Skin Allergy sakal
लाइफस्टाइल

Skin Allergy : सतत होतेय स्किन अ‍ॅलर्जी? रोजच्या आहारातील 'हे' पाच पदार्थ असू शकतात कारण..

त्वचेच्या अ‍ॅलर्जीमुळे शरीराच्या वेगवेगळ्या भागात खाज आणि लाल पुरळ उठतात. त्वचेची अ‍ॅलर्जी अनेक गोष्टींमुळे होऊ शकते जसे की औषधे, अन्न, द्रवपदार्थाचे सेवन किंवा झाडे, वनस्पती आणि प्राणी यांच्याशी संपर्क.

Aishwarya Musale

त्वचा हा आपल्या शरीराचा सर्वात संवेदनशील भाग आहे. तुमच्या थोड्याशा निष्काळजीपणामुळेही त्वचेची अ‍ॅलर्जी होऊ शकते. त्वचेची अ‍ॅलर्जी अनेक कारणांमुळे होते. त्वचेच्या अ‍ॅलर्जीमुळे शरीराच्या वेगवेगळ्या भागात खाज आणि लाल पुरळ उठतात. त्वचेची अ‍ॅलर्जी अनेक गोष्टींमुळे होऊ शकते जसे की औषधे, अन्न, द्रवपदार्थाचे सेवन किंवा झाडे, वनस्पती आणि प्राणी यांच्याशी संपर्क. परंतु बहुतेक लोकांना फूड अ‍ॅलर्जी असते, अनेकांना याची माहिती नसते. तर, आज आम्ही तुम्हाला अशा काही खाद्यपदार्थांबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्या सेवनामुळे त्वचेची अ‍ॅलर्जी होऊ शकते.

अंडी

अंडी खाल्ल्याने अनेकांना ॲलर्जीही होते. अंड्यांमध्ये असलेले कोनाल्ब्युमिन, ओव्हुमुकोइड आणि ओव्हलब्युमिन ही प्रथिने लोकांमध्ये ॲलर्जी निर्माण करू शकतात. अंडी खाल्ल्याने प्रौढांपेक्षा लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात ॲलर्जी होऊ शकते. ॲनाफिलेक्सिसचा धोका असतो ज्यामुळे अचानक रक्तदाब कमी होणे, श्वास घेण्यास त्रास होणे, उलट्या होणे, त्वचेवर पुरळ येणे इ.

सोया

सोयाबीन खाल्ल्याने अनेकांना त्वचेवर पुरळ, गाठी आणि एक्झिमासारखे त्रास होऊ शकतात. . सोयाबीनमध्ये असलेले प्रोटीन आणि लेसिथिन त्वचेची ॲलर्जी वाढवतात. त्यामुळे त्वचेची ॲलर्जी असलेल्यांनी या वस्तू टाळल्या पाहिजेत.

मासे

तज्ज्ञांच्या मते, माशांची ॲलर्जी कधीकधी घातक ठरते. यामुळे घशात सूज, जुलाब, उलट्या, स्किन इरिटेशन, रक्तदाब कमी होऊ शकतो.

डेअरी

बहुतेक लोकांना दुग्धजन्य पदार्थांची ॲलर्जी असते. ही ॲलर्जी विशेषतः मुलांमध्ये सामान्य आहे. दूध, दही, चीज आणि लोणी यासारख्या दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केल्याने एक्झिमा होऊ शकतो. दुग्धजन्य पदार्थांच्या थेट संपर्कामुळेही अनेकांना ॲलर्जी होते. त्यामुळे या गोष्टींचे सेवन करू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: आज शेअर बाजार राहणार बंद; बीएसई आणि एनएसईवर कोणतेही ट्रेडिंग होणार नाही

Latest Maharashtra News Updates : गृह मतदान मोहिमत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क

Sweet Potato Patties: सकाळी नाश्त्यात बनवा चटपटीत रताळं पॅटिस, जाणून घ्या रेसिपी

Congress : समाजात फूट पाडण्यासाठीच भाजपने कलम 370 चा मुद्दा जिवंत ठेवलाय, खर्गेंचा हल्लाबोल

Satara Assembly Election : संदेश, रिल्स पाहताना सावधानता बाळगा...एपीके फाइलवर क्लिक नको, अन्यथा बँक खाते होईल रिकामे

SCROLL FOR NEXT