Success Story esakal
लाइफस्टाइल

Success Story : साठीनंतर भाग्यम शर्मांनी घडवला इतिहास, आंतराष्ट्रीय पातळीवरही केलाय त्यांचा सन्मान, वाचा कोण आहेत त्या?

Pooja Karande-Kadam

Success Story : लोक म्हणतात प्रेमाला वय नसतं. ते अगदी म्हातारपणीही आधार मिळवण्यासाठी होऊ शकतं. पण, तुम्हाला माहितीय का यशस्वी होण्यालाही वयाचं बंधन नाहीय. आज आपण एका अशा महिलेबद्दल बोलणार आहोत जिने वयाच्या ६५ व्या वर्षानंतर करिअरला सुरूवात केली.

केवळ सुरूवात नव्हे तर आंतराष्ट्रीय पातळीवर देखील झेंडे फडकवले आहेत. असं म्हणतात की आयुष्यात काहीतरी करण्याची जिद्द असेल तर वय किंवा परिस्थिती आड येत नाही. या महिलेचे नाव भाग्यम शर्मा असून त्या आता ८० वर्षांच्या आहेत. पण, आजही त्या काम करत आहेत. 

वयाच्या ६५ व्या वर्षानंतर भाग्यम यांनी लिखानाला सुरूवात केलीय. त्यांच्या लिखानाला राज्यच नव्हे तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही दाद मिळाली आहे. आजही ती गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी सरकारला मदत करायला तयार आहे.

तामिळ भाषेचे चांगले ज्ञान असल्याने पोलिस त्यांना मदत तर करतात. शिवाय राज्य सरकारच्या पत्रव्यवहारातही मदत करतात. वयाच्या या टप्प्यावर भाग्यमने लॅपटॉप, कार चालवणे यासारखे आधुनिक तंत्रज्ञानही त्यांनी अवगत केले आहे.

वयाची ६० ओलांडलेला व्यक्ती आपण म्हातारे झालो असे म्हणत रिटायरमेंट प्लान करतात. पण भाग्यम वेगळ्याच आहेत. पेशाने त्या शिक्षिका होत्या, वयाच्या ६० नंतर त्या कार्याने ही रिटायर झाल्या. पण, मनाने त्यांना अजून काम करायचं होतं.

रिटायनमेंटनंतर दोनच वर्षांनी त्यांच्या पतीचे निधन झाले. त्यांना वाटलं की आता सगळं संपलं, पण त्यांनी जवळच्याच काही महिलांना लिहीताना पाहीलं. तेव्हा आपणही काहीतरी चांगल लिहू शकू असे वाटून त्यांनी एक छोटी कथा लिहीली. लोकांनी त्याचं जास्त कौतुक केलं. 

भाग्यम शर्मा सांगतात की, जेव्हा मी लिहायला सुरुवात केली तेव्हा एक नवीन प्रवास सुरू झाला. रोज माझ्यावर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला. आतापर्यंत माझी १४-१५ हून अधिक लिखित पुस्तके प्रकाशित झाली आहेत. मी मुले, स्त्रिया आणि वर्तमान काळ यावर कथा लिहिल्या आहेत.

कथांव्यतिरिक्त त्यांनी कादंबऱ्याही लिहिल्या आहेत. भाग्यम सांगतात की, एके दिवशी त्यांना अचानक विचार आला की. जे कागदावर लिहिलं जातं, ते लॅपटॉपवर का लिहू नये, मी लॅपटॉप घेतला टायपिंग शिकले आणि मग लिहायला सुरुवात केली.

यानंतर टेक्नॉलॉजीच्या अनेक गोष्टी आत्मसात केल्या. आता त्या फक्त लॅपटॉपवर लिहितात. जिथे कथा पाठवायच्या असतील तिथे ती स्वतः मेलद्वारे पाठवतात. भाग्यम शर्मा सांगतात की, मला लिहिलेल्या कथा आणि साहित्याशी संबंधित अनेक पुरस्कार तिला मिळाले आहेत.

त्यांच्या लेखनाचा केवळ राजस्थानातच नव्हे तर इतर राज्यांतही गौरव झाला आहे, कतारनेही त्यांच्या छापील पुस्तकासाठी सन्मानपत्र पाठवले आहे.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT