Split Grain Soup esakal
लाइफस्टाइल

Split Grain Soup : घरातीलच डाळ अन् बटाट्यांपासून बनवता येतं सूप, रेसिपी आहेत खूप सोप्पी

टोमॅटो, मसूर डाळ व बीट सूप कसे बनवायचे?

Pooja Karande-Kadam

Split Grain Soup :

हिवाळ्यात सर्दी, खोकला, खोकला यांसारख्या आजारांच्या समस्या वाढतात. असे आजार घरातीलच पौष्टीक पदार्थांमुळे पळवून लावता येतात. हिवाळ्याच्या दिवसात गरमागरम सूप प्यायला सगळ्यांनाच आवडतं. हिवाळ्याच्या कोमट उन्हात पोषक असलेल्या सूपचा आस्वाद घेतल्याने वेगळाच आनंद मिळतो. हे सूप स्वादिष्ट तर आहेच पण आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे.

आज आपण घरातीलच डाळी आणि बटाट्यापासून सूप कसे बनवायचे, याच्या रेसिपी पाहणार आहोत. ज्या आपल्या शरीराला पोषक घटक पुरवतात अन् त्यामुळे आपले आजार दूर पळतात. या रेसिपी उमाशशी भालेराव यांनी सांगितलेल्या आहेत.  

पालक व मुगाचे सूप

साहित्य -

एक जुडी पालक, अर्धी वाटी हिरवे मूग, १ कांदा बारीक चिरून, ४-५ लसूण पाकळ्या, छोटा तुकडा दालचिनी, मीठ, मिरपूड, साखर, दोन चमचे मैदा अथवा कणीक.

कृती

पालकाची पाने स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्यावीत. अर्धी वाटी मूग आदल्या रात्री भिजत ठेवून सकाळी सूपसाठी घ्यावेत. पालक, मूग, बारीक चिरलेला कांदा, लसूण पाकळ्या, दालचिनी तुकडा सर्व एकत्र करून पाणी घालून कुकरमध्ये शिजवून घ्यावे. नंतर मिक्सरमधून एकजीव करून मोठ्या गाळणीने गाळून घ्यावे.

थोड्या पाण्यात दोन चमचे मैदा अथवा कणीक कालवून सूपमध्ये मिसळावे. मीठ, मिरपूड, किंचित साखर घालून सर्व पुन्हा उकळून घ्यावे. सतत ढवळावे म्हणजे गाठी होणार नाहीत. हे सूप सर्व्ह करताना प्रत्येकाच्या बाऊलमध्ये सूपवर थोडे क्रीम अथवा दूध घालावे.

टोमॅटो, मसूर डाळ व बीट सूप

साहित्य

पाव किलो चांगले पिकलेले लाल टोमॅटो, अर्धी वाटी मसूर डाळ, बिटाचे ४-५ तुकडे, १ कांदा, ४-५ लसूण पाकळ्या, दालचिनीचा तुकडा, मीठ, मिरपूड, साखर.

कृती

टोमॅटो व कांदा बारीक चिरून घ्यावा. बिटाचे ३-४ तुकडे घ्यावेत. कांदा, टोमॅटो, बीट व लसूण पाकळ्या, दालचिनी सर्व एकत्र करून ३-४ वाट्या पाणी घालून कुकरमध्ये शिजवून घ्यावे. नंतर मिक्सरमध्ये एकजीव करून नंतर मोठ्या गाळणीने गाळून घ्यावे. दोन चमचे मैदा वा कणीक थोड्या लोण्यावर परतून त्यावर थोडे पाणी घालून शिजवून घ्यावे व सूपमध्ये मिसळावे.

सतत ढवळत उकळून घ्यावे. सूप आवडीप्रमाणे दाट वा पातळ ठेवावे. चवीनुसार मीठ, मिरपूड व साखर घालावी. सूप सर्व्ह करताना प्रत्येक बाऊलमध्ये सूपवर थोडे क्रीम अथवा साय घालावी. तळलेले छोटे ब्रेडचे तुकडे घालून सर्व्ह करावे. बिटामुळे सूपला सुरेख लाल रंग येतो.

बटाटा सूप

साहित्य

चार मऊ उकडलेले बटाटे, १ कांदा बारीक चिरून, स्वादासाठी अर्धा छोटा चमचा आले-लसूण पेस्ट, मीठ, मिरपूड, चमचाभर लोणी.

कृती

चांगले मऊ शिजवून घेतलेले बटाटे ४ कप पाण्यात चांगले कुस्करून गाळून घ्यावेत. १ चमचा लोणी तापवून त्यात बारीक चिरलेला कांदा लालसर होईपर्यंत परतावा. त्यात स्वादासाठी आले-लसूण पेस्ट घालावी व त्यावर बटाट्याचे पाणी घालून उकळावे. चवीनुसार मीठ, मिरपूड घालावी. या सूपला बटाट्याचा दाटपणा असतोच. गरम गरम सर्व्ह करताना हवे असल्यास थोडे चीज किसून घालावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

SCROLL FOR NEXT