Face Beauty Tips : टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या जाहिराती बघून आणि पार्लरमध्ये तासंतास घालवून विकत घेतलेलं सौंदर्य किती काळ टिकतं हा एक गहन प्रश्नच आहे. कोणाचे तरी सल्ले ऐकून पार्लरमध्ये वेळ आणि पैसा खर्च करणाऱ्या तरुणी आज काही कमी नाहीत.पण, हे प्रत्येकीला परवडतच असं नाही.त्यामुळे आज आपण घरच्या घरी चेहऱ्याचा ग्लो परत कसा मिळवायचा हे जाणून घेऊयात.
धूळ आणि प्रदूषण यामुळे चेहऱ्यावर काळा थर जमा होता.त्यामुळे चेहरा निस्तेज दिसू लागतो. त्यासाठीच घरच्या घरी साखरेच्या स्क्रबने चेहरा गोरा कसा बनवता येईल हे पाहूयात. बटाट्याच्या रसामध्ये एक चमचा मध आणि साखर मिक्स करुन हा लेप चेहऱ्यावर लावावा. लेप सुकल्यानंतर गार पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. हा प्रयोग एक दिवसाआड करावा. त्यामुळे चेहऱ्यावरील ग्लो वाढण्यास मदत होते.
साखर – हळद
साखर आणि हळद पुड एकत्र बारीक करून घ्यावी.यात थोडा मध घातला तरी चालेल. याची एक घट्ट पेस्ट करून ती चेहऱ्याला १० मिनिट लावावी. आणि चेहरा धुवून टाकावा.
टोमॅटो - साखर
टोमॅटोच्या रसामुळे चेहऱ्याचा रंग उजळण्यास मदत होते. दिवसातून एकदा रोज टोमॅटोच्या अर्ध्या फोडीवर साखर घेऊन चेहऱ्यावर हलक्या हाताने मालिश करा.
ग्रीन टी – साखर
ग्रीन टीची पाने , साखर आणि बदाम तेल यांचे मिश्रण एकत्र करून पेस्ट बनवावी. ही पेस्ट हलक्या हातांनी चेहऱ्याला लावावी.
लिंबू - साखर
लिंबूरस आणि साखर यांची एकत्र पेस्ट रात्री झोपताना चेहऱ्याला लावल्यास नक्कीच फरक दिसून येतो.
हे सगळे प्रयोग एक दिवस केले आणि फरक नाही पडला म्हणून शांत राहू नका. चेहऱ्यावर सतत धूळ बसत असते त्यामुळे असे प्रयोग आठवड्यातून किंवा ४ दिवसातून एकदा नक्की करून बघा...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.