर अँड्रॉइड फोनप्रमाणेच प्रश्न आणि उत्तरांचे पर्याय द्यावे लागतील.
त्यानंतर पोल सेंड करायचा आहे.
अशा प्रकारे आयफोनवरही तुम्ही सहज पोल क्रिएट करू शकता.
अशाप्रकारे घेतल्या गेलेल्या पोलचं उत्तर देण्यासाठी केवळ योग्य उत्तरावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्ही तुमचं उत्तर बदलू देखील शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.