Spoon For Beauty  esakal
लाइफस्टाइल

Spoon For Beauty : घरातला एक साधा चमचाही वाढवू शकतो तुमचे सौंदर्य, कसं? जाणून घ्या

चेहऱ्याचं सौंदर्य वाढवण्यासाठी विविध घरगुती उपाय उपलब्ध असतात.

धनश्री भावसार-बगाडे

How To Use Spoon To Glow Your Face In Marathi :

आपला चेहरा तजेलदार, उजळ आणि सुंदर दिसावा म्हणून लोक काय काय उपाय नाही करत. अनेक फेसपॅक, अनेक क्रिम, डाएट, योगा असे विविध पर्याय वापरतात. पण त्यामुळेही चेहऱ्यावर फरक दिसेल का, असं कोणीही खात्रीशीररित्या सांगू शकत नाही.

पण तुमच्या घरातला साधा एक टेबल स्पून हा ग्लो तुम्हाला मिळवून देऊ शकेल. कसा, ते जाणून घेऊया.

Spoon For Beauty

चेहऱ्याचा ग्लो हा चेहऱ्याला होणाऱ्या सुरळीत रक्तपुरवठ्यावर अवलंबून असतो. यासाठी चेहऱ्याला नियमित पद्धतशीररित्या मसाज होणे गरजेचे असते.

हा मसाज कसा करावा?

  • सर्वात आधी चेहरा स्वच्छ धुवा.

  • चेहऱ्यावर मेकअप असेल तर काढून टाका.

  • मग चेहऱ्यावर मॉइश्चरायझिंग लोशन किंवा क्रीम लावा.

  • चमचा ५ मिनीटे फ्रीजमध्ये ठेवा.

Spoon For Beauty
  • हा मसाज डोळे व संपूर्ण चेहऱ्यासाठी असतो.

  • चमचा फ्रीजमधून काढून डोळ्यांवर ठेवा.

  • चेहऱ्याचा मसाज करताना थंड चमचा गालावर ठेवा.

  • हलकासा दाब देत खालून वरच्या दिशेने फिरवा.

फायदे

  • चेहऱ्यावर हलकासा दाब पडल्याने ब्लड सर्क्युलेशन सुरळीत होते. स्कीन हेल्दी होते.

  • रोज थंड चमच्याने चेहऱ्यावर मसाज केल्याने सुरकूत्यांची समस्या कमी होते.

  • डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी करण्यासाठी थंड चमच्याने त्यावर मसाज करावा.

  • चेहऱ्यावर सूज आली असेल किंवा जळजळ होत असेल तर थंड चमच्याच्या मसाजने आराम मिळतो.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

IPL Auction 2025 मधून तब्बल १००० खेळाडूंचा पत्ता कट; आता २०४ जागांसाठी ५७४ खेळाडू रिंगणात; जाणून घ्या तपशील

School Holiday: शाळांना ‘इलेक्शन डे’ सह तीन दिवस खरंच सुट्टीए का? शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण

Karad South Assembly Election : देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांना कराड तालुक्यात पाऊल ठेवून देणार नाही - शिवराज मोरे

SA vs IND 4th T20I: सूर्याने जिंकला टॉस! मालिका विजयासाठी टीम इंडिया, तर द. आफ्रिका बरोबरीसाठी सज्ज; पाहा Playing XI

SCROLL FOR NEXT