Summer Care  esakal
लाइफस्टाइल

Summer Care : उन्हाळ्यात हायड्रेट राहण्याचा स्वस्तात मस्त फॉर्म्युला, खरबूज खा अन् रहा फ्रेश

उन्हात बाहेर गेल्यानंतर शरीरात पाण्याची कमतरता भासते

सकाळ डिजिटल टीम

Summer Care :  

होळीनंतर खऱ्या अर्थाने उन्हाळ्याला सुरूवात झाली आहे. उन्हाळ्याच्या झळा बसू लागल्या की समर सूट, गॉगल, टोपी यांच्यासह मोसमी फळांचीही रेलचेल वाढते. केवळ फळे नाहीतर चौका-चौकात सरबते, लस्सी असे पदार्थ उन्हाळ्यात थंडावा देतात.

उन्हाळा आहे त्यामुळं घरी बसून चालणार नाही. ऑफीस, शाळा, रोजचे काम यासाठी घरातून बाहेर पडावं लागतं. उन्हात बाहेर गेल्यानंतर शरीरात पाण्याची कमतरता भासते. त्यामुळे सोबत पाण्याची बाटली ठेवण्याचा सल्ला सगळेच देतात.

पाण्याच्या बाटलीसोबतच एक फळ आहे जे सोबत ठेवले. तर, संपूर्ण उन्हाळा तुम्हाला डिहायड्रेशनचा त्रास होणार नाही. शरीरात पाण्याची कमतरता भासली तर चक्कर येणे, अशक्तपणा वाटणे असे अनेक आजार होऊ शकतात.

यासाठी खरबूज खाणे फायद्याचे ठरते. खरबुजामध्ये असलेले गुणधर्म शरीर हायड्रेट ठेवतात. टरबूजाप्रमाणेच खरबूजातही भरपूर पाणी असते. याशिवाय यामध्ये फायबर, बीटा-कॅरोटीन, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, व्हिटॅमिन ए, सी, पोटॅशियम, फोलेट इत्यादी अँटीऑक्सिडंट असतात, जे आरोग्यासाठी अनेक फायदे देतात.

खरबूजात पाणी सर्वाधिक प्रमाण असते. खरबूजमध्ये बीटी-कॅरोटीन, व्हिटॅमिन सी सारखे अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट असतात, जे शरीराला ऑक्सिडेटिव्ह तणावापासून वाचवण्यास मदत करतात. यामुळे जुनाट आजारांचा धोकाही बऱ्याच अंशी कमी होतो.

डोळे निरोगी ठेवण्यासाठी खरबूजाचे सेवनही करता येते. यामध्ये व्हिटॅमिन ए असते, जे दृष्टी सुधारण्यासाठी आवश्यक असते. खरबूजाचे सेवन केल्यास वय-संबंधित मॅक्युलर डिजेनेरेशन आणि मोतीबिंदूची समस्या उद्भवणार नाही.

अनेक फळांमध्ये काही घटक असतात जे दीर्घ आयुष्यासाठी हृदय निरोगी ठेवतात. असेच एक उन्हाळी फळ म्हणजे खरबूज. त्यात पोटॅशियम असल्याने, जे सामान्य रक्तदाब पातळी राखण्यास मदत करते. याचे सेवन केल्याने हृदयाचे आरोग्यही चांगले राहते आणि हृदयविकारापासून तुमचा बचाव होतो.

पचनक्रिया निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही उन्हाळ्यात खरबूजाचेही सेवन करू शकता. उन्हाळ्यात चुकीच्या पद्धतीने अन्न खाल्ल्याने अनेकदा पोट खराब होते. यामध्ये भरपूर फायबर असल्याने पचनक्रिया व्यवस्थित होते. बद्धकोष्ठता होत नाही कारण ते नियमितपणे आतड्यांसंबंधी हालचालींना प्रोत्साहन देते.

खरबूजाचे सेवन मर्यादित प्रमाणात करा अन्यथा तुम्हाला अतिसार, फुगणे आणि मळमळ यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तुम्ही जर वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही उन्हाळ्यात खरबूजाचे सेवन करू शकता.

वजन कमी करण्यासाठी हे खूप प्रभावी सिद्ध होऊ शकते. त्यात कमी कॅलरी, जास्त पाणी आणि फायबरचे प्रमाण यामुळे पोट बराच काळ भरलेले जाणवते. अशा प्रकारे तुम्ही जास्त खाणे टाळू शकता. आहारातील फायबर पचनास मदत करते, जे वजन कमी करण्यास खूप मदत करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT