मुंबई : आता शिक्षक आणि विद्यार्थी एकाच वेळी एकाच वर्गात बसून porn film बघत असतील तर आश्चर्य वाटायला नको; कारण तसा अभ्यासक्रमच एका महाविद्यालयाने तयार केला आहे.
अमेरिकेच्या यूटाह राज्यातील वेस्टमिस्टर महाविद्यालयाने हार्डकोर पॉर्नोग्राफीविषयी एक अभ्यासक्रम तयार केला आहे. USA Todayच्या वृत्तानुसार यूटाहमधील सॉल्ट लेक सिटीतील वेस्टमिस्टर महाविद्यालयाने 'फिल्म ३०००' हा वेगळाच अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमात हार्डकोर पॉर्नोग्राफीवर आधारित एक विषय आहे.
विद्यार्थ्यांनी लैंगिक संबंधांविषयी मोकळेपणाने चर्चा करावी, असा या अभ्यासक्रमाचा उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. हा विषय म्हणजे सामाजिक विषयावर चर्चा करण्याची एक संधी आहे. तसेच अशा विषयांवर बोलणे आवश्यक आहे की नाही हे ठरवण्याची संधीही यामुळे विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या अभ्यासक्रमावर अनेकांनी टीकाही केली आहे.
अभ्यासक्रमाबाबतचा एक स्क्रीनशॉट समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहे. त्यात लिहिले आहे की, 'हार्डकोर पॉर्नोग्राफी फ्रायडे नाइट फुटबॉलपेक्षाही लोकप्रिय आहे. त्यामुळे एक कला म्हणून या विषयावर गांभीर्याने चर्चा केली जाऊ शकते. आपण एकसाथ पॉर्नफिल्म्स बघू आणि त्यावर चर्चा करू'.
वाद सुरू झाल्यानंतर महाविद्यालयाने संकेतस्थळावरून या अभ्यासक्रमाची माहिती काढून टाकली; मात्र अभ्यासक्रम बंद केलेला नाही. महाविद्यालयाच्या मुख्य विपणन अधिकारी शीला यॉर्किन यांनी सांगितले की, "आम्ही हा अभ्यासक्रम बंद करणार नाही. सामूहिक शैक्षणिक स्वातंत्र्य आणि किचकट विषयांवर मोकळेपणाने चर्चा करण्याच्या परंपरेचे आम्ही समर्थन करतो. या विषयाच्या अध्यापनाचा अनुभव असलेल्या प्राध्यापकांची नेमणूक आम्ही केली आहे. अध्यापन सुरू असताना एखाद्या विद्यार्थ्याला संकोच वाटल्यास त्याला वर्गाबाहेर जाण्याची मुभा आहे".
महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, याआधीही या अभ्यासक्रमाचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. टाळेबंदीमुळे हा अभ्यासक्रम लागू होऊ शकला नाही. २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात तो लागू केला जाणार असून आतापर्यंत १६-१७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.