लाइफस्टाइल

Sugarcane Juice : त्रासदायक ठरणाऱ्या गोळ्या बंद करा अन् ऊसाचा रस प्यायला सुरू करा, आहेत अनेक फायदे

Pooja Karande-Kadam

Sugarcane Juice :

ऊसाचा रस पिणे सर्वांनाच आवडते. ऊसाचा रस केवळ चवीलाच चांगला नाही तर आरोग्यासाठीही तो खूप चांगला मानला जातो. खरंतर उन्हाळ्यात लोकांना ऊसाचा रस प्यायला आवडतो. पण तुम्हाला माहित आहे का की हिवाळ्यातही ऊसाचा रस पिऊ शकतो.

ऊसाचा रस हिवाळ्यात आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतो. त्यामुळे ऊसाचा रस फक्त उन्हाळ्यातच प्यायला जातो, असे वाटत असेल तर ते चुकीचे ठरू शकते. हिवाळ्यात ऊसाचा रस खाल्ल्याने शरीर हायड्रेट राहते. येथे आपण हिवाळ्यात ऊसाच्या रसाचे फायदे जाणून घेणार आहोत. (Sugarcane)

सध्या अनेक आजारांवर गोळ्या घेतल्या जातात. लोक तर वजन कमी होण्यासाठी देखील औषधांचा वापर करतात. अशावेळी अनेक आजारांवर ऊसाचा रस फायद्याचा ठरतो.

हिवाळ्यात ऊसाचा रस प्यायल्याने आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर होतात. जाणून घेऊया ऊसाच्या रसाचे फायदे-

शरीराला हायड्रेट ठेवते-

हिवाळ्यात ऊसाचा रस पिणे खूप फायदेशीर ठरू शकते. वास्तविक,ऊसाचा रस थंड वातावरणात शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करतो. थंडीत लोक कमी प्रमाणात पाणी पितात. अशा स्थितीत शरीरात पाण्याची कमतरता जाणवते. अशा परिस्थितीत ऊसाचा रस पिऊन शरीर हायड्रेट ठेवता येते.

रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते

ऊसाचा रस हा मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि लोहाचा चांगला स्रोत मानला जातो. ऊसाचा रस पिऊन तुम्ही तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करू शकता. त्यात आवश्यक खनिजे देखील असतात.

हाडे मजबूत होतात

रोगप्रतिकारशक्ती सोबतच ऊसाच्या रसामुळे हाडेही मजबूत होतात. ज्यांची हाडे कमकुवत आहेत त्यांच्यासाठी ऊसाचा रस पिणे फायदेशीर आहे.

तणाव नियंत्रित ठेवते

ऊसाचा रस पिऊन तुम्ही तुमचा ताण नियंत्रित करू शकता. ऊसाचा रस प्यायल्याने झोपही सुधारते.

पचनसंस्था निरोगी ठेवा

ऊसाचा रस पचनसंस्थेसाठीही चांगला मानला जातो. यामध्ये असलेले फायबरचे प्रमाण बद्धकोष्ठता आणि अपचन सारख्या समस्या कमी करण्यासाठी तसेच पोट निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. हे प्यायल्याने पचनक्रिया सुरळीत राहते.

यूटीआय संसर्गास प्रतिबंध करते

ऊसाचा रस मूत्रपिंड आणि यकृताच्या कार्याला चालना देण्यासाठी आणि UTI संसर्ग रोखण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. ऊसाचा रस तुमचे यकृत मजबूत करण्यास मदत करू शकतो.

कावीळ बरा करते

काविळीच्या रुग्णांसाठीही ऊसाचा रस चांगला मानला जातो. काविळीवर ऊस हा एक उत्तम उपाय आहे. ऊसाचा रस प्यायल्याने कावीळ बरी होते.

वजन कमी करते

ऊसाचा रस पिऊनही वजन कमी करता येते. या रसात फॅट शून्य असते. उसाच्या रसात भरपूर फायबर असते. त्यामुळे वजन कमी करते, तसेच यामध्ये गोडवा तयार होण्यासाठी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Animal Fat in Temple: जगनमोहन रेड्डींनी तिरुपती मंदिरातील लाडूमध्ये वापरली जनावरांची चरबी? CM चंद्राबाबूंच्या आरोपाने खळबळ

Mumbai: विसर्जन मिरवणुकीत चोरांचा सुळसुळाट; तब्बल इतके मोबाईल केले लंपास, लालबागच्या राजाच्या मिरवणुकीत सर्वाधिक

One Nation One Election: ...तर पुढील विधानसभा ४.५ वर्षांची; यंदाच्या निवडणूक वेळापत्रकात बदलाची शक्यता नाही

IND vs BAN 1st Test Live Streaming: भारत-बांगलादेश पहिली कसोटी 'फ्री' मध्ये पाहा; किती वाजता, कोणत्या चॅनेलवर अन् ॲपवर दिसणार?

Cutlet Recipe: सकाळी नाश्त्यात मुग, मटकीपासून बनवा बहुगुणी कटलेट, दिवसभर राहाल उत्साही

SCROLL FOR NEXT