LGBTQIA+ हा काही अशा व्यक्तींचा समुदाय आहे ज्याच्या लैंगिक भावना Sexual Feelings, इच्छा या काहीश्या वेगळ्या आहेत. या व्यक्तींची ओळख ही त्यांच्या रंगरुपावरून नव्हे तर त्यांच्या लैंगिक आवडी-निवडीवरून होत असते. Social News in Marathi know what is LGBTQIA Community
LGBT किंवा LGBTQIA+ या शब्दांमध्ये अशा विभिन्न लैंगिक आवड किंवा इच्छा असलेल्या व्यक्तींचा समावेश आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कोणत्याही दडपणाशिवाय अनेक व्यक्तींनी त्यांच्या लैंगिक आवडीविषयी समाजात Society मोकळेपणाने संवाद साधण्यास सुरुवात केली आहे.
समाजामाध्ये एखाद्या स्त्री-पुरुषाच्या नात्याला आदर्श नातं मानलं जात होतं. किंबहुना अशा नात्यालाच केवळ समाजमान्यता होती. समलैंगिक किंवा इतर लैंगिंक इच्छा असणाऱ्यांना समाज मान्यता मिळाली नव्हती. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये नव्या पिढीने त्यांच्या लैंगिंक इच्छा उघडपणे मांडण्यास सुरुवात केली.
एक व्यक्ती म्हणून त्यांच्या लैंगिंक इच्छाना समाजात मान्यता मिळावी म्हणून स्वतंत्र लढा देण्यास सुरुवात केली आणि LGBT समूदाय निर्माण झाला. जसं जसं समाजाने या लोकांबद्द्ल जाणून घेण्यास आणि त्यांना समजून घेण्यास सुरुवात केली तसं तसं वेगवेगळ्या लैंगिंक मनोकामना असेल्या अनेक व्यक्ती पुढे आल्या आणि हा समुदाय वाढतं गेला.
LGBTQIA + असा हा समुदाय कसा आहे. या शब्दांचा पूर्ण अर्थ काय? या समुदायातील व्यक्तींच्या लैंगिक इच्छा नेमक्या कशा आहेत. याबद्दल जाणुन घेण्याचा प्रयत्न करुयात .
हे देखिल वाचा-
काय आहे LGBTQIA + चा अर्थ
१. L लेस्बियन- L म्हणजेच लेस्बियन हा शब्द समलैंगिक महिलांसाठी वापरण्यात येतो. ज्या महिला इतर महिलांकडे आकर्षित होतात किंवा ज्यांना इतर महिलांची लैंगिक ओढ असते. त्यांच्याशी प्रेमसंबध तसचं लैंगिक संबध ठेवतात त्या लेस्बियन गटात येतात. काही वेळेस या महिलांना देखील इतर महिलांप्रमाणे नटायला सजायला आवडतं. तर काही महिला पुरुषांप्रमाणे रहाणं पसंत करतात.
२. G गे- समलैंगिक पुरुषांसाठी हा शब्द वापरला जातो. जे पुरुष इतर पुरुषांकजे आकर्षित होतात. पुरुषांशी लैंगिक संबध ठेवातात. भावनिकदृष्टा पुरुषांशी जे जोडले जातता. त्यांना गे म्हंटलं जातं. सुरुवातीच्या काळामध्ये पुरुषाव्यतिरिक्त प्रत्येक समलैगिंक व्यक्तीला गे म्हंटल जातं.
३. बी बायसेक्शुअल- या गटातील महिला किंवा पुरुष एकंदर या गटातील कोणतीही व्यक्ती समान लिंगासोबतच इतर सर्व लिंगाच्या व्यक्तींकडे आकर्षित होतात यालाच बायसेक्शुअल bisexual म्हणतात. यात महिला किंवा पुरुष दोघं बायसेक्शुअल असू शकतात.
म्हणजे समजा या गटातील एखादा पुरुष पुरुषांसोबत संबध ठेवण्यासोबतच महिला किंवा ट्रान्सजेंडर व्यक्तीशीही संबध ठेवतात.
४. T ट्रान्सजेंडर- या व्यक्ती थर्ड जेंडरमध्ये येतात. म्हणजे काही व्यक्ती ज्या लिंगाने जन्माला येतात पुढे जाऊन त्यांचं वागणं किंवा आवड किंवा भावना मात्र इतर लिंगाच्या व्यक्ती प्रमाणे असताता. transgender
उदाहरण घ्यायचं झाल्यास जर एखादा मुलगा पुरुष लिंगासह जन्म घेतो. मात्र जसं जसा तो मोठा असतो तो महिलांप्रमाणे वागू लागतो. त्याच्या आवडी निवडी किंवा भानविनिकदृष्ट्या तो महिलांसारखा असतो. त्याची जीवन जगण्याची पद्दध महिलांप्रमाणे असते. ते स्वताला स्त्री समजतात अशांना ट्रान्सवुमन म्हणतात.
या उलट ज्या महिला स्वत:ला पुरुष मानू लागतात आणि त्या प्रमाणे आयुष्य जगू लागतात त्यांना ट्रान्समेन म्हणतात. यातील अनेकजण अलिकडे सर्जरीच्या मदतीने लिंग देखील बदलून घेतात.
५. Q क्वीयर- queer ज्या व्यक्ती त्यांची लैंगिक ओढ किंवा त्यांचं आकर्षण नेमकं कुणासाठी आहे हे ठरवू शकत नाही. म्हणजेच जे स्वत:ला पुरुष, महिला किंवा ट्रान्सजेंडरही मानत नाहीत. त्यांना क्वियर म्हणतात. ते पूर्णपणे लेस्बियन नसतात किंवा गे आणि बायोसेक्शुअलही नसतात. त्याचं लैंगिक आकर्षण वेळोवेळी बदलत राहतं. म्हणून क्वियरचा क्यू Q हा QUESTIING या अर्थाने ओळखला जातो.
हे देखिल वाचा-
६. I इंटरसेक्स- जन्मत: ज्या व्यक्तींच्या जननेंद्रियांमध्ये म्हणजे प्रायव्हेट पार्टमध्ये काही दोष असतात किंवा यावरून ते नेमके स्त्री आहेत कि पुरुष हे लक्षात येत नाही त्यांना इंटरसेक्शुअल म्हणतात.
७. A एसेक्शुअल- ज्या व्यक्तीला कोणत्याही लिंगाच्या व्यक्तीसोबत सेक्स म्हणजेच शारिरीक संबंधांसाठी रुची नसते त्यांना एसेक्शुअल म्हणतात.
तर प्लस (+) मध्ये अशा व्यक्तींचा समावेश होतो जे LGBTQIA च्या कोणत्याचं गटात बसत नाहीत. यातील कोणत्याच गटात आपण फिट बसत नाहीत मात्र आपली लैंगिक गरज हे सामान्यांपेक्षा विभिन्न आहे असं ज्यांना वाटतं ते या गटात येतात.
तसचं एलाए हा देखील एक गट आहे. खरं तर या गटातील व्यक्ती LGBTQIA चा भाग नाहीत. मात्र या व्यक्तींचा LGBTQIA या गटातील व्यक्तींना, त्यांच्या अधिकारांना आणि त्यांच्या विचारांना पूर्णपणं पाठिंबा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.