Summer Health esakal
लाइफस्टाइल

Summer Health : कडाक्याच्या उन्हातून आल्यावर किती वेळाने पाणी प्यावे? तज्ज्ञ सांगतात की...

जास्त थंड पाणी प्यायल्याने उष्माघात, अपचन, पोटदुखी, उलट्या, चक्कर येणे यासारख्या समस्याही उद्भवू शकतात

सकाळ डिजिटल टीम

Summer Health :  

कडक उन्हाळ्याच्या झळा अजूनही काही कमी होण्याचे नाव घेत नाहीयेत. क्लायमेट चेंजचा अफाट परिणाम वातावरणावर झाला आहे. त्यामुळे आपण वर्षातून दोनवेळा कडाक्याच्या उन्हाचा सामना करत आहोत. ऑक्टोबर आणि एप्रिल-मे या दोन्ही वेळा सुर्य देव आग ओकत असतो.

उन्हाळ्यात उष्माघाताचा त्रास होऊ नये, यासाठी भरपूर पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात. उन्हात प्रवास करणार असाल तर सोबत पाण्याची बाटली असते. पण, कडाक्याच्या उन्हातून घरात किंवा ऑफीसमध्ये पोहोचल्यानंतर आपण थंड पाण्याची बाटली तोंडाला लावतो. फॅन, एसीमध्ये जातो. पण, असे प्रवासातून गेल्यानंतर लगेचच पाणी न पिण्यास सांगितले जाते. (Health Tips For Summer)

डॉक्टर म्हणतात की, उन्हाळ्यात अतिथंड पाणी पिणेही आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. उन्हाळ्यात बाहेरून आल्यानंतर थंड पाणी प्यायल्यास ते तुमच्या आरोग्याला गंभीर हानी पोहोचवू शकते आणि तुमच्या मेंदूवरही परिणाम होऊ शकतो.

जर तुम्ही उन्हातून घरात आला असाल तर लगेच पाणी पिऊ नये. तुम्ही ५-१० मिनिटे शांत बसून मग पाणी प्यावे. पण हे पाणी अतिथंड असू नये.  जास्त थंड पाणी प्यायल्याने उष्माघात, अपचन, पोटदुखी, उलट्या, चक्कर येणे यासारख्या समस्याही उद्भवू शकतात.

आपण सूर्यप्रकाशातून बाहेर आल्यानंतर फक्त साधं पाणी प्यावे. जेणेकरून आपल्या शरीराच्या तापमानात अचानक बदल होणार नाही. अति उष्णतेतून सामान्य तापमानात परत आल्यानंतर अचानक थंड पाणी प्यायल्यास सर्दी आणि ताप देखील होऊ शकतो.

दिवसभरात किती पाणी प्यावे?

डॉक्टर, तज्ज्ञ सांगतात की, लोक सहसा विचारतात की आपण एका दिवसात किती पाणी प्यावे? काही 4 लिटर पाणी पिण्याचा सल्ला देतात, तर काही 5 लिटर पिण्याचा सल्ला देतात. पण उन्हाळ्यात हायड्रेटेड राहण्यासाठी दिवसातून किमान 3 ते 4 लिटर पाणी प्यावे. याशिवाय अशा पदार्थांचे सेवन करावे ज्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असेल आणि सकस आहार घ्यावा.

उन्हाळ्यात संसर्ग होण्याचा धोकाही खूप वाढतो, अशा स्थितीत पाण्याची पातळी संतुलित ठेवावी. घाणेरडे पाणी पिऊ नये, घरातील स्वच्छ पाणी प्यावे आणि बाहेरील लिंबू, शिकंजी, उसाचा रस टाळावा, कारण यामुळे सुद्धा होऊ शकते.

अपचन आणि पोटाशी संबंधित तक्रारी. स्वतःला हायड्रेटेड ठेवण्यासाठी पुरेसे पाणी पिणे खूप महत्वाचे आहे, परंतु हे देखील जाणून घेणे आवश्यक आहे की जास्त पाणी पिणे देखील आपल्या आरोग्यास हानी पोहोचवू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EVM Vote Counting: ईव्हीएमच्या मतमोजणीमध्ये तफावत का आढळली? मोठी अपडेट आली समोर

Google Maps Safety Tips : गुगल मॅप वापरताना घ्या 'ही' काळजी; बदलून घ्या अ‍ॅप सेटिंग, नाहीतर गमवावा लागू शकतो जीव

Latest Maharashtra News Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा

IPL Auction 2025: अमरावतीचं पोरगं आयपीएल खेळणार! 'या' संघात झाली निवड, ११ कोटी रुपयांमध्ये झाली खरेदी

World Chess Championship 2024: भारताच्या डी. गुकेशला सलामीलाच धक्का; गतविजेत्या डिंग लिरेनचा विजय

SCROLL FOR NEXT