Success Story :
अपघात झाला असला तरी खचायचं नाही, धीरानं उभं रहायचं असे अनेक किस्से आपण ऐकले आहेत. अशा लोकांना पाहिलं की आपल्याला संकटांशी लढण्याची ताकद मिळते. आज आपण अशाच एका मुलीला भेटणार आहोत. जिनं अपघातात एक हात गमावला अन् तरीही ती जिद्द हरली नाही.
आपण जिच्याबद्दल माहिती घेणार आहोत ती आहे अनामता. अनामता मुंबईत राहत असून ती केवळ १५ वर्षाची आहे. अनामता जेव्हा आठवीत होती तेव्हा तिच्यासोबत एक वाईट गोष्ट घडली. ती म्हणजे, तिला विजेचा धक्का बसला आणि तिने एक हात कायमचा गमावला.
१३ वर्षाची असताना अनामता भावंडांसोबत खेळत होती. तेव्हा जवळच असलेल्या केबलच्या वायरचा धक्का दिला लागला. खेळण्यात मग्न असलेल्या अनामताला जोरदार विजेचा धक्का बसला. यात तिचा हातच नाहीतर संपूर्ण शरीरावर जखमा झाल्या होत्या. डॉक्टरांनी बरे करण्यासाठी तिचा हात कापण्यास सांगितले.
या अपघाताने अनमताचे आयुष्यच बदलून गेले. अनामताने तिचा उजवा हात गमावला. नियतीने तिला हरवायची एकही संधी सोडली नाही. कारण, एक हात गमावला तर दुसऱ्या हाताची कार्यक्षमता केवळ २० टक्के उरली. अनामताचे शरीर साथ देत न्हवते. पण तिने जिद्दा हारली नाही.
अनामतला सुमारे ५० दिवस अंथरुणावर झोपून रहावे लागले. पण, आयुष्य कोणासाठी थांबत नाही आणि पुढे जात राहतं, असं म्हणतात, अनमताही आयुष्यासोबत पुढे चालू लागली. तिच्या दुखापतीतून आणि या धक्क्यातून सावरत अनामताने ९२टक्के गुण मिळवून १२ वी ICSE बोर्डात अव्वल स्थान पटकावले आहे. अनमताला हिंदीत ९८ टक्के गुण मिळाले असून ती या विषयात अव्वल ठरली आहे.
अनमताने अभ्यासातून एक-दोन वर्षांचा ब्रेक घ्यावा, आधी तिने तब्बेत सांभाळावी आणि मग पुढे जावे असे डॉक्टरांनी अनामताला सुचवले होते. पण अनामताला ब्रेक घ्यायचा नव्हता, इतके दिवस घरी बसून राहण्याची तिची इच्छा नव्हती.
या अपघातामुळे तिचे भावी आयुष्य निश्चित होणार नाही, असे अनमताने मनाशी ठरवले होते. अनमताच्या म्हणण्यानुसार, ती स्वत:ला भाग्यवान समजते की या अपघातातून ती जिवंत बचावली. मला कोणाचीही सहानुभूती नको आहे,हा माझ्या आयुष्याचा लढा आहे. त्यावर मी मात करेनच, असे ती फक्त तिच्या कुटुंबाला अन् मित्र-मैत्रिणींना सांगते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.