Summer Drinks For Diabetes:  Sakal
लाइफस्टाइल

Summer Drinks For Diabetes: 'ही' 5 थंड पेय उन्हापासून देतील थंडावा अन् ब्लड शुगर राहील नियंत्रणात

Summer Drinks For Diabetes: उन्हाळ्यात ब्लड शुगर नियंत्रणात ठेवायची असेल तर तुम्ही पुढील थंड पेयाचे सेवन करू शकता.

पुजा बोनकिले

Summer Drinks For Diabetes how control blood sugar level read full story

उन्हाळा सुरू झाला आहे, त्यामुळे उष्णतेपासून आराम मिळावा म्हणून लोक विविध प्रकारचे थंड पेये पितात. थंड पेयांमुळे उन्हापासून बऱ्यापैकी आराम मिळतो पण ते मधुमेही रुग्णांना हानी पोहोचवू शकते. अशा परिस्थितीत उन्हाळ्यात मधुमेह असणाऱ्यांनी गोड थंड पेयेऐवजी पुढील पेयांचे सेवन करावे. हे प्यायल्याने साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

पालेभाजीपाल्याचा रस

मधुमेहाच्या रुग्णांना फळांचा रस प्यायल्याने रक्तातील साखर वाढण्याचा धोका असू शकतो. यामुळे अशा लोकांनी पालेभाज्या आणि फळभाज्यांचा रस प्यावा. मधुमेहाचे रुग्ण भाज्यांचा रस पिऊ शकतात. हे आरोग्यासाठी चांगले आहे आणि रक्तातील साखरेची पातळी देखील मोठ्या प्रमाणात नियंत्रित करते. पालक, काकडी, कारले, टोमॅटो, आवळा इत्यादींचा रस पिऊ शकता.

नारळ पाणी

उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी नारळ पाणी पिणे फायदेशीर असते. यामध्ये व्हिटॅमिन बी, पोटॅशियम, इलेक्ट्रोलाइट्ससह अनेक पोषक घटक असतात. जे शरीरासाठी चांगले असतात. हे रक्तातील साखर वाढण्यास प्रतिबंध करतात. उन्हाळ्यात तुम्ही भरपूर नारळ पाणी पिऊ शकता.

साखर न घालता लिंबू पाणी

उन्हाळ्यात लिंबू पाणी पिणे फायदेशीर असते. यामुळे डिहायड्रेशनची समस्या कमी होते. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असल्याने ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करते. लिंबू मधमेह रुग्णांसाठी फायदेशीर असते.

सत्तू शरबत

उन्हाळ्यात सातुचे शरबत प्यायल्याने शरीराला थंडावा मिळतो. तसेच रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रणात राहते. हे शरबत शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते.

थंड ताक

उन्हाळ्यात थंड ताक प्यायल्याने अनेक फायदे होतात. ताक प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत मिळते. तसेच शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत मिळते. मधुमेह असणारे लोक ताक पिऊ शकतात. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते.


डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tingre: शरद पवार ईडीला घाबरले नाहीत, तुमच्या नोटिशीला काय घाबरणार! सुप्रिया सुळेंचा टिंगरेंना टोला

DY Chandrachud: सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचा कार्यकाळ अखेर संपला! ‘या’ महत्वाच्या खटल्यांवर दिले निर्णय

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर....

Vadgaon Sheri News : पोर्शे अपघात प्रकरणी टिंगरेंनी दिली शरद पवार यांना नोटीस - सुप्रिया सुळे

Sakal Natya Mahotsav 2024 : संकर्षण कऱ्हाडे यांच्या उत्तमोत्तम नाटकांची रसिकांना मेजवानी १५ ते १७ नोव्हेंबरला

SCROLL FOR NEXT