Summer Fashion Tips : उन्हाळा सुरू झाला की, आपण आरोग्याची, त्वचेची आणि केसांची खास काळजी घेण्यावर भर देतो. या सगळ्यासोबतच आपण उन्हाळ्यात आरामदायक कपडे परिधान करण्यावर ही भर द्यायला हवा. उन्हाळ्यात प्रिंटेड, फिकट रंगाचे आणि कम्फर्टेबल कपडे परिधान केल्यामुळे, उन्हापासून आराम ही मिळतो आणि तुम्हाला फॅशनेबल रहायला देखील मदत होते.
साडी हा महिलांचा जीव की प्राण आहे, असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. त्यामुळे, ज्या महिला रोज साडी नेसतात किंवा ज्यांना साडी नेसायला आवडते अशा महिलांसाठी काही खास टिप्स आम्ही सांगणार आहोत. या समर स्पेशल फॅशन टिप्समुळे तुम्ही साडीमध्ये देखील स्टायलिश आणि कूल दिसाल. चला तर मग जाणून घेऊयात या समर स्पेशल साडी टिप्स.
उन्हाळ्यात महिला खास करून जॉर्जेट फॅब्रिकच्या साड्या नेसण्याला प्राधान्य देतात. कारण, या प्रकारच्या साडीमध्ये जास्त गरम होत नाही. जॉर्जेट साडीचे फॅब्रिक हे वजनाने हलके असते. शिवाय, या साडीमध्ये असंख्य पर्याय देखील उपलब्ध आहेत. त्यातील एक पॅटर्न म्हणजे जॉर्जेट फ्लोरल प्रिंट साडी होय.
या प्रकारची साडी तुम्ही दररोज परिधान करू शकता. वजनाने हलकीफुलकी असलेली ही प्रिंटेड साडी उन्हाळ्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. अभिनेत्री जान्हवी कपूरने ही लाल फुलांची सुंदर प्रिंट असलेली पांढरी साडी नेसली आहे. उन्हाळ्यात डेलीवेअरसाठी ही साडी तुम्ही नक्कीच नेसू शकता. या प्रकारची साडी तुम्हाला मार्केटमध्ये सहज मिळू शकेल.
ऑम्ब्रे कलर इफेक्ट आजकाल खूपच ट्रेडिंगमध्ये आहे. अभिनेत्री आलिया भट्टने तिच्या ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’ या चित्रपटामध्ये ऑम्ब्रे शेड साडीच्या अनेक साड्या नेसल्या होत्या. त्यामुळे, ऑम्ब्रे शेड साड्या चांगल्याच चर्चेत आल्या. आलिया भट्टचे या साडीतले लूक्स प्रचंड गाजले.
उन्हाळ्यात डेली वेअरसाठी तुम्ही या प्रकारची ऑम्ब्रे शेडची साडी नक्कीच नेसू शकता. या साडीवर तुम्ही आलियाप्रमाणे स्लीवलेस ब्लाऊज देखील घालू शकता. मार्केटमध्ये तुम्हाला या प्रकारची साडी सहज मिळू शकेल. वजनाने लाईटवेट असणाऱ्या या साडीत तुम्हाला गरम ही होणार नाही आणि तुमचा लूक स्टायलिश दिसेल यात काही शंका नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.