Summer Health Sakal
लाइफस्टाइल

Summer Health: उन्हाळ्यात हृदयविकारासह वाढू शकतो 'या' आजारांचा धोका, अशी घ्या काळजी

Summer Health: उन्हाळ्यात आजारांना दूर ठेवायचे असेल तर आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.

पुजा बोनकिले

summer diseases food poisoning typhoid stomach pain avoid these thing

देशभरात कडक उन्हाच्या झळा सुरू झाल्या आहेत. या दिवसांमध्ये आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असते. अन्यथा आजारांचा धोका वाढू शकतो. उन्हाळ्यात शरीरामध्ये पाण्याची कमतरता असल्यास डिहायड्रेसनची समस्या वाढू शकतो. यामुळे हृदयाचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. तसेच डिहायड्रेसनमुळे थकवा देखील जाणवतो. यामुळे कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.

कोणते आजार होऊ शकतात

  • डोळ्यांचा संसर्ग

उन्हाळ्यात येणारी उष्णतेची लाट शरीरासह डोळ्याच्या आरोग्यासाठी चांगली नसते. यामुळे डोळ्यांचा संसर्ग वाढू शकतो. तीव्र सूर्यप्रकाशामुळेही डोळ्यांसंबंधित समस्या निर्माण होतात. यामुळे तुम्हा उन्हात बाहेर जात असाल तर सनग्लास लावावे आणि डोळे थंड पाण्याने धुवावे.

  • टायफाइड

उन्हाळ्यात टायफायड आजाराला लोक बळी पडू शकतात. मुलांमध्ये याचे प्रमाण अधिक आहे. या आजारात ताप, डोकेदुखी, उलट्या,जुलाब आणि थकवा यासारख्या समस्या जाणवतात. यामुळे उन्हाळ्यात आहाराची काळजी घ्यावी. आहारात हंगामी फळ आणि भाज्यांचा समावेश करावा. उन्हाळ्यात शिळे पदार्थ खाणे टाळावे.

  • अन्न विषबाधा

आरोग्य तज्ज्ञांच्या मते उन्हाळ्यात पोट बिघडणे, उलट्या आणि जुलाब यासारखे आजार उद्भवू शकता. कारण अन्नातून विषबाधा होते. उन्हाळ्यात अन्न लवकर खराब होते आणि त्यात बॅक्टेरिया वाढतात. यामुळे असे पदार्थ खाल्ल्यास विषबाधा होऊ शकते. त्यामुळे जास्त वेळ ठेवलेले अन्न खाऊ नका, रस्त्यावरील खाद्यपदार्थही टाळा.

  • पोटासंबंधित आजार

उन्हाळ्यात पोटासंबंधित आजार वाढू शकतात. कारण या दिवसांमध्ये अन्न आणि पाण्यातून बॅक्टेरिया पोटात जाऊ शकतात. यामुळे बद्धकोष्ठता, जुलाब यासारखे आजार होऊ शकतात. यामुळे स्वच्छ पाणी आणि खाद्यपदार्थ खावे.

  • उष्मघातापासून कसा बचाव करावा

उन्हाळ्यात पाण्याची कमतरता जाणवू देऊ नका.

दिवसभरात ६ ते ७ लिटिर पाणी प्यावे

उन्हात घराबाहेर जाताना पाणी बाटली सोबत घ्यावी.

उन्हाळ्यात बाहेर जाताना स्कार्फ आणि सनग्लास वापरावे

कलिंगड, खरबुज यासारख्या हंगामी फळांचे सेवन करावे

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FIDE World Championship: भारताच्या डी गुकेशचं पराभवानंतर दुसऱ्या फेरीत कमबॅक, लढत ड्रॉ राखण्यात यश

Manoj Jarange Patil: ''एकदा सरकार स्थापन होऊ द्या.. तुम्ही तयारीला लागा'' मनोज जरांगे यांचं मराठा समाजाला आवाहन

ZIM vs PAK: १४६ धावांचे लक्ष्य एकट्याने चोपल्या ११३ धावा! २२ वर्षीय पाकिस्तानी फलंदाजाची हवा

Islamic Country: 'या' मुस्लिम देशात भारतीय लोक खरेदी करत आहेत मोठ्या प्रमाणावर प्रॉपर्टी; जाणून घ्या कारण

Medical Research : जगातले श्रीमंत लोक शोधतायेत अमर होण्याचे औषध, उंदरावर केलेला प्रयोग

SCROLL FOR NEXT