Stomach Worms in Children esakal
लाइफस्टाइल

Stomach Worms in Children : घरगुती उपायांनीही मुलांच्या पोटातील जंत घालवता येतात? कसं ते वाचा!

पोटात कृमी असल्याची काही लक्षणे बाळाच्या शरीरात दिसून येतात

Pooja Karande-Kadam

Stomach Worms in Children : मुलांच्या पोटात कृमी असणे खूप सामान्य आहे. पण ही साधी गोष्ट वेळीच दुरुस्त करणं गरजेचं आहे. अनेकदा वाढत्या मुलांमध्ये स्वच्छतेच्या अभावामुळे पोटात कृमी होतात. मुलं जमिनीपासून मातीपर्यंत प्रत्येक गोष्टीला हात लावून तोंडात घालतात.

अनेकदा मुलांचे दात येत असताना तोंडात हात, बोटे तोंडात घालतात. ज्यामुळे हातांची घाण पोटात जाते आणि किडे वाढू लागतात. हे परजीवी पोटात पोहोचताच त्यांची संख्या झपाट्याने वाढवू लागतात. तरी पोटात कृमी असल्याची काही लक्षणे बाळाच्या शरीरात दिसून येतात.

नेशनल सेंटर फॉर बायोटेक्‍नोलोजी इंफॉरमेशन म्हणजेच एनसीबीआईच्या म्हणण्यानुसार दरवर्षी जवळपास 800 ते 900 दशलक्ष लहान मुले पोटात किडे होणे या समस्येला बळी पडतात. या मुलांना अॅनिमिया, थकवा तसेच कमजोर आकलनशक्ती यांसारख्या समस्या सतावू शकतात. हे किडे आतड्यांमधील पोषक तत्वे खाऊन टाकतात आणि याचा थेट परीणाम बाळाच्या विकासावर होतो.

पोटातील जंतांची लक्षणे

-मुलांच्या पोटात सतत दुखणे

-मुलाचे वजन कमी होणे

-भूक न लागणे

-खाण्यात रस कमी होणे

-उलट्या किंवा खोकला

-कधीकधी मुले खूप चिडचिड होतात

-हगवण किंवा पुन्हा मळमळणे

- गुदद्वारात खाज आणि लालसरपणा

लहान मुलांमध्ये दिसणार्‍या या लक्षणांवर पोटातील जंत मारण्यासाठी काही घरगुती उपाय केले जाऊ शकतात. ज्यामुळे त्यांना आराम मिळतो.पोटातील जंत मारण्यासाठी घरगुती उपाय

सेलरी पावडर

सेलरी पावडरमध्ये काळे मीठ मिसळून रात्री कोमट पाण्यासोबत दिल्यानेही पोटातील जंत दूर होतात. सेलरीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. सेलेरी भाजून त्याची पावडर बनवा. नंतर त्यात गूळ मिसळून लहान गोळ्या कराव्यात. या गोळ्या मुलांना दिवसातून तीन वेळा खायला द्या. या गोळ्यामुळे मुलांच्या पोटात वाढणाऱ्या जंतांना मारण्यास मदत होईल.

टोमॅटो- काळी मिरी पावडर

टोमॅटो कापून त्यावर काळी मिरी पावडर टाकून मुलाला द्या. हे खाल्ल्यानेही पैजेचे किडे मरून बाहेर पडतात. बाळाला भोपळ्याचे दाणे खायला द्या. हे खाल्ल्याने पोटातील जंतही सुटण्यास मदत होते.

लसूण

लसूण ही शरीरातील विषाणू आणि जीवजंतू नष्ट करते. म्हणून यात असणारी एलिसिन आणि एजोएन नावाची तत्वे आजार निर्माण करणाऱ्या जंतूंना नष्ट करतात. लसूणच्या नियमित सेवनाने शरीराची स्वच्छता होते आणि किड्यांपासून होणारे ऑक्सिडेशन होण्यापासून वाचवते.

हळद

हळदीमध्ये कर्करोग विरोधी, एंटी-इंफ्लामेट्री आणि जखम भरणारे गुण असतात. हा मसाला पदार्थ विषाणू आणि जीव जंतू मारण्यात सुद्धा प्रभावी असतो. यामुळे रक्त साफ होते. तुम्ही कोणत्याही रुपात हळद आपल्या मुलाला खायला देऊ शकता.

भोपळ्याच्या बिया

भोपळ्याच्या बियांमध्ये करक्‍यूबिटिन असते ज्यात किडे मारण्याचे गुण असतात. यात आतडे आणि पचन मार्ग यामध्ये असणारे किडे नष्ट करण्याची क्षमता असते.

पपई

किडे नष्ट करण्यासाठी पपई सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावतात. पपईच्या बियांमध्ये मध मिसळून ते मुलाला खाऊ घालावे. जर तुम्ही मुलाला थेट पपई खाऊ घालणार असाल तर त्या पूर्वी एक दिवस ते अॅप्पल साईड व्हिनेगर मध्ये फर्मेंट करा आणि मग मुलाला खाऊ द्या.

कडुलिंब

कडूलिंबाच्या पाण्यामध्ये एंटीबेक्‍टीरियल गुण असतात. सकाळी उपाशी पोटी मुलाला कडूनिंबाची काही पाने चावायला द्यावीत. यामुळे पचनामध्ये सुधारणा होते आणि आतड्यांमध्ये जमा असणारे वाईट जंतू नष्ट होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hatkanangale Assembly Election 2024 Results : हातकणंगले मतदारसंघात महायुतीच्या अशोकराव मानेंनी 46 हजार 397 मतांनी मिळवला विजय

राष्ट्रपती बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अभिजीत बिचुकलेंना आमदारही बनता येईना ; निवडणुकीत मिळालेल्या मतांचा आकडा वाचून बसेल धक्का !

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: ठाण्यात केदार दिघेंचे डिपोझिट जप्त

Dilip Sopal won Barshi Assembly Election : बार्शीमध्ये दिलीप सोपलचं! शिवसेना शिंदेच्या राजेंद्र राऊतचा पराभव

Rais Shaikh Won In Bhiwandi East Assembly Election : भिवंडी पूर्वेत रईस शेख विजयी; शिवसेनेच्या संतोष शेट्टींचा मोठ्या फरकाने पराभव

SCROLL FOR NEXT