Sonam Kapoor Saree esakal
लाइफस्टाइल

Sonam Kapoor Saree : स्टाईल आयकॉन सोनम कपूरने का नेसली 35 वर्षांपूर्वीची साडी? लग्नातील पारंपारिक लूकसाठी आहे बेस्ट ऑप्शन

Best option for a traditional wedding look: बॉलिवूडची फॅशन क्वीन अभिनेत्री सोनम कपूर तिच्या अनोख्या स्टाईल स्टेटमेंटसाठी आणि अभिनयासाठी ओळखली जाते. पारंपारिक असो की मॉर्डन ती प्रत्येक लूकमध्ये सुंदर दिसते.

Monika Lonkar –Kumbhar

Sonam Kapoor Saree : बॉलिवूडची फॅशन क्वीन अभिनेत्री सोनम कपूर तिच्या अनोख्या स्टाईल स्टेटमेंटसाठी आणि अभिनयासाठी ओळखली जाते. पारंपारिक असो की मॉर्डन ती प्रत्येक लूकमध्ये सुंदर दिसते, यात काही शंका नाही. पारंपारिक असो की वेस्टर्न ती तिचा प्रत्येक लूक व्यवस्थितपणे कॅरी करते. त्यामुळे, तिच्या प्रत्येक लूकची चर्चा देखील तेवढीच होते.

अलिकडेच पुन्हा एका सोनम कपूर चर्चेत आली आहे. ती चर्चेत येण्याचे कारण म्हणजे तिने तिच्या मैत्रिणीच्या लग्नात नेसलेली ३५ वर्षे जुनी घरचोला साडी. सोनमने तिच्या आईची ही ३५ वर्षे जुनी असलेली साडी नेसून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

तिची ही बांधणी प्रिंटमधील घरचोला साडी आणि या साडीवरील तिचा लूक पाहून सर्वांनी तिचे कौतुक केले आहे. जर तुम्हाला लग्नात पारंपारिक लूक हवा असेल? तर ही घरचोला साडी बेस्ट ऑप्शन ठरू शकते.

सोनमचा रॉयल लूक

बॉलिवूडची फॅशन क्वीन अभिनेत्री सोनम कपूरने ५ फेब्रुवारीला तिची मैत्रिण आणि प्रसिद्ध सेलिब्रेटी फोटोग्राफर अपेक्षा मेकरच्या मुंबईतल्या रिसेप्शनला हजेरी लावली होती. या रिसेप्शनला सोनमने या लाल रंगाच्या घरचोला साडीमध्ये हजेरी लावली होती.

तिच्या या गुजराती लूकने रिसेप्शनमधील सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. या घरचोला साडीवर तिने वर्क केलेला एम्बेलिश्ड ब्लाऊज परिधान केला होता. ज्यामुळे, तिच्या लूकला चारचाँद लागले होते.

साडीची खासियत काय?

सोनमने इन्स्टाग्रामवर तिचे या साडीतील फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये म्हटलयं की, ‘मी माझ्या आईची ही ३५ वर्षे जुनी घरचोला साडी नेसली. ही घरचोला साडी आणि ब्लाऊज उधार दिल्याबद्दल आई मी तुझी आभारी आहे’ अशी कॅप्शन देत तिने या साडीतील तिचे हे सुंदर फोटो शेअर केले आहेत.

या साडीच्या खासियतबद्दल बोलायचे झाल्यास, ही घरचोला साडी गुजरातमध्ये लग्नसमारंभांमध्ये परिधान केली जाते. गुजरातमध्ये विवाहसोहळ्यासाठी या साडीला विशेष असे महत्व आहे. ही घरचोला साडी राजस्थान आणि गुजरातमधील विणकारांतर्फे तयार केली जाते. या साडीवर बांधणी शैलीतील डिझाईन, चमकदार सोनेरी-लाल रंगांचा वापर, लाल किंवा सोनेरी जरीवर्क यांचा खास करून वापर केला जातो. हे या साडीचे खास वैशिष्टय आहे.

सोनमची हेअरस्टाईल आणि मेकअप

सोनमने या पारंपारिक साडीतील तिचा लूक सुंदरपणे जपला आहे. तिने हेअरस्टाईलमध्ये आवर्जून गजऱ्याचा वापर केला आहे. डोळ्यांवर काजळ, न्यूड लिपस्टिक आणि गालांवर ब्लश असा मिनिमल मेकअप तिने या साडीवर केला आहे. हेव्ही कुंदनचे कानातले, गळ्यातले आणि बिंदी अशी ज्वेलरी तिने कॅरी केली आहे.

सोनमने ही घरचोला साडी नेसून हे नक्कीच सिद्ध केले की, आजही पारंपारिक प्रिंटेड साड्यांचा ट्रेंड लग्नसमारंभ आणि इतर कार्यक्रमांसाठी बेस्ट आणि हिट आहे. तुम्ही जर आगामी लग्नसमारंभात काय लूक करायचा किंवा कोणती साडी नेसायची? असा विचार करत असाल तर या घरचोला साडीचा विचार करायला काहीच हरकत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

SCROLL FOR NEXT