लाइफस्टाइल

कुणी स्पेस देतं का स्पेस...कपल्सना हवा स्वतःसाठी वेळ 

स्पेस न मिळाल्यामुळे कपन्समध्ये भांडणे होत असल्याचे पाहायला मिळते

सकाळ डिजिटल टीम

लग्न झाल्यावर सुरवातीचे दिवस मोरपंखी असतात. सतत एकमेकांबरोबर राहायला हवं असते. पण काही काळांनी काहीतरी खटकायला लागतं. पूर्वी जो स्वत साठी वेळ मिळत होता, तो मिळेनासं झाल्याचं लक्षात यायला लागतं. आणि मग तु मला स्पेसच देत नाहीस... यावरून वाद सुरू होतात. नवरा बायकोच्या नात्यात दोघांनी एकमेकांना स्पेस दिली नाही तर नात्यात कडवटपणा येतो असं म्हणतात. म्हणूनच स्पेस दिली जाणं गरजेचं आहे.

स्पेस कशी जपता येईल- प्रत्येकाला स्वतःच्या आवडी निवडी जपण्यासाठी वेळ हवा असतो. त्यासाठी विशिष्ट वेळ काढला जातो. ती वेळ स्वतःचा आनंद मिळवत घालवण्यात अनेकांना आवडतं. यावेळी इतर कोणाचाही डिस्टर्बन्स त्यांना नको असतो. यासाठी जर पार्टनरने ही बाब समजून घेतली त्याला-तिला स्पेस जपण्यासाठी मदत केली तर त्या व्यक्तीला तिचा असा स्पेशल वेळ मिळु शकतो. अर्थात स्पेस म्हणजे जोडीदाराच्या गरजा दुर्लक्ष करणे असा अर्थ होत नाही. त्यामुळे घराच्या, जोडीदाराच्या गरजांना प्राधान्य देत स्वतासाठीही काही काळ राखून ठेवणे म्हणजे स्पेस जपणे असे म्हणता येईल.

couple-space

असा काढा मार्ग-

नवरा बरेचदा घराबाहेर असल्यामुळे तो स्वतछला पाहिजे तेवढा वेळ देऊ शकतो. किंवा तसा प्रयत्न आयत्यावेळी केल्यास ते त्याला जमू शकते. पण बायकोला असा वेळ देता येत नाही. तिला घरातल्या जबाबदाऱ्या अधिक असतात. त्यामुळे तिची अडचण जर नवऱ्याने समजून घेत तिला मदत केली तर त्यांच्यातले नाते अधिक बहारायला मदत होईल.

या स्पेसचा उपयोग स्वतकडे डोळसपणे बघण्यासाठी करता येऊ शकतो. आपल्या कमतरतेवर डोळसपणे विचार करून नवे नाते खुलवण्यासाठी उपयोग करता येईल.

नव्या गोष्टी शिकता येऊन स्वतला अपडेट ठेवता येईल. ग्रुमिंग करण्यावरही भर दिलात तर अधिक फायदा होईल.

लग्न झाल्यानंतर एकमेकांच्या मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना वेळ देता येत नाही. या स्पेस चा उपयोग मित्र-मैत्रिणींना भेटून आनंदात घालवता येईल.

एकमेकांना पुरेसा अवकाश दिल्यास दोघांचे नाते अधिक घट्ट होण्यास मदत येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: हा ऐतिहासिक विजय, जनतेचे आभार- शिंदे

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT