एक स्त्री दररोज अनेक जबाबदाऱ्या पार पाडत असते. घर, ऑफिस, नातेवाईक हे सारं काही मॅनेज करताना तिची तारांबळ उडते. मात्र, तरीदेखील या सगळ्या गोष्टी लिलया पार पाडण्याचा ती प्रयत्न करत असते. म्हणूनच, स्त्रियांना आपण कायम मल्टीटास्कर म्हणतो. परंतु, हा मल्टीटास्क स्त्रियांसोबतच अनेक पुरुषही करत असतात. खासकरुन ते पुरूष जे सिंगल फादर आहेत. मुलांचा सांभाळ आणि त्यांच्या भविष्यासाठी आर्थिक तरतूद या दोन्ही गोष्टी करताना सिंगल फादरला अनेक अडचणी येत असतात. म्हणूनच, घर, मुलं आणि ऑफिस याचा ताळमेळ कसा साधावा याच्या काही टीप्स आपण जाणून घेऊयात. (special-tips-for-single-dad-to-maintain-balance-between-work-and-life)
१. प्री-प्लॅनिंग गरजेचं -
कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी त्याचं प्री-प्लॅनिंग असणं अत्यंत गरजेचं आहे. प्लॅनिंग केलं असेल तर अनेक गोष्टी करणं सोपं होतं. जर तुमचं बाळ लहान असेल तर त्याच्या झोपेच्या वेळा आणि जेवणाच्या वेळा यांच्याकडे लक्ष द्या. सोबतच ऑफिसच्या कामाकडे दुर्लक्ष होणार नाही याचीही काळजी घ्या. जर तुम्हाला ऑफिसला जावं लागत असेल तर ऑफिसची बॅग किंवा ऑफिसला जाताना लागणाऱ्या गोष्टींची तयारी आदल्या दिवशीच करुन ठेवा. तसंच बाळाला लागणाऱ्या गोष्टीही तयार ठेवा. म्हणजे ऐनवेळी तुमची धावपळ होणार नाही.
२. शेड्युल चेंज करा -
प्रत्येक आई-वडील बाळाप्रमाणे आपलं शेड्युल अॅडजेस्ट करत असतात. परंतु, तुम्ही सिंगल फादर असल्यामुळे तुम्हाला आई आणि वडील या दोघांचाही वेळ बाळाला द्यावा लागतो. त्यामुळे ऑफिसचं काम आणि घरचं काम यांच्याव्यतिरिक्त मुलांसाठी खास वेळ राखून ठेवा. तसंच सध्या वर्क फ्रॉम होम असल्यामुळे अनेकांना आपल्या मुलांसोबत वेळ घालवता येत आहे. मात्र, जर ते शक्य होत नसेल तर बॉससोबत चर्चा करा. तुमची समस्या त्यांना समजून सांगा आणि शिफ्ट अॅडजेस्ट करुन घ्या. तसंच मुलांसाठी काही खेळणी आणून ठेवा ज्यामुळे तुम्ही ऑफिसच काम करत असताना मुलं त्या खेळण्यांमध्ये बिझी राहतील.
३. संवाद गरजेचा-
लहान मुलांशी संवाद साधणं अत्यंत गरजेचं आहे. खरं तर मुलं अनेकदा त्यांचं मन आईजवळ मोकळं करत असतात. परंतु, आता वडील असण्यासोबतच मुलांची आई असण्याचीही जबाबदारी तुम्हालाच पार पाडायची आहे. त्यामुळे मुलं भावनिकरित्या तुमच्यासोबत कसे अटॅज होतील याकडे लक्ष द्या. मुलांशी संवाद साधा, त्यांच्यासोबत खेळ खेळा. त्यामुळे तुमचं नातं अधिक घट्ट होईल. तसं तुम्ही ऑफिसमध्ये असला तरीदेखील दिवसातून २ वेळा तरी मुलांना फोन करा. जर तुमचं बाळ खूपच लहान असेल आणि त्याच्यासाठी केअर टेकर असेल तर व्हिडीओ कॉल करुन बाळाशी बोलण्याचा प्रयत्न करा.
४. अभ्यासाकडे लक्ष द्या-
सुट्टीच्या वेळी मुलांचा अभ्यास घ्या. मुलांना लहानपणापासूनच आत्मनिर्भर राहण्याचं कौशल्य शिकवा. लहान लहान गोष्टींमधून स्वत:ची काम स्वत: कशी करावीत याचं ट्रेनिंग द्या. उदा. जेवण झाल्यावर आपलं ताट उचलून ठेवणे, शाळेचं दप्तर भरणे, डबा भरणे. या गोष्टी शिकल्यामुळे मुलं लवकर समजूतदार होतात.
५. शिस्त महत्त्वाची -
आई नसल्यामुळे अनेक मुलांचे प्रमाणापेक्षा जास्त लाड केले जातात. ज्यामुळे मुलं बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळेच मुलांचे लाड करण्यासोबतच त्यांना शिस्त लावण्याचीही गरज आहे. वेळप्रसंगी त्यांना ओरडा, प्रेमाने समजवा. पण चूक आणि बरोबर यांच्यातील फरक त्यांना लहानपणीच समजावून सांगा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.