आपल्या तुटपुंज्या पगारात नेहमी स्वतःसाठी कपड्यांची खरेदी करत असतो पण कोट्यांधीश रुपयांच्या मालकीण असणाऱ्या सुधा मुर्ती यांनी 30 वर्षांनंतर स्वत:साठी एक साडी खरेदी केली आहे. हे ऐकल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हो.
इन्फोसिस कंपनीच्या माजी संचालक सुधा मूर्ती आणि त्यांचे पती नारायण मूर्ती हे त्यांच्या साध्या राहणीसाठी आणि उच्च विचारांसाठी ओळखले जातात. करोडोंचे मालक असूनही साधे जीवन जगण्यावर त्यांचा विश्वास आहे. पद्मश्री सुधा मूर्ती या स्वतः 775 कोटी रुपयांच्या संपत्तीच्या मालकीण आहेत. (Sudha Murthy Didn't Buy A Saree In 30 Years Learn How To Live Minimalist Lifestyle)
आता तुम्ही विचार करत असाल की, इतका पैसा असुनही इतकं साधं राहण्याची काय गरज. तर त्यांच्या दृष्टीनं पाहिल्यास त्याचं साधं राहणीमानही खूप काही शिकवून जातं. त्यांच्या या जीवनाला 'मिनिमलिस्ट लाईफस्टाईल' असेही म्हणतात, जीवन सोपे करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे.
तर जाणून घेऊ मिनिमलिस्ट जीवनशैली म्हणजे काय?
मिनिमलिस्ट जीवनशैली म्हणजे किमान गोष्टींसह जीवन जगणे. याचा अर्थ असा की, आपल्याला ज्या गोष्टीची अत्यंत गरज आहे त्याच वस्तुंची खरेदी करा. तुम्ही आर्थिक अडचणीत असाल किंवा तुमचा खर्च कमी करायचा असेल, तर कमी सामग्रीसह जगणे तुमच्यासाठी योग्य पर्याय असू शकतो. तुमचे जीवन सुधारण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.
मिनिमलिस्ट लोक अत्यावश्यक गोष्टी खरेदी करतात. वायफळ खर्चावर लक्ष केंद्रीत करत नाहीत. प्रत्येकाची जगण्याची शैली ही वेगळी असते. त्यामुळं तुमच्या स्वतःवर अवलंबून असतं की तुम्ही कशावर किती खर्च करता. तणाव कमी करण्यासाठी अनेकजण या जीवनशैलीचा अवलंब करतात.
मिनिमलिस्ट जीवनशैली कशी अंगीकारावी
एक शब्द लोकांच्या मनात चांगलाच बसला आहे आणि तो म्हणजे 'अधिक'. अधिक पैसा, अधिक प्रवास, अधिक मनोरंजन इ. ही मानसिकता आपल्याला आपल्याला अधिकच्या आहारी जात आहे. म्हणूनच आम्हाला अधिक कमवायचे आहे, अधिक खर्च करायचे आहे आणि अधिक खरेदी करायची आहे. हे आपल्याला अधिक आनंदी आणि अधिक यशस्वी वाटते.
पण तुम्हाला मिनिमलिस्ट जीवनशैली जगायची असेल तर, कपाटात फक्त आवश्यक वस्तू ठेवा, घराच्या सजावटीच्या वस्तूंवर कमीत कमी खर्च करा. नवीन वस्तू खरेदी करण्यापूर्वी ती घरात आहे का ते तपासा. खरेदी करताना, तुम्हाला त्याची खरोखर गरज आहे का हे लक्षात घ्या.
मिनिमलिस्ट जीवनशैलीचे फायदे
ही जीवनशैली जगण्याचे फायदे प्रत्येकासाठी वेगवेगळे असू शकतात. जसे काही लोकांसाठी हा बचत करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. जीवन व्यवस्थित आणि शिस्तबद्ध होते. आपल्याकडे कमी सामान असल्यास, आपल्याला कमी उपकरणे सांभाळावी लागतात आणि घराची साफसफाई सहज होते. इतर कामांसाठी आणि स्वतःसाठी जास्त वेळ मिळतो.
मिनिमलिस्ट जीवनशैली जगण्यासाठी सजगतेचा सराव करणे आवश्यक आहे, विशेषतः जेव्हा तुम्ही खरेदी करता. खरेदी करण्यापूर्वी, ही गोष्ट तुमच्या आयुष्यात कशी बसेल, तुम्ही ती किती वेळा वापराल याचा विचार करण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून तुम्ही अनावश्यक काहीही खरेदी करू नये.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.